सप्तरंग

दिवाळीनंतरच शुक्रवारची जादू... (संतोष भिंगार्डे)

संतोष भिंगार्डे (santosh2007b@gmail.com)

कोरोनाच्या संकटानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला खूप मोठा फटका बसला. दर शुक्रवारी नवा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या या उद्योगात सगळं काम थांबलेलं होतं. आता सरकारनं चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा शुक्रवारी नवा चित्रपट हे समीकरण रूढ होईल. मात्र त्यासाठी थोडा काल जाऊ द्यावा लागेल. दिवाळीनंतरच या उद्योगात खऱ्या अर्थानं प्रकाशपर्व सुरू होईल

चित्रपटसृष्टीमध्ये मराठी असो की हिंदी, दोन्ही ठिकाणी, शुक्रवार हा अनेक अर्थानं महत्त्वाचा. या दिवशी नवनवे चित्रपट प्रदर्शित होतात. ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्याची गंमतही शुक्रवारचीच. पण गेल्या काही महिन्यात शुक्रवारची ही जादू अनुभवताच आली नव्हती. शुक्रवार म्हणजे नवा चित्रपट, स्वप्नांची नवी दुनिया असं  मानण्याची सवयच हरवली होती. पण आता सरकारने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरची म्हणजे चित्रपटांची जादू अनुभवण्याची परवानगी चित्रपट रसिकांना दिली आहे...

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे तब्बल आठ महिने चित्रपटगृहे बंद होती. आता सरकारने कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली, त्यासाठी स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे एसओपीही लागू केली आहे. परंतु या एसओपीवर काही चित्रपटगृह संचालक नाराज आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, एसओपीची नियमावली पाहता होणारा खर्च खूप आहे आणि तो सगळ्यांना परवडेल असे नाही.

त्यांचे म्हणणे अगदीच उडवून लावता येणार नाही. शिवाय दिवाळीमध्ये कोणताही बंपर चित्रपट नाही. कारण दिवाळी म्हटलं की बिग बॅनर्सचे चित्रपट प्रदर्शित होत असतात आणि ते चांगली कमाई करतात. गेल्या वर्षी दिवाळीत ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यानं चांगली कमाई केली होती. खरे तर दिवाळी, ख्रिसमस आणि ईद हे सण बॉलिवूडसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. ईदला बहुतेक करून सलमान खानचे चित्रपट प्रदर्शित होत असतात तर दिवाळीत शाहरूख खानचे तर अमीर खानचे ख्रिसमसला. दिवाळीत शाहरूख खानचे प्रदर्शित झालेले बहुतेक चित्रपट यशस्वी ठरलेले आहेत. हंड्रेड करोड क्लबमध्ये त्याचे चित्रपट गेले आहेत. यंदाची दिवाळी चित्रपटसृष्टीसाठी काही निराळी असणार आहे. कारण  बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्याची परंपरा खंडित झाली आहे आणि त्याला कारण आहे कोरोना महामारी. 

खरं तर यावर्षी दिवाळीत अक्षय कुमारचा लक्ष्मी आणि जानव्ही कपूरचा गुंजन सक्सेना...द कारगिल गर्ल हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार होते. त्यातच महेश भट यांच्या ‘सडक २’ या चित्रपटाबद्दलही चर्चा सुरू होती मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आणि बहुतेक सगळे हिंदी चित्रपट ओटीटीवर गेले. त्यामुळे आता यावर्षी बिग बजेट आणि बिग स्टार्स असलेले चित्रपट आलेले नाहीत. तरीही दिवाळीनंतर चित्रपटगृहे व्यवस्थित सुरू झाली की एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये ‘शमशेरा’ , ज्याची कथा १८०० च्या शतकातील आहे. रणबीर कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. ही कथा आपल्या जातीच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढा देणाऱ्या एका गटाची आहे. या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट करण मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केला असून रणबीरसोबतच या चित्रपटात अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री वाणी कपूरही मुख्य भूमिकेत दिसतील.  करीना कपूर आणि आमिर खानचा ''लालसिंग चड्ढा'' हा चित्रपट १९९४ मध्ये   हॉलिवूडमध्ये आलेल्या ''फॉरेस्ट गंप'' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता शाहरूख खान हा पाहुणा कलाकार म्हणून आपल्याला दिसणार आहे. १९९३ नंतर पहिल्यांदाच बॉलिवूडमधील हे दोन खान या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. गेले अनेक महिने प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते तो म्हणजे रोहित शेट्टी दिग्दर्शित "सूर्यवंशी." सूर्यवंशी हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा एक भाग आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार एसीपी वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अक्षयसोबत ''सिंघम'' अजय देवगण आणि ''सिंबा'' रणवीर सिंगसुद्धा या चित्रपटातून एकत्र येऊन आपल्याला करमणुकीचा जयघोष करताना दिसतील. हा चित्रपट खरंतर याच वर्षी २४ मार्चला प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट त्यावेळी प्रदर्शित होऊ शकला नाही. आता तो प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. असाच तयार होऊन रिलीज न होऊ शकलेला चित्रपट म्हणजे "८३." हा चित्रपट १९८३ साली भारताने जिंकलेल्या क्रिकेटच्या विश्‍वकरंडक स्पर्धेवर आधारित आहे. कबीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कपिल देव यांची पत्नी रुमी देव यांच्या भूमिकेत आहे. यासोबतच पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, सतीश आळेकर, अम्रीता पुरी, आदिनाथ कोठारे, झीशान अशी या चित्रपटाची बडी स्टारकास्ट आहे. 

यशराज बॅनर्सचा हा बिग बजेट चित्रपट आहे. रोहित शेट्टीचा सूर्यवंशी आणि कबीर खानचा ८३ हे दोन्ही बिग बजेट आणि बिग स्टार्स असलेले चित्रपट पुढील वर्षी येणार आहेत, आमीर खानचा लालसिंह चढ्ढा हा चित्रपट ख्रिसमसला येणार होता. आता तोदेखील पुढील वर्षी झळकणार आहे. एकूणच काय तर डिसेंबरच्या आसपास किवा त्यानंतर हिदीच्या पडद्यावर एकापाठोपाठ एक चित्रपट झळकतील.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मराठीत वीस ते पंचवीस चित्रपट तयार आहेत आणि ते प्रदर्शनाच्या बेतात आहेत. दिवाळीत जरी ते प्रदर्शित झाले नाहीत तरी पुढील एक-दोन आठवड्यात ते प्रदर्शित होतील असे दिसते. विशेष बाब म्हणजे हिंदीतील बरेचसे चित्रपट ओटीटीवर गेले असल्यामुळे त्याचा अधिक फायदा मराठीला होणार आहे. मराठी चित्रपटांसाठी चांगले शो मिळणार आहेत. मात्र प्रॉडक्ट तेवढेच दमदार असायला हवे आणि ते दमदार असले की प्रेक्षकांचे पाय नक्कीच थिएटरकडे वळतील. मराठीमध्ये, दे धक्का २, दगडी चाळ २, अनन्या, पांघरूण, झिम्मा, भोंगा, गोष्ट एका पैठणीची, वाजवू या बॅण्ड बाजा, अहिल्या, ताठ कणा,  बुरखा बॉय, येरे येरे पावसा, आठवा रंग प्रेमाचा, मी वसंतराव, वेल डन बेबी, झॉलीवूड, आय लव्ह ऐश्वर्या, लोच्या झाला रे, डार्लिंग असे जवळपास पंचवीसहून अधिक चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. या चित्रपटांवर निर्मात्यांनी लाखो रुपये लावलेले आहेत. काही जणांनी कर्ज काढून चित्रपट बनविलेले आहेत. गेल्या सातेक महिन्यांत चित्रपटसृष्टी ठप्प झाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान खूप झालेले आहे. त्यामुळे आता चित्रपटगृहे उघडल्यामुळे हे चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होतील. एकूणच सांगायचे तर चित्रपटगृहे आता सुरू झाली आहेत. दिवाळीचा सण आलेला आहे. दिवाळीत जरी ‘सूरज पे मंगल भारी’ हा करमणूक करणारा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी चित्रपटांची भाऊगर्दी दिवाळीनंतर होणार आहे. मात्र आता प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा काय मिळतोय यावर पुढील सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कारण आता बहुतेक सिंगल स्क्रीन दिवाळीनंतरच उघडणार आहेत. मल्टिप्लेक्सचा पडदा उघडला असला तरी त्यातील स्क्रीनची संख्या कमी आहे. त्यामुळे दिवाळीनंतर चित्रपट अधिक प्रदर्शित होतील अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली 'ही' भीती, म्हणाले- राज्यातील कायदा सुव्यवस्थाच...

Nashik Traffic Route: मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Google Crome Sell : क्रोम ब्राऊजर विकून टाका! US मधून गुगलच्या मालकांना आला फोन, नेमकं प्रकरण काय?

Eye Care Tips : दुषित हवेचा डोळ्यांवर होतोय थेट परिणाम, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुक प्रचार, उमेदवारांच्या दुचाकी फेरीमुळे मार्ग खोळंबले

SCROLL FOR NEXT