Anand Shinde Sakal
सप्तरंग

Anand Shinde : बालपणीचे मित्र...

मी गाणं म्हणत असताना अनेक मित्र टेबल वाजवायचे. ही साथसंगतही आमच्या शिंदेशाहीसाठी महत्त्वाची आहे.

आनंद शिंदे

लोकगीतातील शिंदेशाही

बालपणीचा काळ हा सर्वांसाठी यादगार असतो, तसाच माझाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झाल्याने बालपणीचा पसारा बराच मोठा आहे. हे सगळेच मित्र मला लहानपणी गाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. माझा उत्साह वाढवायचे. माझं गाणं त्या वेळी ते ऐकायचे. आमचे वडील गायक होते, म्हणून मला ते गाण्याचा आग्रह धरायचे. मी गाणं म्हणत असताना अनेक मित्र टेबल वाजवायचे. ही साथसंगतही आमच्या शिंदेशाहीसाठी महत्त्वाची आहे.

लपणीचे माझे अनेक मित्र आहेत. ते प्रत्यक्ष भेटले की खूप आनंद होतो. ते मला टीव्हीवर पाहतात, तेव्हा ते आपल्या नातलगांना मी त्यांच्या वर्गात होतो, अशी माहिती देतात. अनेकदा बालपणी ज्या मुलींसोबत आम्हाला बोलण्याचे धाडस होत नसायचे किंवा त्यांच्याशी बोलू शकत नव्हतो, अशा अनेक मैत्रिणी आता वयस्कर झाल्यात. सांगोल्यात असलेली माझी तेव्हाची वर्गमैत्रीण राजश्री नलावडे अजूनही मला सांगते की, तेव्हा शाळेत असताना तू कसा होतास आणि आता कसा आहेस.

दुसरी एक माझी मैत्रीण रुक्मिणी गुरव जी आता वेळापूरला आहे. तिला पण आता नातू पणतू झालेले आहेत. वेळापूर येथील अर्धनारीनटेश्वर हे मंदिर त्यांच्या ताब्यात आहे. दुसरा माझा लहानपणीचा एक मित्र आहे जनार्दन जोगले. ज्या वेळी मी गावी असतो, त्या वेळी तो माझ्या सोबत असतो. दुसरा एक माझा बोबडा मित्र आहे, आताही तो मिलिंदचे शेत वगैरे पाहतो. त्याच्या पत्नीचे नुकतीच अलीकडेच निधन झाले. त्याचे नाव गोपाळ शिंदे. त्याला पाहाताच मी अत्यंत भारावून जातो आणि मला बालपणीच्या आठवणी येतात. दुसरा एक मित्र मारुती लोखंडे, खूप जवळचा होता; परंतु तिसरीला असताना भांडणात मी त्याचं डोकं फोडलं होतं. का फोडलं होतं, या गोष्टी अजूनही तो सांगत असतो. त्या वेळी तो माझ्यासोबत न खेळता दुसऱ्यासोबत खेळत होता, म्हणून मला राग आला आणि मी त्याचं डोकं फोडलं होतं. त्या वेळी तो माझ्याबरोबर येत नाही म्हणून मी त्याला ढकलून दिलं होतं. आजही तो माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. तो आता फळांची गाडी लावतो. माझ्या गावच्या शाळेतील हे सर्व मित्र यात फार कोणी श्रीमंत नाहीत; परंतु मी गावी जातो, त्या वेळी त्यांच्यासोबत असतो.

गावच्या शाळेतील असे अनेक मित्र आहेत, ज्यांना मी त्या वेळी बोलू शकलो नाही; परंतु आता त्यांची आठवण येते. त्या वेळेस संज्योत पाटील नावाचीसुद्धा एक मैत्रीण होती. ती गाणी गायची. आता ती गाते की नाही, हे मात्र माहीत नाही. मी काही वेळा घरी गेलो; परंतु तिची नंतर कधी भेटच झाली नाही. शाळेतील अनेक मित्रांची आठवण येत असते; परंतु त्यांची अजून एकदाही भेट होऊ शकली नाही.

माझ्या बालपणीचे शाळेतील मित्र त्यांना भेटायची माझी खूप इच्छा आहे. त्यांना मी पुन:पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करेन. मला दुसरी, तिसरीतले बरेच बालमित्र अजूनही आठवतात. काही जण माझ्यासोबतसुद्धा आहेत. मी आताही कोणत्या डायरीत कुठलं गाणं आहे, हे अजूनही सांगू शकतो. खरंतर मी चांगले शिकलो असतो; परंतु या गाण्यांमुळे माझ्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला.

विलास उत्तेकर नावाचा माझा मित्र आहे, तो त्या वेळी मला जबरदस्तीने गाणं म्हणायला लावायचा. तो खूप चांगला चित्रकार होता. त्या वेळी मी त्याला म्हणायचो तुझ्या बापाकडून चित्र काढून आण. त्याचे वडील चित्रकार होते.

मी तिसरीनंतर मुंबईला आलो. त्यात दुसरी एक मैत्रीण पद्मा चव्हाण आहे. ती कल्याणच्या ज्ञानमंदिर शाळेत पाचवीला होती. तेव्हा मैत्रीण होती. आता ती बिर्ला कॉलेजला प्राचार्यपदावरून निवृत्त होणार आहे. ती लहानपणी पाचवीला भेटली होती, त्यानंतर आता काही वर्षांपूर्वी भेटली. मी तसा नववीपर्यंत शिकलो; परंतु त्यात नऊ शाळा बदलल्या. अनेक मित्र असे आहेत की ज्यांचा चेहरा समोर आल्यानंतर आठवतो. ज्या ज्या वेळी मी कार्यक्रमाला जातो त्या त्या वेळी माझे बरेच मित्र भेटत असतात. ते समोर येतात. मला ओळख सांगतात आणि चेहरा पाहून मी त्यांना ओळखतो.

हे सगळेच मित्र मला लहानपणी गाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. माझा उत्साह वाढवायचे. माझं गाणं त्या वेळी ते ऐकायचे. आमचे वडील गायक होते म्हणून मला ते गाण्याचा आग्रह करायचे. मी गाणं म्हणत असताना अनेक मित्र टेबल वाजवायचे.

गावात माझे खूप मोठ्या प्रमाणात जीवलग मित्र आहेत. अनेक जण अजूनही मला गावी गेल्यावर भेटत असतात. काही काही मित्र माझ्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान आहेत. तेसुद्धा माझे मित्र आहेत. भेटत असतात. उदारणार्थ मनोजभाई संसारे. ते मुंबईतले आहेत. आम्ही वडाळ्याला चुलत्याकडे असताना तिथे त्यांच्या घराच्या पाठीमागे पोहायला जायचो. मी माझ्या अनेक मित्रांना अशी विनंती करतो की, त्यांनी मला भेटावं. माझ्या मित्रांसोबत मी सर्वात जास्त विटी-दांडू खेळलो. पतंग उडवले. त्यातल्या त्यात माझा आवडता खेळ म्हणून पोहायला जायचो.

कल्याणला रवी काळे, मिलिंद बनकर, महेंद्र पोळ हे माझे मित्र आहेत. पोळ माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे. यातले बरेच मित्र माझ्यासोबतच लहानपणी गोट्या खेळायचे. पोहायला गेल्यास अनेक गमतीशीर प्रकार व्हायचे. विशेष म्हणजे सगळेच आम्ही कपडे ओले होऊ नये म्हणून नागवे पोहायचो. एकदा मी सगळ्यांचेच कपडे घेतले आणि पळ काढला. काही वेळ मस्करी केल्यानंतर देत असायचो. त्या आठवणी अजूनही माझे मित्र सांगत असतात. अशा खूप साऱ्या आठवणी माझ्याकडे आहेत. मिलिंद आणि माझ्यामध्ये केवळ सहा महिन्यांचा फरक आहे; परंतु आम्ही दोघं सोबतच असायचो.

माझी ज्या वेळी एकसष्ठी होईल, त्या वेळी माझ्या सगळ्या मित्रांना मी माझ्या या कार्यक्रमाला बोलावणार आहे. लॉकडाऊनमुळे माझा गेल्या वर्षीचा वाढदिवस साजरा करायचा राहिला. या वर्षी २१ एप्रिल रोजी मित्रांना बोलावून तो साजरा करण्याचा विचार सुरू आहे.

लहानपणीच्या उनाडक्या आणि आता माझी देशभरातील ओळख पाहून माझ्या सर्वच मित्रांची छाती अभिमानाने फुगते. माझे बरेच मित्र खूप गरीब आहेत; परंतु ते माझ्यासाठी काही ना काही करत असतात. माझे हे सर्व मित्र सुदामा असल्याचे मी समजतो.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT