efficiency sakal
सप्तरंग

कार्यक्षमता वाढवण्याची गुरुकिल्ली

येणाऱ्या काळात आव्हाने अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, उत्पादकता आणि चांगली कार्यक्षमता असणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल.

प्रफुल्ल वानखेडे

येणाऱ्या काळात आव्हाने अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, उत्पादकता आणि चांगली कार्यक्षमता असणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल.

येणाऱ्या काळात आव्हाने अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, उत्पादकता आणि चांगली कार्यक्षमता असणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. मग आपला मराठी तरुण यासाठी तयार आहे का? नसेल तर त्यासाठी काय करायला हवे, यासाठी आपणच आपला गृहपाठ निवडायला हवा. त्या मुद्द्यांवर चर्चा करू या.

बघता बघता कोविड महामारीला येऊन दोन वर्ष लोटली... सुरुवातीला दहशत, भीती, चिंता, काळजी, विनोद, उपहास! मग पुन्हा भीती. काम सुरू, नव्या समस्या, दुसरी लाट! पुन्हा चिंता, बऱ्यावाईट बातम्या, ताणतणाव आणि बरेच काही... कोविडने बऱ्याच जणांचे अतोनात नुकसान केलेय. काहींचे तर आयुष्य संपूर्ण बदलून गेलेय... कोविडपूर्व आणि कोविडनंतरचे जग अशी सरळ काळाची विभागणी आता झाली आहे.

येणाऱ्या काळात आव्हाने अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, उत्पादकता आणि चांगली कार्यक्षमता असणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. मग आपला मराठी तरुण यासाठी तयार आहे का? तो शहरी भागातला असो, ग्रामीण भागातला असो, या स्पर्धेत टिकायचे असेल तर व्यावसायिकता रक्तात मुरायला हवी. आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण करण्यात (निदान वर्तमानपत्र/समाजमाध्यमांत तरी) थोडेफार यश मिळाले, असे मानायला हरकत नाही.

आजकालच्या आपल्या तरुणांमध्ये विविध विषयांवरील चौफेर वाचन, नव्या खाजगी/कॉर्पोरेट जगाशी जोडून घेताना येणाऱ्या भाषेच्या अडचणी तसेच प्रोडक्टिव्हिटी वर्सेस स्वत:ची प्रगती याबद्दल बऱ्याच अंशी फारशी जागरूकता किंवा फार चर्चा दिसत नाही. यापुढच्या काळात आपले जे तरुण नुकतेच कॅार्पोरेट किंवा खाजगी क्षेत्रात पदार्पण करत आहेत, त्यांनी प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवावी, यावर अधिकाधिक लिखाण करण्याचा प्रयत्न असेल. यात वेगळेवेगळे विषय, त्यात होणाऱ्या चुका यावर भर असेल. काही बाबी आपल्याला अनुभव आल्यानंतर साध्यासुध्या वाटत असल्या तरी नवीन असताना ते फार मोठे संकट असते.

वेळेचे महत्त्व समजून घ्या

आपण दिवसभरातला किती वेळ समाजमाध्यमांवर देतोय, किती वेळ ई-मेल, व्हॅाट्सॲप आणि नॅानप्रोडक्टिव्ह कामांसाठी देतोय याची नोंद करा. टाईम बॅाक्सिंग हा वेगळा आणि खूप चांगला प्रकार आहे, त्यावर काम करा. आणि सर्वात महत्त्वाचे डिजिटल स्क्रिन टाईम कमी करा.

दिलेली वेळ पाळा

कोणत्याही कामाची सहकारी, कस्टमर, अगदी स्वत:लाही दिलेली वेळ पाळा किंवा इतर कोणतीही कमिटमेंट त्याच वेळेला पार पडेल, हे पाहा. करू, पाहू, थोड्यावेळाने करू हा रोग होऊ देऊ नका. यामुळे तुमचे स्वत:चे गुडविल तर वाढेलच, शिवाय कंपनीला त्याचा खूप फायदा होईल.

चुका मान्य करायला शिका

प्रगती करायची असेल तर ‘‘मला सर्व कळते, हे तर मला माहिती होते’’ वगैरे वगैरे चुकीचा ॲटिट्यूड टाळायला हवा. प्रत्येकामध्ये सुधारणेला वाव असतो, जो रोज शिकत राहतो तोच या जीवघेण्या स्पर्धेत टिकतो आणि पुढे जातो. काहीही चुकले तर लगेच मान्य करून मोकळे व्हायचे.

वाचन आणि वाचन

आपल्या क्षेत्रासंबंधात जेवढे जास्तीत जास्त वाचता येईल ते वाचा. दर आठवड्याला विविध लेख, जुने बेसिक रेफरंन्स बुक्स, नव्या घडामोडी, शोध तसेच कमीतकमी एक तरी पुस्तक वाचायचे हा ध्यास हवा आणि तशी कृती हवी. बाकी जो वाचत नाही तो, जे वाचतात त्यांना फॅालो करतो किंवा ‘‘माझ्यासोबत राजकारण होतेय’’ हे सर्वमान्य कारण सांगत मागे पडतो. तुमच्याकडे ज्ञान आणि कृती असेल तर तुम्हाला यशस्वी व्हायला फार अडचणी येत नाहीत, हे मी आत्मविश्वाने सांगू शकतो. वाचनाने अगदी सर्वसामान्य माणूसही असामान्य कामगिरी करू शकतो, हे लक्षात घ्या. आजपासूनच वाचनाला सुरुवात करा.

कोण काय विचार करतात, याची चिंता करू नका

प्रोफेशनल आयुष्य असो की खाजगी, आपली स्वप्न जेव्हा लाखो करोडोंची असतात, त्यासाठी कष्ट घ्यायची, जय-पराजय पचवायची ताकद असते, तेव्हा कवडीमोल लोकांच्या टोमण्यांमुळे मागे हटायचं नसतं... आपले काम करत पुढे ध्येयाचा पाठलाग करत पुढे जायचे.

संपूर्ण लक्ष कामावरच द्या

कामाच्या वेळी फक्त आणि फक्त कामावरच फोकस करा. अगदी चुकूनही समाजमाध्यमं, फालतू व्हाट्सॲप फॉरवर्डस किंवा गॅासिप्स यामध्ये अडकायचे नाही. कोणत्याही अंतर्गत राजकारणात अडकायचे नाही. प्रामाणिकपणे आणि लक्षपूर्वक आपण जेवढे काम करू तेवढा आपला कामाचा उरक वाढत जातो आणि कामात एक चांगली धार येते. हळूहळू तुम्हाला त्या यशाची नशा यायला सुरुवात होते आणि तीच खरी या वयात गरजेची असते.

सहकारी, मित्र आणि साथसंगत

हा खरं प्रत्येकाच्याच आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कोणतेही वय असो, शिक्षण, नोकरी, उद्योग-व्यवसाय काहीही करत असलो तरी आपण आपल्या आयुष्यात कोणाच्या सानिध्यात राहतो, कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो याचा खूप मोठा परिणाम होत असतो. आपल्या आयुष्याला दिशा देणारी माणसं बऱ्याचदा आपल्या कामाच्या ठिकाणी भेटतात. त्यामुळे अशी माणसं शोधायची, तीच आपल्यासाठी खरी संपत्ती असते.

सतत स्वत:ला प्रश्न विचारत राहा

इतर कोणी आपल्याला सांगेल किंवा फक्त पुस्तक वाचून आपल्याला ज्ञान मिळेल, हा सर्वात मोठा भ्रम आहे. आपल्याला सेल्फ इव्ह्यॅल्यूएशन करायला जमले पाहिजे. आपल्या चुका आणि आपण करत असलेला टाईमपास आपल्यालाच अधिक चांगल्या प्रकारे कळतो. त्याचे उपायही आपल्याला माहिती असतात. त्यावर कृती करण्याची मात्र तयारी हवी. थॅामस एडीसन म्हणतात - The value of good idea is in using it. त्यामुळे ज्या नव्या कल्पना सुचतील त्यावर विचार करा, वापरा आणि योग्य कृती करा. स्वत:ला प्रश्न विचारायला सुरुवात झाली की खऱ्या प्रगतीला सुरुवात होते.

व्यसनांपासून दूर रहा

तुम्ही कोणत्याही फॅमिली बॅकग्राऊंडमधून येत असाल तरी व्यसनांपासून दूर रहा. रात्री उशिरापर्यंत दारूच्या पार्ट्या करून किंवा सिगारेटचे झुरके घेतले की फार मोठे यश मिळते किंवा नेटवर्किंग होते, हा फार मोठा गैरसमज आहे. कोणत्या वेळी काय होईल आणि या व्यसनाचे अतिव्यसनात कधी रूपांतर होईल याची खात्री नसते. जर आपले आई-वडील खूप श्रीमंत असतील तर तुम्ही स्वत: गरीब व्हाल किंवा आपल्या घरची परिस्थिती गरीब असेल तर अजून जास्त दारिद्र्य आपल्या कुटुंबाला भोगायला लागू शकते. आपले ध्येय कधीच विसरायचे नसेल तर कोणत्याही परिस्थितीत या विनाशकारी बाबींपासून दूर राहता आले तर सर्वोत्तम! मराठी बोला, मराठीचा अभिमानही बाळगा, पण इंग्रजी हमखास शिका. इंग्रजी साहित्य वाचा, त्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास मिळेल. बाकी आता आर्थिक साक्षरतेसोबत यावरही विस्ताराने लिहित राहू.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT