सप्तरंग

बोलणाऱ्या बायका आणि चारित्र्यावर शिंतोडे

बोलणाऱ्या बाईशी आपले वैचारिक मतभेद असूच शकतात, पण तिच्या जैविक, सामाजिक अस्तित्वावर जर प्रश्न होत असतील, तर स्त्री म्हणून तिची बाजू घ्यावीच लागणार आहे.

रसिका आगाशे

बोलणाऱ्या बाईशी आपले वैचारिक मतभेद असूच शकतात, पण तिच्या जैविक, सामाजिक अस्तित्वावर जर प्रश्न होत असतील, तर स्त्री म्हणून तिची बाजू घ्यावीच लागणार आहे.

बोलणाऱ्या बाईशी आपले वैचारिक मतभेद असूच शकतात, पण तिच्या जैविक, सामाजिक अस्तित्वावर जर प्रश्न होत असतील, तर स्त्री म्हणून तिची बाजू घ्यावीच लागणार आहे. ‘बोलणारी बाई’ आपल्या धर्म, वंश, जातीची नाही, त्यामुळे तिची कशाला बाजू घ्यायची, ‘ती तशीच असणार’ असा विचार करत असाल, तर उद्या, अशा ॲपवर स्वतःचा फोटो पाहण्यासाठी तयार राहावे लागणार आहे!

गेल्या काही दिवसांत सुल्ली डील्स आणि बुली बाई ॲपवर शेकडो मुस्लिम बायकांना आभासी जगात विकण्याचा, त्यांची बोली लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांचे सोशल मीडियावरचे फोटो वापरून, जगभरातील विविध पुरुषांना ही त्यांची आजची ‘बाई’ आहे, या पद्धतीने हे फोटो वाटण्यात आले. मुस्लिम बायका या ‘अशाच’ असतात, त्यांचा वापर ‘शस्त्र’ म्हणून केला जातो अशा पद्धतीची विधाने करण्यात आली. या निंदनीय प्रकाराबद्दल हिंदू, ख्रिस्त, शीख, बौद्ध, जैन अशा इतर धर्मीय स्त्रियांना काय वाटले, हा माझ्यासाठी खरंच कुतुहलाचा प्रश्न होता, आहे.

या प्रकरणात दोन पुरुषांबरोबर एक मुलगीही पकडली गेली. आता याचं आश्चर्य वाटू नये इतका धार्मिक द्वेष आत रुजला आहे, हे सत्य आहेच. पण सर्वसामान्यपणे बायकांना इतर धर्मीय बायकांबद्दल, म्हणजे त्यांच्या ‘चारित्र्याबद्दल’ काय वाटतं? ‘आपल्यातीलच’ स्त्रिया सर्वोत्तम असतात, बाकी कशाही वागतात, वापरल्या जाऊ शकतात, हा अत्यंत पुरुषप्रधान विचार, किती खोलपर्यंत पोहोचला आहे, हे तपासून घेण्याची गरज आहे.

आता जरा या ‘विक्रीस ठेवण्यात आलेल्या बायका’ कोण आहेत हे बघुयात. त्यातील बहुतांश मुस्लिम समाजातील असल्या तरी त्यांच्यात अजून एक समान धागा आहे. या सर्व ‘बोलणाऱ्या बायका’ आहेत. यातील अनेक पत्रकार आहेत, समाजसेविका आहेत, समाज माध्यमावर स्वतःचं मत मोकळेपणाने मांडणाऱ्या बायका आहेत. मत मांडणारी बाई म्हणजे भयानकच! तिच्याइतका धोका तर आपल्याला कोरोनाचासुद्धा वाटत नाही! त्यांना थांबवले पाहिजेच आणि त्यांचे तोंड बंद करण्याचा काय मार्ग असतो? त्यांच्या चारित्र्यावर उडवा शिंतोडे! त्यासाठी त्यांनी काही करायची गरजच नाहीये. त्यांचे फोटो वापरून कशीही गोष्ट बनवून विकता येते. लोक त्यांचे फोटो बघून हसू शकतात, त्यांच्याबद्दल वाईट-साईट बोलू शकतात, त्यांना अश्लील शिव्या देऊ शकतात. अशा सर्व गोष्टी पुरुषांनी केल्या तरी बदनाम बाईच होणार असते. आणि लोकलमध्ये जाताना आपल्या शेजारी बसलेली बुरखा घातलेली बाई ‘त्यातली’ तर नव्हे, या विचाराने इतर बायका हवालदिल होणार असतात. किती सोप्पं असतं ना सापळा रचणं आणि बोलणाऱ्या बाईला गप्प करणं?

या प्रकारात अडकलेल्या बायका वेगळ्या ठरल्या. स्वतःचे फोटो विकले जात असल्याचे फोटो, परत समाज माध्यमावर टाकून, पोलिसांना टॅग करत या बीभत्स प्रकाराबद्दल माहिती देत राहिल्या आणि आपल्या राजकीय मतांबद्दल ठाम राहिल्या. कारण कितीही वाटत असलं तरी यात त्यांच्या चारित्र्याचा संबंध नाहीये आणि बदनामीच्या भीतीने गप्प राहणं हा पर्याय नाही. कारण तुमच्या नावाची, तुमच्या चेहऱ्याची, तुमच्या देहाची जरी अश्लील पद्धतीने चर्चा होत असेल, तर प्रश्न हा अशी चर्चा करणाऱ्याच्या ‘चारित्र्यावर’ केला गेला पाहिजे.

मुळात चारित्र्य चारित्र्य म्हणजे काय? फक्त शरीरधर्माबाबत याचा संबंध आहे? सर्व समाजात बायका आणि पुरुषही देहविक्री करतात, (याची कारणे आणि मीमांसा हा एक वेगळा विषय आहे) यात विकत घेणाऱ्याच्या चारित्र्याबद्दल कधीही चर्चा होत नाही. चारित्र्याचा संबंध फक्त योनीशी असतो ना! आणि बोलणाऱ्या बाईला फक्त त्या योनीच्या बदनामीची धमकी दिली तर ती गप्प होते, हे आता तितकं खरं राहिलं नाहीये. पण याप्रकरणी इतर स्त्रिया काय करतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पुरुषप्रधान समाजात अशाच पद्धतीच्या घाणेरड्या क्लृप्त्या वापरण्यात येणार आहेत. बोलणाऱ्या बाईशी आपला वैचारिक मतभेद असूच शकतो, पण तिच्या जैविक, सामाजिक अस्तित्वावर जर प्रश्न होत असतील, तर स्त्री म्हणून तिची बाजू घ्यावीच लागणार आहे. नाही तर बोलणारी बाई आपल्या धर्म, वंश, जातीची नाही, त्यामुळे तीची कशाला बाजू घ्यायची, ‘ती तशीच असणार’ असा विचार करत असाल, तर उद्या, अशा ॲपवर स्वतःचा फोटो पाहण्यासाठी तयार राहावे लागणार आहे!

beingrasika@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT