- आमीर अली, amirali.jnu@gmail.com
इराणची राजधानी तेहरानमध्ये हनियेह याच्या हत्येच्या आदल्या दिवशी बैरूतच्या उपनगरात हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुकरची हत्या करण्यात आली होती. इस्राईलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्स भागातील मजदल शम्स शहरावर झालेल्या रॉकेट हल्ल्याची याला पार्श्वभूमी होती.
या दोन हत्या रोनेन बर्गमनच्या ‘राइज ॲण्ड किल फर्स्ट’ या पुस्तकात वर्णन केलेल्या इस्राईलच्या दीर्घकालीन धोरणाशी मिळत्या-जुळत्या आहेत. या धोरणामुळे इस्राईलमध्ये शांतता आणि सुरक्षा अबाधित आहे का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
‘हमास’चा म्होरक्या इस्माईल हनियेह याची इस्राईलने हत्या केल्याने पश्चिम आशियातील संघर्ष वेगळ्या आणि धोकादायक वळणावर पोहोचला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हनियेह याच्या हत्येच्या आदल्या दिवशी बैरूतच्या उपनगरात हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुकरची हत्या करण्यात आली होती.
इस्राईलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्स भागातील मजदल शम्स शहरावर झालेल्या रॉकेट हल्ल्याची याला पार्श्वभूमी होती. या दोन हत्या रोनेन बर्गमनच्या ‘राईज ॲण्ड किल फर्स्ट’ या पुस्तकात वर्णन केलेल्या इस्राईलच्या दीर्घकालीन धोरणाशी मिळत्या-जुळत्या आहेत. या धोरणामुळे इस्राईलमध्ये शांतता आणि सुरक्षा अबाधित आहे का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
अलीकडच्या घडामोडी पाहिल्यास इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना युद्धबंदीच नको, याचे संकेत मिळतात. त्यांना संघर्ष अनिश्चित काळासाठी वाढवण्यात स्वारस्य असल्याचेच दिसते. इस्माईल हनियेहच्या हत्येनंतर काही दिवसांतच कट्टर याह्या सिनवार याला त्याचा उत्तराधिकारी म्हणून ‘हमास’च्या राजकीय आघाडीचा प्रमुख नेमण्यात आले. ७ ऑक्टोबर २०२३च्या हल्ल्यामागे सिनवर असावा, असे मानले जाते.
सध्याची स्थिती आणि अनिश्चितता पाहिल्यास पश्चिम आशियाचा नकाशा बदलण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियाचा सध्याचा नकाशा हा दोन महायुद्धांमधील भू-राजकीय परिणामांचे फलित आहे. जगातील प्रमुख शक्ती म्हणून ब्रिटनची स्थिती खालावल्यानंतर अमेरिकेचे वर्चस्व वाढले.
आता या प्रदेशातील सध्याची भू-राजकीय स्थिती हे अमेरिकेच्या वर्चस्वाच्या घसरणीचे संकेत देत आहे. इस्राईल ज्याप्रकारे त्यांना हवे ते अमेरिकेला करण्यास भाग पाडत आहे, त्यावरून हे स्पष्ट होते. इस्राईलच्या मागण्या मान्य करण्यासाठी अमेरिका इतकी टोकाची पावले उचलण्यास का तयार आहे, असा प्रश्न पडतो.
काही महिन्यांत घडलेल्या दोन घडामोडींवरून या प्रदेशात चीनचा प्रभाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसते. पहिली म्हणजे, या वर्षी मार्चमध्ये चीनने सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात घडवून आणलेला राजनैतिक सलोखा. दुसरी, ‘हमास’ आणि ‘फताह’सह १४ पॅलेस्टिनी गट जुलैच्या अखेरीस बीजिंगमध्ये एकत्र आले आणि त्यांनी एकजूट करण्याची प्रतिज्ञा केली.
नेतान्याहू यांच्या रणनीतीचा तीन कारणांमुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. संघर्षामागचे त्यांचे कोणतेही स्पष्ट अंतिम ध्येय दिसत नाही, हे अनिश्चित काळ सुरू असलेल्या युद्धातून स्पष्ट होते. दुसरे म्हणजे, या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प ‘व्हाइट हाऊस’मध्ये परततील यावर नेतान्याहू यांची संपूर्ण मदार आहे.
मात्र, जो बायडेन शर्यतीतून पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदासाठी नामांकन मिळाल्यामुळे ट्रम्प पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. तिसरे, नेतान्याहू यांच्या राजकीय कृतींमुळे इस्लामिक जगात एकजुटीचा माहोल निर्माण झाला आहे. सुन्नी-शिया यांचे पारंपरिक शत्रुत्व सर्वश्रुत आहे.
सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील राजनैतिक सलोख्याने ही दोन टोके जोडली गेली आहेत. पश्चिम आशियात तीन प्रादेशिक शक्ती आहेत, पहिल्या दोन शिया आणि तिसरी सुन्नी. त्यांचा इस्राईलला तीव्र विरोध आहे. येमेनमधील हौथी, लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि अर्थातच हमास या त्या शक्ती आहेत.
इस्राईलला या प्रदेशातील आपल्या भूमिकेवर धोरणात्मक आणि वास्तववादी फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. बेंजामिन नेतान्याहू सत्तेवरून पायउतार होतील, तेव्हाच हे घडू शकते. देशात त्यांच्या लोकप्रियतेचा अभाव आहे. तरीही सत्तेवर टिकून राहण्याची त्याची क्षमता अविश्वसनीय आहे. शांतता वाटाघाटीत प्रत्येक वेळी वापरला जाणारा द्वि-राष्ट्राचा उपाय आता गुळगुळीत झाला आहे.
या सर्व गोष्टी कोणत्या दिशेने जात आहेत, हा प्रश्न कायम आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या बदलांच्या संदर्भात याचे उत्तर सापडू शकते. निश्चितच जागतिक व्यवस्था बदलत आहे. इस्राईल हेच मुळात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांदरम्यान झालेल्या जागतिक उलथापालथीचे अपत्य आहे.
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आणि १९४५मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्मितीनंतर मे १९४८ मध्ये एक आधुनिक राष्ट्र म्हणून इस्राईल स्थापना झाली. नोव्हेंबर १९४७ मध्ये १८१व्या ठरावाद्वारे इस्राईलच्या निर्मितीसाठी पॅलेस्टाईनचे विभाजन करण्यात आले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य देशांनी स्थापन केलेल्या नियमांवर आधारित व्यवस्थेत इस्राईलची भरभराट झाली.
इस्राईलच्या कृतींना सामावून घेण्यासाठी विशेषतः ७ ऑक्टोबर २०२३च्या हमास हल्ल्यानंतर अमेरिकेने तीच नियमआधारित व्यवस्था तोडण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर अरब जगताने स्वतःला नव्याने शोधण्याची आणि लोकशाही व प्रगतीसाठी पुन्हा वचनबद्ध होण्याची हीच वेळ आहे.
संपूर्ण इतिहासात ज्यू आणि अरब काही प्रमाणात सलोख्याने एकत्र राहिले आहेत. गेल्या सात दशकांत या दोन समुदायांतील शत्रुत्व ज्या पातळीवर पोहोचले आहे, तेवढे कधीच नव्हते. भविष्याच्या गर्भात काहीही दडलेले असो; पण ज्यू आणि अरब यांच्यातील सध्याची शत्रुत्वाची पातळी खाली आणणे खूप आवश्यक आहे, हे निश्चित.
(लेखक जेएनयूच्या सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीजचे प्राध्यापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.