सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : आजचा हिशोब आजच!

तुम्ही आजचा हिशोब आज पूर्ण केला का? नाही, पैशांचा नाही. तो ऑनगोईंग असतो. त्यात येणं-देणं सुरूच रहातं आणि तो रोजच्या रोज पूर्ण झाला नाही तरी प्रचंड मोठा फरक पडतोच असं नाही.

प्रसाद शिरगावकर

तुम्ही आजचा हिशोब आज पूर्ण केला का? नाही, पैशांचा नाही. तो ऑनगोईंग असतो. त्यात येणं-देणं सुरूच रहातं आणि तो रोजच्या रोज पूर्ण झाला नाही तरी प्रचंड मोठा फरक पडतोच असं नाही. हा जो हिशोब मी विचारतोय तो वेगळ्या देण्या-घेण्याचा आहे. दोन वेगवेगळ्या पातळ्यांवरचा.

पहिली, अगदी स्थूल, स्पष्ट दिसणारी जाणवणारी पातळी म्हणजे शब्द, संभाषण, संवादाचं देणं-घेणं. दिवसभरात आपल्या संवादाचं. जोडीदार अथवा मुलांपासून ते ऑफिसमध्ये बॉस, सहकाऱ्यांपर्यंत आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांपासून ते मित्र-मैत्रिणी आणि अगदी ड्रायव्हर, वॉचमन, रिक्षावाल्यापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी जे जे आपण बोलतो ते बोलणं, ते संभाषण, तो व्यवहार पूर्ण झाला का? एखादं काही मनापासून बोलायचं होतं ते बोलून टाकलं का? मनापासून वाटलेली कृतज्ञता व्यक्त करण्यापासून ते एखाद्याचा आलेला राग व्यक्त करण्यापर्यंत जे व्यक्त करावंसं वाटलं ते व्यक्त केलंत का? किंवा अगदी सहजच सांगावंसं वाटलेलं, ‘आज छान, फ्रेश दिसतीयेस/दिसतोयस’ पर्यंतचं काहीही जिच्याशी संवाद साधतो त्या व्यक्तीला सांगून टाकलंत का? मनाला सतावणारा प्रश्न विचारण्यापासून ते विचारलेल्या प्रश्नाला सरळ उत्तर देण्यापर्यंत सर्वकाही केलंत का? आणि तुमचं व्यक्त करून झाल्यावर त्यावरची दुसऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया ऐकून, बघून, समजून घेतलीत का? तुमचा दिवसभरातला संवादाचा हिशोब पूर्ण केलात का?

हिशोबाची दुसरी पातळी स्वतःसाठीची, स्वतःपुरती. दिवसात एक पाच दहा मिनिटे तरी स्वतःसाठी आणि फक्त स्वतःसाठी दिलीत का? म्हणजे अगदी एकांतात बसून ध्यान वगैरे करणं नाही. म्हणजे ते करत असलात तर उत्तमच, परंतु नसाल करत किंवा नसेल जमत, तर तुम्हाला मनापासून आवडते अशी आणि कोणावरही अवलंबून न राहता निर्भेळ आनंद देते अशी एखादी तरी गोष्ट केलीत का? मग ते पुस्तक वाचणं असो, फुर्र फुर्र करत चहा पिणं असो किंवा सोनचाफ्याचं फूल मिळवून ते आपल्या टेबलवर ठेवून दिवसभर त्याच्या सहवासात काम करत रहाणं असो. चालणं-धावणं-व्यायाम करणं असो. जे काही केल्याने आपल्याला आनंद मिळतो असं काहीही. फार मोठे नाहीत, छोटेसे आनंद. जे मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून रहावं लागत नाही असे. स्वतःचा, स्वतःच्या आनंदासाठी वेळ देण्याचा आजचा हिशोब पूर्ण केलात का?

हे दोन्ही हिशोब आजचे उद्यावर ढकलून चालत नाहीत. कारण एकतर आजचा दिवस उद्या पुन्हा जगता येणार नाही आणि उद्याचा दिवस आपण बघू अन आजचे राहिलेले हिशोब पूर्ण करू शकूच याची शाश्वती नाही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT