Devendra Fadnavis, Eknath Shinde, Radheshyam Mopalwar, Dr. Chandrakant Pulkundwar esakal
सप्तरंग

महाराष्ट्राचा पहिला ग्रीन फिल्ड इंडस्ट्रिअल कॉरिडॉर; समृद्धीचे यशस्वी कॅप्टन ठरले देवेंद्र फडणवीस

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

समृद्धी महामार्गाचं सर्वार्थानं श्रेय खऱ्या अर्थानं कुणाला द्यायचं झाल्यास ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला द्यायला हवं. हे श्रेय निर्विवादपणे जसं फडणवीस यांचं हे, तसं ते काही अंशी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही आहे. जेव्हा समृद्धी महामार्गाची मुहूर्तमेढ देवेंद्र फडणवीस यांनी रोवली तेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते. मुंबई-नागपूरला जोडणारा थेट महामार्ग होऊ शकतो, अशी कल्पनाही तेव्हा कुणी केली नव्हती. तथापि, हा राज्याच्या समृद्धीचा विकासाचा महामार्ग ठरेल, हे व्हीजन ठेवून या महामार्गाची पायाभरणी फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आली.

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी हा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा आणि मूलभूत प्रकल्प ठरणार आहे. कदाचित नावाप्रमाणे महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेनं नेणारा हा प्रकल्प ठरेल, यात शंका नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेलं लोकार्पण राज्यासाठी त्यामुळेच विशेष महत्त्वाचं आहे. समृद्धीला मूर्त रूप देण्यात राधेश्याम मोपलवार आणि डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचंही योगदान मोठं आहे. (Saptarang Latest Marathi Article by dr rahul ranalkar Maharashtra first Green Field Industrial Corridor nashik news)

देवेंद्र फडणवीस आमदार असतानापासून नागपूर-मुंबई अंतर कमी करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होते. प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाल्यावर या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली. या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीनं लक्ष दिलं. मुख्यमंत्री वॉररूमच्या माध्यमातून दर टप्प्याला गतिमान पद्धतीनं आढावा घेण्यात फडणवीस यांचा हातखंडा होता. त्यामुळेच अल्पावधीत आता हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे.

राज्यातील पहिला ग्रीन फिल्ड इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अशी समृद्धी महामार्गाची नोंद होणार आहे. समृद्धी महामार्गासाठी सर्वाधिक गतीनं भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. आठ हजार ८०० हेक्टर जागा अवघ्या १२ महिन्यांत भूसंपादित करून त्यासाठी राज्य सरकारनं आठ हजार तीन कोटी रुपये अदा केले. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५५ हजार ३५५ कोटी एवढा होणार आहे.  

प्रतितास १५० किलोमीटर वेगाने वाहने धावणार असल्याने मुंबई-नागपूर हा प्रवास १७ तासांवरून सात तासांवर येणार आहे. नागपूरच्या मिहान कॉरिडॉरशी कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यानं समृद्धी महामार्ग इंडस्ट्रिअल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल. विशेष म्हणजे, राज्यातील औद्योगिक वाढीला चालना मिळावी, यासाठी समृद्धी महामार्गालगत औद्योगिक वसाहती निर्माण करण्यासाठी इंडस्ट्रिअल भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत. पर्यायानं या महामार्गामुळे एकारेषेत आलेले २० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना त्याचा थेट लाभ होणार आहे. महामार्गालगत सुमारे १५ ते २० लाख रोजगारनिर्मिती यामुळे होणार आहे. रस्ते, महामार्ग हे राज्याच्या, देशाच्या धमन्या असतात, ही उक्ती या महामार्गामुळे सार्थ ठरणार आहे. समृद्धी हा देशातील सर्वांत मोठा हरित मार्ग ठरणार असून, या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी ११ लाख वृक्ष असणार आहेत. 

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

विदर्भ, मराठवाड्याशी मुंबईची कनेक्टिव्हिटी ज्याप्रमाणे होईल, तसेच उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख भागदेखील मुंबई आणि मराठवाडा, विदर्भाशी अधिक सक्षमपणे जोडला जाईल. विशेषतः नाशिक हे मुंबईच्या अधिक जवळ येईल. नाशिकच्या शेतीमालासह अन्य वाहतुकीसाठी समृद्धी महामार्गाचा अत्यंत चांगला वापर होणार आहे. खानदेशमधून थेट समृद्धी जाणार नसला तरी मराठवाड्याजवळून खानदेशात जाणारे मार्ग समृद्धीमुळे अधिक सक्षम होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी (ता. ११) लोकार्पण होत असलेला पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीपर्यंतचा आहे.

उर्वरित शिर्डी ते मुंबई १८१ किलोमीटरचा दुसरा टप्पा पुढच्या सहा महिन्यांत पूर्णत्वास येणार आहे. नाशिक ही पुरातन धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक नगरी आहे. साहित्य, कलेत मोठा वारसा नाशिकला लाभला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून दूर असलेले नाशिक पुढच्या सात-आठ वर्षांमध्ये राज्याच्या, देशाच्या आणि जगाच्या नकाशावर ठळकपणे येणार आहे. त्याचा दमदार प्रारंभ समृद्धीच्या निमित्ताने होऊ घातला आहे. विकासाचा अनुशेष असलेल्या, विकासाची भूक असलेल्या भागातून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गामुळे शेती व शेतकरी, उद्योग-व्यापार यांना चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT