mataverse sakal
सप्तरंग

चला, मेटाव्हर्सच्या आभासी जगात !

मार्क झुकरबर्गनं फेसबुक कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ करायची घोषणा केल्यापासून ‘मेटाव्हर्स’ हा विषय टेक्नॉलॉजी क्षेत्राच्या बाहेरही चर्चेत आलाय.

सकाळ वृत्तसेवा

मार्क झुकरबर्गनं फेसबुक कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ करायची घोषणा केल्यापासून ‘मेटाव्हर्स’ हा विषय टेक्नॉलॉजी क्षेत्राच्या बाहेरही चर्चेत आलाय.

- संदीप कामत saptrang@esakal.com

मार्क झुकरबर्गनं फेसबुक कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ करायची घोषणा केल्यापासून ‘मेटाव्हर्स’ हा विषय टेक्नॉलॉजी क्षेत्राच्या बाहेरही चर्चेत आलाय. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्याची दखल घेऊन त्यावर कव्हरेजही सुरू केलंय. तसा हा विषय टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी नवीन नाही आणि तो फेसबुकपुरताही मर्यादित नाही. मायक्रोसॉफ्ट, फोर्टनाईट, रॉब्लॉक्स इत्यादी अनेक कंपन्यांनी याबद्दल घोषणा केल्या आहेत. पण त्याबद्दल खूप लोकांनी इतक्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलं आहे की त्याची अवस्था आता त्या ‘हत्ती आणि सात अंध’ दंतकथेप्रमाणे झाली आहे. आपापल्या परीने चाचपताना कुणाला हा हत्ती म्हणजे सोंडेच्या आकाराचा वाटतो, कुणाला शेपटीच्या, तर कुणाला भल्या मोठ्या पोटाचा. पण हा हत्ती पूर्णपणे आहे तरी कसा?

मेटाव्हर्स असेल एक आभासी जग. अगदी थोडक्यात सांगायचं तर हे असणार आहे इंटरनेटचं भविष्यातलं रुप ! आणि इतकं सर्वव्यापी असेल की ते ‘फिजिकल’ आणि ‘व्हर्च्युअल’ अशा दोन्ही जगांना जोडणारं असेल. हा शब्द वापरात आणल्याचे श्रेय लेखक नील स्टीफन्सन यांना जातं. त्यांच्या १९९२ च्या सायन्स फिक्शन ‘स्नो क्रॅश’ कादंबरीमध्ये त्यांनी ‘मेटाव्हर्स’ आणि त्यातल्या वास्तववादी थ्री डी इमारती आणि इतर आभासी वास्तव वातावरणात भेटलेल्या सजीव अवतारांची कल्पना केली होती. हे तेव्हा अगदीच सायन्स फिक्शन होतं, पण गेल्या काही वर्षात ह्या तंत्रज्ञानाला लागणारी अनेक साधनसामग्री जमा होत आहे. त्यात Virtual reality (आभासी वास्तव), Augmented reality ( संवर्धित वास्तव), थ्री डी होलोग्राफिक अवतार, व्हिडिओ आणि संवादाची इतर माध्यमे समाविष्ट आहेत. सुरुवातीला आणि अजूनही वेगवेगळी असणारी हे तंत्रज्ञान आणि अँप्लिकेशन्स (अनुभव) आता मेटाव्हर्स साठी एकत्र बांधले जातील.आणि हे जग जसजसे विस्तारत जाईल, तसतसे ते तुम्हाला लांबूनही ‘व्हर्चुअल्ली एकत्र’ राहण्यासाठी हायपर-रिअल पर्यायी जग तयार होईल.

हे सगळे विचित्र वाटत असेल तर तुमच्या मुलांना व्हिडिओ गेम्सबद्दल विचारा. त्यांच्या साठी हे जग त्या त्या गेमपुरते आधीच अस्तित्वात आहे. आता फक्त ही वेगवेगळी जगं एकत्रित येतील आणि तुमचा आयडी सुद्धा एकच असेल ज्याद्वारे तुमचं व्यक्तिमत्त्व सदैव तुमच्या सोबत असेल. आज तुम्ही काही डिजिटल सेवा एका अँपमध्ये विकत घेतली तर ती दुसऱ्या अँपमध्ये वापरता येत नाही. तेवढेच काय तुमचा आयडी सुद्धा बदलतो. हे ‘तुकड्यातुकड्यांचे’ इंटरनेट एकत्र आणणे हे ही मेटाव्हर्सचं एक उद्दिष्ट आहे. मग या जगात करन्सी पण डिजिटल असेल. मग त्या साठी क्रिप्टोकरन्सीज आल्या. वेगवेगळी डिजिटल कॉईन्स आणि टोकन्स आली. हे सगळे सध्या खूप फोकस मध्ये आहे.

या मेटावर्स मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं घर आणि ऑफिस सुद्धा व्हर्चुअल बांधता येईल. त्यात सजावटीचे फोटो, वॉलपेपर्स सुद्धा डिजिटली विकत घेता येतील. तुम्हाला मीटिंग साठी लागणारे, पार्टीसाठी लागणारे कपडे विकत घेता येतील. हे सध्या बऱ्याच गेम्स मध्ये आधीच मिळतं पण आता ते तुम्हाला त्या गेमच्या बाहेरच्या अप्समध्ये ही वापरात येईल. काही महिन्या पूर्वी "Beeple" नावाच्या डिजिटल आर्टिस्टची पेंटिंग्ज ६९ मिलियन डॉलर्सला विकली गेली. (या डिजिटल आर्टस् ला NFT म्हणतात.) ही किंमत योग्य आहे का, याबद्दल वाद ही झाला. जर फोटो किंवा पेटिंग्स इंटरनेटवर कुणालाही सहज कॉपी करता येत असतील तर एवढी किंमत का आली?

त्याचं उत्तर ‘आजकाल लिलावामध्ये ओरिजिनल आर्टपीस प्रचंड किमतीला का विकले जातात?" यात आहे. जसे आज कुणाला ओरिजिनल पिकासो सारखं प्रचंड लोकप्रिय पेटिंग घ्यायचे असेल तर अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागते. तीच गोष्ट या NFTs ची होण्याची शक्यता आहे. क्रिप्टोटेक्निक्समुळे पेंटींगचा मालक कोण आहे हे ट्रॅक करणंही खूप सोपं होणार आहे. काही दशकांनंतर ही पेंटिंग्ज प्रचंड किमतीला विकली जातील म्हणून ती घेणाऱ्याची संख्याही वाढते आहे.

आताच का?

गेल्या दशकात इंटरनेटचा प्रसार इतक्या झपाट्याने वाढला आहे की आता ते जवळपास सगळ्या कानाकोपऱ्यांत पोहोचलं आहे. सध्याच्या ग्लोबल पॅंडेमिकमुळे संपूर्ण जग हादरले असताना टेक्नॉलीजीचं जग चालू ठेवायला किती फायदे झाले हे अनेकांना ‘घरबसल्या’ (वर्क फ्रॉम होम मुळे!) अनुभवयाला मिळालं. इंटरनेटचा आधार घेत शाळा, वर्क फ्रॉम होम, मीटिंग्ज तर करता आल्याच, पण या काळात ॲमेझॉन , फ्लिपकार्ट सारख्या ईकॉमर्स कंपन्यांच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंग ही करता आलं. आता जगभरात ई कॉमर्सला प्रचंड गती मिळाली आहे. झूम व्हिडिओ सारख्या काही कंपन्या तर या काळात कैक पटीने मोठ्या झाल्या. यापूर्वीच इंटरनेटमुळे नवीन इकॉनॉमी तयार तर होत होतीच, पण या सगळ्यातून आता टेकनॉलॉजी आणि इंटरनेट यापुढेही मानवी आयुष्यावर खूप मोठा पॉझेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतात याची छोटी झलक मिळाली आहे. टेक्नॉलॉजीच्या काही क्षेत्रात तर काही दशकांचं अडॉप्शन काही महिन्यात झालं. आता नुसतेच झूम विडिओ च्या टूडी स्क्रीनवर दिसणारे लोक त्यांच्या स्टार वॉर्स मुव्ही प्रमाणे समोर थ्री डी मध्ये अवतरले तर? मीटिंग, पार्टी, गप्पा, पत्ते , खेळ, अगदी मेहफिल आणि कॉन्फरन्स हे ही सगळे करत आले तर? ह्या सगळ्याचे उत्तर मेटाव्हर्समध्ये आहे. पण त्यासाठी थ्री डी ग्लासेस लागतील असेच नाही. ज्याच्याकडे जे डिवाइस असेल त्याने त्त्यांना जॉईन करता येईल, हे मेटाव्हर्सचं प्रॉमिस आहे.

पण असे नक्की होऊ शकेल?

अनेकांना हे सगळे कधी साध्य होणार नाही असेही वाटते पण विचार करा दहा वर्षांपूर्वी लोकांना माहित ही नसणारी "गूगल, अमेझॉन, फेसबुक, ट्विटर" ही नावे आता घरगुती झाली आहेत. जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माणसाला खिशातला फोन काढून एक सेकंदात बोलता येईल ही गोष्ट अगदी काही वर्षांपूर्वी अशक्य वाटत होती. राहिली गोष्ट व्हर्चुअल गोष्टींवर खर्च करण्याची. पार्टी किंवा समारंभा मध्ये तिथे असलेल्या पाहुण्यांकडे दुर्लक्ष करून फेसबुकवर टाकण्यासाठी फोटो काढणाऱ्यांची संख्या आज किती आहे? मग या सगळ्या गोष्टी शक्य वाटायला लागतील. गेम्सवर होणार खर्च वाढतो आहे. डिजिटल आर्ट फोफावते आहे. व्हर्चुअल कॉन्सर्टस् ही वाढताहेत. याच वेगाने दिवसाचा जेवढा वेळ माणसे स्क्रीनकडे बघत घालवतात, तो जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर बसून बोलण्यापेक्षा जास्त होईल, तेव्हा मेटाव्हर्स आपसूकच आलेले असेल.

तसे आपल्या पुराणात क्षणात प्रकट होणाऱ्या आणि अंतर्धान पावणाऱ्या देवदानवांचे अनेक दाखले आहेत. वेगवेगळे ‘अवतार’ धारण करण्याच्या ही कथा आहेत. इतकेच नव्हे इंग्लिशमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये आता सर्रास वापरला जाणारा शब्द 'अँवाटार' म्हणजे आपला "अवतार" हा शब्द. हे सगळे पाहिले आता मात्र जग खऱ्या अर्थाने "मायाजालाकडे" (metaverse) निघाले आहे असे म्हणायला हरकत नाही !

(लेखक कॅलिफोर्नियामध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT