ram aaryavarta che punarutthan book sakal
सप्तरंग

देवत्वापलीकडच्या रामाचा तर्कशुद्ध शोध

महर्षी वाल्मीकींनी संस्कृत भाषेमध्ये रचलेलं ‘रामायण’ हे महाकाव्य आहे. सहा कांडांच्या द्वारा, ५०० 'सर्गां' मध्ये २४ हजार श्लोकांची गुंफण करत हे रामायण साकार झालंय.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. वैजयंती चिपळूणकर, saptrang@esakal.com

महर्षी वाल्मीकींनी संस्कृत भाषेमध्ये रचलेलं ‘रामायण’ हे महाकाव्य आहे. सहा कांडांच्या द्वारा, ५०० 'सर्गां' मध्ये २४ हजार श्लोकांची गुंफण करत हे रामायण साकार झालंय. हे नुसतं कल्पित महाकाव्य नाही; तर हे महाकाव्य म्हणजे, प्राचीन भारताचा सर्वांग परिपूर्ण असा इतिहास आहे, हे या महाकाव्याचं वैशिष्ट्य आहे. हा इतिहास एकविसाव्या शतकातही भारतीयांना प्रेरणा देणारा आहे.

आजही अगदी बालवयापासून रामायण-महाभारताचे संस्कार होताना दिसतात. रामायणावर बोलणारे वक्ते, लेखक, चिंतक, समीक्षक, तसेच रामायणाची उपयुक्तता कालानुसार मांडणारे आणि आजच्या प्रगत काळात रामायणावर चित्रपट, नाटक, मालिका सादर करणारे असे अनेक जण आपल्याला आढळतात. रामायणाचा मोह आपल्याला आजच्या काळातही का पडतो याचा विचार करायला लागलो तर आपल्याला काही उत्तरं मिळतात.

पण त्याचबरोबर कितीतरी प्रश्नही पडतात. यामध्ये, मिळालेल्या उत्तरांची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी, कालानुरूप मन, बुद्धी, भावना यांच्याकडून स्वीकारल्या जाणाऱ्या यथोचित उत्तरांसाठी राजेन्द्र खेर यांची ‘राम’ (आर्यावर्ताचे पुनरुत्थान भाग एक) ही कादंबरी महत्त्वाची ठरावी.

कादंबरीच्या अर्पण पत्रिकेनंतर पान उलटलं, की आपल्यापुढं येतो प्राचीन आशियाचा (इ.स.पूर्व १२ हजार), जोडपानाने भरलेला एक व्यापक ‘नकाशा’. हा नकाशा पाहताना भारतीय साम्राज्य किती दूरपर्यंत पसरलेले होते हे पाहून उर भरून येतो आणि या नकाशातील भौगोलिक दृष्टिकोन आपल्या मेंदूमध्ये स्थिरावतो.

त्यानंतर पुढच्या पानावर येतो ''अनुक्रम''. या अनुक्रमाची रचना देखील वेगळी आहे. या कादंबरीत येणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखांची अगदी अल्प परंतु ठळक ओळख. या परिचयांमध्ये अयोध्या नृपती राजा दशरथ, तसेच त्याच्या तीन राण्या, चार पुत्र, इक्ष्वाकु वंशाचे राजगुरु, राजपुत्रांचे गुरु, याचबरोबर दशरथाच्या चारही सुना, तसेच अनेक तपस्वी, तपस्विनी, सिद्धयोगी, पक्षिकुल, वानरकुल, राक्षसकुल इत्यादींची अतिशय थोडक्यात झालेली ओळख आपल्याला क्षणातच तत्कालीन समाजरचना कशी असेल याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला ही कादंबरी वाचण्यासाठी प्रवृत्त करते.

यातलं ‘अंताचा आरंभ’ नावाचं एक अगदी छोटेखानी दोन पानांचं प्रसंग वर्णन... या एका छोट्याशा प्रसंग वर्णनातून 'अकंपन' राक्षसाच्या तोंडूनच रावणासाठी बाहेर पडलेले त्याचे वाक्य असे आहे, "एका मानवानंच आपला दक्षिणेतला महत्त्वाचा तळ उद्ध्वस्त केला आहे.' आणि त्यानंतर अतिशय क्रोधायमान झालेल्या रावणाचे चित्रण हे आपल्याला, अगदी सहजतेने रामाच्या घराण्याचा इतिहास आणि त्यायोगे एकूणच हे अलौकिक रामचरित्र आपण नीट तर्कशुद्ध पातळीवर समजून घेतलंच पाहिजे अशी प्रेरणा देते.

कादंबरी सुरू होते, त्यातून मांडलेल्या कथेच्या भागाला समिधा एक, समिधा दोन अशी नामांकने दिली आहेत आणि त्यापुढं अगदी मोजक्या दोन-चार शब्दांत त्या भागाचा विषय स्पष्ट केला आहे. त्यातूनच रामायणाचा इतिहास, रामायणकालीन कौटुंबिक, सामाजिक, भावनिक, वैचारिक, बौद्धिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, आणि राष्ट्रीय परिस्थितीची तोंड ओळख करून देण्याचं सामर्थ्य त्या शीर्षकांमध्ये आहे, हे विशेष.

कादंबरीच्या पहिल्या भागाचा प्रवास रामजन्म ते शूर्पणखेच्या ‘नाक-कान’ छाटण्यापर्यंतचा आहे. हा एवढा प्रवास लेखकांनी विस्तृतपणे मांडला आहे. रामाचं व्यक्तिमत्त्व वाचकापुढं सादर करताना वाल्मीकी रामायणाचा तसेच इतर रामायणांचा अनेक संदर्भ ग्रंथांचा पाठपुरावा करत त्यांची संशोधन-चिकित्सा करून, प्रगत विज्ञानाचा आधार घेत अतिशय संयमानं रामाचं व्यक्तिमत्त्व वाचकापुढं विस्तृतपणे उभं करताना खेर यांची विषयाची पकड कुठंही सैल झालेली दिसत नाही.

रामाचं कुटुंबाशी, समाजाशी, संस्कृतीशी जुळलेलं नातं आपल्याला इथं स्पष्टपणे तर जाणवतंच; पण त्याचबरोबर राम हा आदर्श राजा होता आणि पुढंही रामाचा हाच आदर्श भारतापुढं असणार आहे याची खात्री आपल्याला या कादंबरीतून पटते, हे आवर्जून सांगावसं वाटतं.

समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचणारा राम पक्षिकुलाशी, वानरकुलाशी किती आणि कसं आत्मीयतेने शाश्वत नाते जोडतो याची स्पष्ट जाणीव आपल्याला होते आणि आपण थक्क होतो. धनुर्धारी रामाची, जानकीप्रती रामाची, पितृवचन पाळणाऱ्या आणि सत्यवचनी रामाची प्रतिमा आपल्या चित्तात प्रगट होतेच.

त्याचबरोबर दैत्यांचा कर्दनकाळ असणारा राम, दुर्जनांचा वैरी असणारा राम, योग्य प्रसंगी कसा रणगंभीर होऊ शकतो याचंही चित्रण आपल्या मनात उतरतं. लावण्ययुक्त राम, बंधुप्रेमाला जागणारा राम, रणनीती कुशलतेने आचरणारा राम आणि त्याचवेळी ऋषीमुनींचे उपकार स्मरणारा राम असे रामाच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिक दर्शन आपल्याला लेखक घडवतो.

ही फक्त रामकथा नाही तर या रामकथेच्या पार्श्वभूमीला इतिहास-भूगोल-विज्ञान, धर्म, अर्थ इत्यादी घटकांची जोड आहे. हे सगळं दाखवत असताना रामाबरोबरच संपूर्ण त्रेतायुगाचाच कालखंड वाचकापुढं संवाद शैलीतून, प्रसंगी तत्कालीन बोलल्या जाणाऱ्या काही विशिष्ट शब्दशैलीच्या वापरातून, प्रवाही भाषेतून प्रगट करताना खेर कमालीचे यशस्वी झालेले आहेत.

ही कादंबरी वाचत असताना आपल्याला रामायण काळात जगत असल्याची भावना होते आणि आपण सुद्धा आपसुकच राममय होऊन जातो आणि अनेक प्रश्नांचा उलगडा आपल्याला या कादंबरीतून होत जातो.

पुस्तकाचं नाव : राम : आर्यावर्ताचे पुनरुत्थान'' - भाग १

लेखक : राजेन्द्र खेर

प्रकाशक : हेडविग मीडिया हाउस, मुंबई

(संपर्क : ७६६६२१९८३८, ८१०८९१४५०७)

पृष्ठं : ४०८ मूल्य : ५४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT