Girls Crisis Sakal
सप्तरंग

लढा

पुण्यातील सगळ्या शाळा-कॉलेजमध्ये माझ्या सहकारी व अधिकारी यांच्या पुढाकाराने राबवलेला उपक्रम म्हणजे ‘स्वच्छंदी भरारी अभियान’.

अवतरण टीम

पुण्यातील सगळ्या शाळा-कॉलेजमध्ये माझ्या सहकारी व अधिकारी यांच्या पुढाकाराने राबवलेला उपक्रम म्हणजे ‘स्वच्छंदी भरारी अभियान’.

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

पुण्यात स्वच्छंदी भरारी अभियानांतर्गत एका शाळेत कार्यक्रम झाला. मुलींचा गराडा आजूबाजूला होता. त्यांच्यासोबत छानसा फोटो घेऊन काढता पाय घेतला. वॉचमनने ‘ताई’ म्हणत आवाज देत हातानेच मागे खुणावले. मागे वळून पाहिले तर थोड्या वेळापूर्वी वर्गातील ती मुलगी पळत येत होती. मी थांबले. धापा टाकतच मला म्हणाली, ताई, माझी चिठ्ठी नक्की वाचा. मला जसं लिहिता येईल, तसं वर्गात लिहिलं आहे; पण नक्की वाचा, मी वाट पाहते तुमच्या उत्तराची. अजून दोन जास्तीच्या घड्या त्या पत्राच्या घालून माझ्या हातात घाबरत देत ती निघूनही गेली. दुसऱ्या कार्यक्रमाला पोहोचेपर्यंत चिठ्ठी वाचायला घेतली अन्‌ पायाखालची जमीनच सरकली...

पुण्यातील सगळ्या शाळा-कॉलेजमध्ये माझ्या सहकारी व अधिकारी यांच्या पुढाकाराने राबवलेला उपक्रम म्हणजे ‘स्वच्छंदी भरारी अभियान’. दामिनी पथक, बीट मार्शल, समुपदेशक, वकील आणि सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांना सोबत घेऊन मुलीशी संवाद साधायचा, त्यांच्यासाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरची माहिती देऊन अडचण आल्यास स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये ‘बालस्नेही’शी संपर्क साधायचा, कौटुंबिक काही समस्या असल्यास, शाळेबाहेर, क्लासला जाता-येताना कोणी छेडछाड करत असेल, पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी किंवा शिक्षक, पालक यांना सांगायला संकोच होत असेल, तर शाळेतील ‘माय बॉक्स’मध्ये तक्रार नोंदवावी या साऱ्या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करून आत्मविश्वास देण्याच्या आमच्या या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळत होता.

याच उपक्रमांतर्गत पुण्यातील लक्ष्मी रोडवरील शाळेतून मुलींशी संवाद साधून मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा निरोप घेऊन पुढच्या कार्यक्रमासाठी बाहेर पडले. मुलींचा गराडा आजूबाजूला होता, त्यांच्यासोबत छानसा फोटो घेऊन काढता पाय घेतला. वॉचमनने ‘ताई’ म्हणत आवाज देत हातानेच मागे खुणावले. मागे वळून पाहिले तर थोड्या वेळापूर्वी वर्गातील ती मुलगी पळत येत होती. मी थांबले, धापा टाकतच मला म्हणाली, ताई, माझी चिठ्ठी नक्की वाचा, मला जसं लिहिता येईल तसं वर्गात लिहिलं आहे, पण नक्की वाचा, मी वाट पाहते तुमच्या उत्तराची. अजून दोन जास्तीच्या घड्या त्या पत्राच्या घालून माझ्या हातात घाबरत देत ती निघूनही गेली. कदाचित आजूबाजूचे आपल्याकडे पाहतात, हे तिच्या लक्षात येत होते.

दुसऱ्या कार्यक्रमाला पोहोचेपर्यंत माझ्याकडे प्रवासात वेळ होता, म्हणून बाकीचे कागद बाजूला ठेवून आवर्जून चिठ्ठी वाचायला घेतली. वाचता वाचता पायाखालची जमीनच सरकली... भयानक सगळं...

लगेच मुख्याध्यापकांना फोन केला. दोन तासांत मी शाळेत परत येते म्हणून सांगितले, तोपर्यंत मुलीच्या पालकांना बोलवून घ्या म्हणून निरोप दिला. दुसऱ्या कार्यक्रमात फक्त शरीरानेच हजर होते; लक्षच लागत नव्हते. मुली कशा जगत असतील? इतक्या वेदनांच्या जखमा घेऊन उद्याच्या आयुष्याच्या स्वप्नांना कोणता रंग देत असतील?

घट्ट मातीत पाय रोवून उभे राहण्याची शिकवण आणि संस्कार देणारे आशीर्वादाचे हात जिथे पाठीवर पडावे त्या हाताने शरीर ओरबाडून अंगणातील ‘वासरू’ जखमी करावं, का आणि कशासाठी? मनात विचारांचे थैमान सुरू होते. कार्यक्रम लवकर आटोपता घेतला आणि पुन्हा एकदा शाळेत पोहोचले. मुख्याध्यापक थोड्या वेळापूर्वी ज्या आनंदी चेहऱ्याने वावरत होत्या, तो मावळून त्यांच्यासह वर्गशिक्षकेच्या चेहरा चिंताग्रस्त झाला होता. मुख्याध्यापिकांच्या खोलीत ती मुलगी खाली मान घालून निस्तेज चेहऱ्याने बसली होती. आईचा रडवेला चेहरा नैराश्याने ग्रासलेला होता. पालक म्हणून ‘बाप’ येणारच नाही कारण तोच या घटनेतील ‘अपराधी’ होता.

पत्र दाखवताच मुलीची आई सांगू लागली... बाप चांगल्या हुद्द्यावर कामाला; पण घाणेरड्या सवयीमुळे नात्याचीसुद्धा जाणीव राहिली नाही. दारूचे व्यसन आणि बाहेरचा नाद यामुळे आम्ही हतबल झालो; पण सासरच्या लोकांनी केव्हाच पाठ फिरवलेली आणि माहेरचा आधार नाही. माझेही शिक्षण कमी, त्यामुळे कोणती नोकरी करू शकत नाही. तरीसुद्धा एका पार्लरमध्ये साफसफाईच्या कामाला जाते. शाळेतून मुलगी घरी न जाता पार्लरला येऊन बसायची आणि आई तू घरी जाशील तेव्हाच मी सोबत येईल, असं म्हणायची. जरा संशय वाटायला लागला. मी तिला खूप खोदून माहिती विचारायची; पण ती फार बोलत नव्हती. एक दिवस घरात माझ्यासमोर माझ्या पतीने मुलीला खूप मारहाण केली. मी ‘मारू नका’ म्हणून सांगायला गेले तर मलाही खूप मारले.

मुलीच्या अवघड जागी गुडघ्याने खूप मारले. सातवीत शिकणारी कोवळी पोरगी, धाडकन जमिनीवर कोसळली. कसंतरी डॉक्टर, औषध करून बरं केलं; पण हल्ली मुलगी खूप अबोल झाली. ती घरातून बाहेर कोठेही जाताना सोबत चल म्हणते. मी काम केलं तरच आमच्या दोघींचा खर्च भागतो म्हणून मी तिला रागावून शाळेत पाठवून कामाला गेले. शनिवारमुळे ती लवकर घरी आली. आल्यावर पाहते तर या नराधम नवऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. ती बेशुद्ध पडलेली. मी घरी गेल्यानंतर हे दृश्य पाहून हतबल झाले. तळपायाची आग मस्तकात गेली. नवऱ्याला जाब विचारला, तर मलाच मारून अर्ध मेली केली आणि तुम्ही दोघी बाहेर कोठे बोलला तर जीव गमवाल, अशी धमकी दिली.

आम्ही घरात जीव मुठीत घेऊन राहतो. जगण्याचा प्रश्न ‘आ’वासून समोर असताना अशा नराधमाच्या वासनांध कृत्याला बळी गेलेली ‘लेक’ तिला कसं समजावून सांगू? अन् काय समजावू? मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेली ‘ती’ आणि ‘तिला’ धीर देता देता संपणारी ‘मी’. मुलीला जिद्दीने परत उभं करायचं या एकाच ईर्षेने पेटत मी जगतेय आणि तिला जगवतेय; पण बरं झालं तिनेच तुम्हाला पत्र दिले. आज ना उद्या आम्ही तक्रार दाखल करणारच होतो; पण हाच नराधम पोलिस खात्यात असल्यामुळे तिथे आमची काय वाताहत होईल, याची कल्पना आहे आम्हाला; पण लढायचंय आम्हाला या विकृतीविरोधात शेवटपर्यंत...

सुरुवातीला उदास, हतबल वाटलेली ही ‘आई’ माझ्याशी मोकळेपणाने बोलल्यानंतर ‘कणखर’ वाटली. तिच्या आयुष्याची लढाई ती यशस्वी लढेल, तिला फक्त साथ हवी प्रबळ मनोबलाची.

तातडीने पोलिस महासंचालक व पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी केली. शिक्षकांनी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. मुलीने तिचा ‘भूतकाळ’ विसरून उज्ज्वल भविष्याशी स्पर्धा करावी, यासाठी तिच्या आईने मुलीसोबत कराटे क्लासमध्ये नाव नोंदवले...

पुस्तकातील सगळेच धडे ‘पाठ’ नाही झाले तरी चालतील; पण आयुष्यात दररोज नव्याने सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांना धडा शिकवण्यासाठी आपणच आपली वाट शोधून कणखरतेने उभे राहावे लागणार आहे.

आई म्हणून मुलीच्या पाठीशी

अन्‌ सृजनता म्हणून स्वतःच स्वतःसाठी...

चला लढू... समाजातील विकृतीशी.

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT