indian culture esakal
सप्तरंग

राजवंश भारती : विस्तीर्ण भारतीय कालपट...

भारतासारखा परंपरांनी समृद्ध देश इतरत्र कुठेही आढळणार नाही, किंबहुना नाही, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

सकाळ डिजिटल टीम

लेखक : ॲड. सुशील अत्रे

भारतासारखा परंपरांनी समृद्ध देश इतरत्र कुठेही आढळणार नाही, किंबहुना नाही, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. धार्मिक, आध्यात्मिकबरोबरच भारतातील राजकीय संस्कृतीही अतिशय प्राचीन तेवढीच वैविध्यपूर्ण राहिली आहे.

या सदरातून लेखकला आढळून आलेल्या अशाच राजवंशांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे. ती अचूक आणि परिपूर्ण असेल, असा लेखकाचाही दावा नाही. वाचकांपैकी कोणी त्याबाबत अधिक अभ्यास केला, वेगळे मत मांडले, तर त्यांचे स्वागतच असेल. (saptarang latest marathi article by adv sushil atre on Rajvansh Bharti Vast Indian Chronicles nashik news)

भारतसारखा परंपरासमृद्ध देश खरोखरच दुसरा कुठला नसेल. या परंपरा धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक तर होत्याच; पण भारताची राजकीय परंपराही अतिप्राचीन आणि वैविध्यपूर्ण आहे.

जगाच्या पाठीवर इतरत्र सगळीकडे जेव्हा मानव फारतर समूह म्हणून राहायला शिकत होता, त्या काळात भारतात राजघराणी, राजवंश उदयाला आले होते. ही सामाजिक प्रगती अद्भुत आणि अभिमानास्पद आहे.

पण दुर्दैवाने गुलामगिरीच्या कालखंडात भारतीय समाजमनसुद्धा परधार्जिणे झाले. विशेषत: ब्रिटिशांनी अगदी योजनापूर्वक आमच्या बुद्धिजीवी वर्गाचं ‘ब्रेन वॉश’ केलं. त्याचा परिणाम असा झाला, की कोणतीही भारतीय गोष्ट, भारतीय परंपरा, भारतीय विद्या ही अभ्यास करण्याची नव्हे, तर टिंगल करण्याची गोष्ट होऊन बसली आणि हा केवळ भूतकाळ नाही.

आजही एक वर्ग असा आहे, जो भारताबद्दल विशेषत: हिंदू संस्कृतीबद्दल कमालीच्या तुच्छतेने बोलण्यात धन्यता मानतो. जे काही पाश्चात्त्य लेखकांनी लिहून ठेवलं, तेच प्रमाण आणि त्यापेक्षा वेगळे मत मांडणारा कोणी भारतीय अभ्यासक निघाला, तर तो यांच्या लेखी लगेच ‘भगवा’ म्हणून त्याज्य होतो.

जगाचाच इतिहास शक्यतोवर ख्रिस्ताच्या मागे जाऊ द्यायचा नाही, या चर्चप्रणीत विचारसरणीमुळे आपल्या देशावरही ‘आर्य आक्रमणाचा’ डाव्यांचा लाडका सिद्धांत लादला गेला. म्हणजे या हिंदुस्थानात जी ‘संस्कृती’ आली ती बाहेरून आली आणि केवळ दोन हजार वर्षांपूर्वी आली.

त्याआधी सगळा अंध:कार होता हे पिढ्यान् पिढ्या शिकवले गेले. मग जेव्हा एखाद्या राखालदास बॅनर्जींना मोहेंजोदडो-हडप्पाचे अवशेष सापडतात, तेव्हा यांची पंचाईत होते किंवा आणखी अलीकडे येऊ... जेव्हा सिनौलीला जमिनीखाली एखादा रथ सापडतो; तो साडेतीन हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसते, तेव्हा हे डावे इतिहासकार नुसतीच नाकं मुरडतात.

याच तथाकथित इतिहास पंडितांनी ठरवून टाकलं आहे. भारताचा राजकीय इतिहास चंद्रगुप्त मौर्यापासून सुरू होतो. त्या आधीच्या सगळ्या भाकडकथा आहेत. रामायण, महाभारत पूर्णपणे काल्पनिक काव्य आहे.

पुराणे म्हणजे शुद्ध जादूच्या गोष्टी आहेत. त्यातल्या सगळ्या व्यक्ती काल्पनिक, सगळ्या घटना काल्पनिक आणि परदेशी इतिहासकारांनी संशोधन न करताही जे लिहून ठेवलं, ते शिरसावंद्य!

सुदैवाने आता या दीडशहाण्या इतिहासतज्ज्ञांकडे फारसे लक्ष न देता तरुण संशोधक स्वतंत्र बुद्धीने अभ्यास करू लागले आहेत. भारताचा इतिहास काही हजार वर्षे मागे आधीच गेलाय... अजूनही मागे जाईल.

ज्या राजे-महाराजांबद्दल प्राचीन काव्ये-पुराणे सांगतात, ते काव्यनायक झाले. कारण ते तेवढे कर्तृत्ववान होते. त्या होऊन गेलेल्या व्यक्ती आहेत.

काव्यात्मक अतिशयोक्ती बाजूला ठेवून चिकित्सक नजरेने त्यांच्याकडे बघता येते, हे या नव्या दमाच्या संशोधकांना पटले आहे. त्यांना ‘भारतीय’ शब्दाची ॲलर्जी नाही... उलट अभिमान आहे.

म्हणूनच ज्यांना आतापर्यंत ‘काल्पनिक’ म्हणून बाजूला फेकले किंवा ज्यांना केवळ ‘हिंदू’ होते म्हणून हिणवले, अशा खऱ्या ‘भारतीय’ राजघराण्यांची, राजवंशांची माहिती आपण या सदरातून घेऊ. मी स्वत: वेद, पुराणे, आर्शकाव्ये यांना ‘संदर्भ’ समजतो. केवळ लिखित स्वरूपात असलेला मजकूर ‘संदर्भ’, असतो असे नाही.

मौखिक परंपरेतही संदर्भ असतात. केवळ लेखी आहे म्हणून ते खरे, ही भूमिका घेतली, तर फेरिस्त्यासारख्या थापेबाज व्यक्तीचे लिखाणही ‘खरा इतिहास’ मानावा लागेल.

या सदरात मी, मला आढळून आलेल्या राजवंशांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करीन. ती माहिती अचूक आणि परिपूर्ण आहे, असा माझा दावा नाही.

वाचकांपैकी कोणी त्याबाबत अधिक अभ्यास केला, वेगळे मत मांडले, तर मला आनंदच वाटेल. तर, पुढील लेखापासून आपण एकेका राजवंशाची माहिती घेऊ या.

(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ व भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT