Sophia esakal
सप्तरंग

दृष्टिकोन : महिलांना मतधिकारासाठी लढणाऱ्या लढवय्या सोफिया

Latest Marathi Article : इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा, यामागे मोठी प्रेरणा देणारी आणि धडाडीने सहभाग घेणारी वरच्या फळीतील एक महिला नेता चक्क भारतीय होती.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : राजाराम पानगव्हाणे

इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा, यामागे मोठी प्रेरणा देणारी आणि धडाडीने सहभाग घेणारी वरच्या फळीतील एक महिला नेता चक्क भारतीय होती. इंग्लंडमधल्या स्त्रियांसाठी तिने आपल्या प्राणाची बाजी लावली. महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी तिने मोठी चळवळ केली. तिचे नाव होते राजकुमारी सोफिया अलेक्झांड्रा दुलिप सिंग.

युनायटेड किंगडममध्ये तिला आजही महिला हक्कासाठी लढणारी कार्यकर्ती म्हणून ओळखले जाते. जगाचा इतिहास बघितला तर मानवाला आपल्या प्रत्येक हक्कासाठी प्रस्थापिताविरुद्ध लढावे व संघर्ष करावा लागला आहे. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. उच्चवर्गीयांनी कायमच उपेक्षित लोकांना आपल्या खाली दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे जसं पुरुषांबाबत आहे तसं महिलांबाबतीत पण आहे. ()

जगातील जवळपास सर्वच देश स्वतंत्र झाल्यानंतर जगावर ज्यांनी राज्य केले अशा इंग्लंड देशांमध्येसुद्धा महिलांना त्यांच्या अधिकारासाठी झगडावे लागले. संघर्ष करावा लागला व मतदानाचा अधिकार मिळवतानाही मोठ्या प्रमाणात पुरुषप्रधान संस्कृतीशी टोकाचा संघर्ष करावा लागला. ज्यांनी जगावर राज्य केले अशा देशांमध्ये मतदानाचा अधिकार महिलांना नसणे म्हणजे विशेष होय.

अशा देशांमध्ये मतदानाचा अधिकार मिळवून देण्यामध्ये भारतीय स्त्रीचा महत्त्वाचा वाटा होता, हे खूप कमी घटकांना माहीत असेल. भारतात संविधानाने महिलांना व इतर सर्वांना मतदानाचा समान अधिकार दिला आहे. तुमचे सामाजिक स्थान, लिंगभेद व जातिभेद यांना त्यात थारा नसतो. प्रत्येक व्यक्तीला एक मत, असा समान अधिकार आपल्याला आपोआप मिळाला आहे. मात्र विकसित देशांमध्ये हा अधिकार मिळण्यासाठी महिलांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला होता. इंग्लंडमध्ये यासाठी मोठी चळवळ चालवली गेली होती.

या चळवळीमध्ये अनेक महिलांनी आपल्या जिवाची बाजी लावली. महिलांना मतदानाचा समान अधिकार मिळावा, यासाठी अनेक संघटना काढून स्त्रिया लढत होत्या. २१ नोव्हेंबर १९११ मध्ये संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा, या कारणासाठी स्त्रियांनी लंडनमध्ये मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावर व्हाइट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठीहल्ला चढवला होता, म्हणून हा दिवस तेथे लोकशाही अधिकार दिनासाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो.

भारतीय-युरोपीय संस्कार

सोफिया जयंतचा जन्म ८ ऑगस्ट १८७६ ला झाला. महाराजा दुलिप सिंग हे शीख साम्राज्याचे शेवटचे राजे होते. त्यांच्या तिसऱ्या मुलीच्या रूपाने सोफिया हिला राजेशाही थाटात वाढविण्यात आले. त्यांचे लहानपण सफोल्क या शहरामध्ये गेले. त्यांची आई या ‘बांबा’ या जर्मनीच्या प्रसिद्ध व्यापारी लुडविग म्युलर यांची मुलगी होती.

टॉड म्युलर ॲन्ड कंपनी या युरोपमधील प्रतिष्ठित संस्थेमध्ये या माणसाचे मोठे वजन होते. त्यामुळे सोफिया यांच्यावर युरोपीय आणि भारतीय दोन्ही पद्धतीचे संस्कार झाले. महाराजा आणि बांबा म्युलर यांना एकूण मिळून दहा मुले झाली. त्यापैकी सहा मुले जगू शकली होती. सोफिया ही त्यांच्यापैकीच एक.

आईविना झाली जडणघडण

वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना टायफाइडची लागण झाली होती. त्यांच्या आजारपणाचा काळातच त्यांच्या आईलाही हा रोग झाला. या रोगामध्येच त्यांचे निधन झाले. तेव्हापासून सोफिया यांची सर्व जडणघडण ही आई नसताना झाली होती. त्यामुळे त्यांना इंग्लंडच्या समाजामधील अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. सोफिया दहा वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी भारतात परत जाण्याचा प्रयत्न केला होता.

ब्रिटिश सरकारने या गोष्टीला परवानगी दिली नाही. १८८६ मध्ये त्यांच्या वडिलांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत भारतात जाण्याचा प्लॅन केला. पण तो यशस्वी झाला नाही. येमेनजवळ पोचताच त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. त्यामुळे दुलीप सिंग यांना माघारी यावे लागले होते. या गोष्टीचा सोफिया यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.

गांधीजींच्या स्वागताचे नियोजन

आता आपले आयुष्य इंग्लंडमध्येच जाणार आहे, याची त्यांना खात्री झाली होती. सोफियाचा इंग्लंडची क्वीन विक्टोरिया यांना विशेष लळा होता. समाजामध्ये विविध गोष्टी जाणून घेण्याची आणि लोकांशी संबंध ठेवत राजकारणाशी जोडले राहण्याची शिकवण त्यांनी सोफिया हिला दिली.

आपल्या कुटुंबाकडून इंग्लंडच्या राजघराण्याने आपले राज्य चोरून घेतले, आपला वारसा हरवला आणि एखाद्या पाहुण्यासारखी वागणूक आपल्याला आपल्याच देशामध्ये दिली जाते, याचे कारणही इंग्रज आहेत, हे त्यांना समजले. १९०९ मध्ये महात्मा गांधी इंग्लंडला गेले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी वेस्टमिनस्टर पॅलेस हॉटेलात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्या सभेचे संपूर्ण नियोजन सोफिया सिंग यांनीच केले होते.

...अन् ब्रिटनच्या लोकसभेला वेढा

ब्रिटनमध्ये भारताप्रमाणेच दोन सभागृहे आहेत. यापैकी हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे लोकसभा हे महत्त्वाचे मानले जाते. सोफिया यांनी काही महिलंसमवेत १८ नोव्हेंबर १९१० मध्ये ब्रिटनच्या लोकसभेला वेढा दिला होता. पंतप्रधानांची भेट व्हावी म्हणून त्या आडून बसल्या होत्या. होम सेक्रेटरी म्हणजे इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने आपल्या सचिवाला बोलावून या महिलांना तेथून हटण्यास सांगितले. मात्र पंतप्रधानांशी बोलून, आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी भेट झाल्याशिवाय तेथून हलणार नाही, असा निर्णय सोफिया आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्वच महिलांनी घेतला.

...अन् महिलांवर लाठीहल्ला

महिला हटत नसल्याचे बघून थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. सहकार्य न केल्यास या महिलांवर थेट लाठीहल्ला करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. तरीही या महिला डगमगल्या नाहीत. त्यामुळेच त्यांच्यावर लाठीहल्ला चढविण्यात आला. अनेक महिला यात गंभीर जखमी झाल्या. हा दिवस इंग्लंडच्या इतिहासात महिलांच्या प्रतिष्ठेचा काळिमा फासणारा दिवस म्हणून नोंदविला गेला. त्यामुळेच आजही १८ नोव्हेंबर हा दिवस तिकडच्या इतिहासात ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखला जातो.

सोफियांचे सामाजिक योगदान

सोफिया यांनी पुढे ब्रिटिश रेड क्रॉस या सैनिकांना मदत करणाऱ्या व उपचार करणाऱ्या संस्थेसाठी काम केले. जवळपास दोन वर्षे त्यांनी हे काम केले. अनेक सैनिकांना त्या स्वतः मलमपट्टी करत. भारतीय सेनेमध्ये पंजाबमधून आलेल्या शीख सैनिकांचा मोठ्या प्रमाणात भरणा होता. शीख साम्राज्याचा पाया घालणारे महाराजा रणजित सिंग यांची नात आपल्या शेजारी बसून आपल्याला मलमपट्टी करते आहे, यावर अनेक सैनिकांचा विश्वास बसत नव्हता.

...अन् ब्रिटिश साम्राज्य झुकले

सोफिया यांची भूमिका अशी होती, की महिलांनी कर भरावा अशी सरकारची इच्छा असेल तर कर भरण्यासाठी आधी मतदानाचा अधिकार द्यावा लागेल. शेवटी १९१८ मध्ये ब्रिटनच्या संसदेने एक कायदा संमत केला. ‘रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल’ असे या कायद्याचे नाव होते. या कायद्यामार्फत स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. मात्र वयाची तीस वर्षे पूर्ण केल्यानंतरच स्त्रियांना मतदान करता येणार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT