Rajaram Pangavane esakal
सप्तरंग

व्यवस्थापन : सर्वांत लोकप्रिय अभ्यासक्रम

सकाळ डिजिटल टीम

लेखक : राजाराम पानगव्हाणे

आजमितीस असे एकही क्षेत्र नाही, की ज्याचा संबंध व्यवस्थापनाशी येत नाही. अगदी वैयक्तिक आपल्या कुटुंबापासून सभोवतांच्या सर्वच क्षेत्रांत व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे. जीवनातील प्रत्येक घटक हा व्यवस्थापनाशी संबंधित आहे.

आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात व्यवस्थापन असल्यामुळे व्यवस्थापनशास्त्र म्हणजे मॅनेजमेंट यास किती वाव आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणूनच व्यवस्थापनामधील म्हणजेच मॅनेजमेंटमधील अभ्यासक्रमांन देश-परदेशात मागणी आहे.

अगदी छोटछोट्या शैक्षणिक संस्थेपासून तर जागतिक स्तरावरच्या संस्थांमध्येही सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रवेश घेणारा जर कुठला अभ्यासक्रम असेल, तर तो मॅनेजमेंट अर्थात, एमबीए आहे. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on Management Most popular course nashik)

जागतिक व्यावसायिक बदलामुळे शैक्षणिक बदलही घडून आले आहेत. पारंपरिक शिक्षण आणि नोकरी यापलीकडे जाऊन नवीन उद्योगधंदे आणि व्यवसाय उदयास येत आहेत.

या नव्याने उदयास येणाऱ्या क्षेत्रात करिअर करावयाचे असल्यास त्या क्षेत्राशी संबंधित विषयात पारंगत असणे काळाची गरज आहे. अशा अनेक विषयांपैकी एक म्हणजेच (एमबीए) व्यवसाय प्रशासन अभ्यासक्रम. आंतरराष्ट्रीय स्तरावर या शिक्षणक्रमाचा प्रभाव जास्त आहे.

व्यवस्थापनातील काही प्रमुख संज्ञा काय असतात, हे समजून घेताना नियोजन, संघटना आणि संयोजन, कर्मचारी प्रशासन, संचालन, संज्ञापन, निर्णय घेणे, नियंत्रण तसेच व्यवस्थापनाची कार्यक्षेत्रे (फंक्शनल एरियाज ऑफ मॅनेजमेंट).

उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात नियोजनापासून नियंत्रणापर्यंतची सर्व कामे येतात. प्रामुख्याने उत्पादन, विपणन, वित्त व्यवस्थापन, मानव संसाधन वा कर्मचारी व्यवस्थापन ही चार प्रमुख कार्यक्षेत्रे होत. सर्वसाधारणपणे वरील घटकांवर आधारित अभ्यासक्रमाचे संशोधन एमबीएमध्ये केलेले आढळते.

मोजक्या कालावधीत विविध प्रकारचे ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्यासाठी एमबीए हा उत्तम कोर्स ठरू शकतो. जितक्या खुल्या मनाने तुम्ही एमबीए कोर्स शिकाल, तितका चांगला व्यक्तिमत्त्व विकास तुम्ही साधाल.

एमबीए हे तुमच्या करिअरमधील प्रगतीचे एक महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी झटायची तयारी असेल, तर यश तुमचेच आहे.

कुठल्याही संस्थेत व्यवस्थापनाची पाच अंगभूत कार्ये असतात. वित्त व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, उत्पादन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि संगणक व्यवस्थापन. यापैकी संस्था प्रभावीपणे चालण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन.

योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य माणसे नेमून त्यांच्याकडून उत्तम काम करून घेणे, हे या विभागाचे मुख्य काम. चुकीच्या गुणवत्तेची माणसे नेमली गेली, की ती संस्था रसातळाला गेलीच म्हणून समजा.

व्यवस्थापनातील कार्यक्षेत्रांमध्ये आपण पारंगत असायला हवे, या कार्यक्षेत्रांमध्ये प्रामुख्याने उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात नियोजनापासून नियंत्रणापर्यंतची सर्व कामे येतात. प्रामुख्याने उत्पादन, विपणन, वित्त व्यवस्थापन, मानव संसाधन वा कर्मचारी व्यवस्थापन ही चार प्रमुख कार्यक्षेत्रे प्रामुख्याने आढळतात.

भारतातील मॅनेजमेंट शिक्षणाची सुरवात १९५४ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर ॲन्ड बिझनेस मॅनेजमेंट (IISWBM), कोलकता, जी भारतातील पहिली मॅनेजमेंट संस्था म्हणूनही ओळखली जाते.

१९५० च्या दशकात आंध्र, बाँबे, मद्रास आणि दिल्ली विद्यापीठांनी मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरू केले. १९६० नंतर आयआयएम कोलकता, अहमदाबाद सुरू करण्यात आले. उच्च दर्जाच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमुळे खूप कमी विद्यार्थ्यांना यात प्रवेश मिळत असे.

त्यामुळे नंतर देशपातळीवर अनेक छोट्या-मोठ्या शैक्षणिक संस्थांनी ‘यूजीसी’च्या परवानगीने मॅनेजमेंटचे एमबीए अभ्यासक्रम सुरू केले. त्या माध्यमातून लाखो तरुणांना एक हक्काचा देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला नावलौकिक मिळवण्यासाठी अभ्यासक्रम उपलब्ध झाला आहे.

सध्याच्या युगामध्ये पारंपरिक शिक्षणात कल दाखविण्यापेक्षा विद्यार्थी मॅनेजमेंट संबंधित विविध कोर्स अथवा डिग्रीमध्ये अधिक रस दाखवतात. यामध्ये प्रामुख्याने एमबीए पदवीधारकांना इतरांपेक्षा चांगली संधी असते.

नोकरीमध्ये एमबीए पदवीधारकांना प्राधान्य दिले जाते. एमबीए पदवीधरांना चांगली नोकरी तसेच उच्च पगार मिळतो. एमबीए पदवी हे व्यवस्थापन पदांसाठी प्रवेशाचे तिकीट असते, जे सामान्यतः उच्च पगाराचे असते.

सुरवातीचा पगार वार्षिक चार ते सात लाख असू शकतो. प्रतिष्ठित मॅनेजमेंट कॉलेजेस (IIM) कडून १५ ते २० लाखांचे वार्षिक पॅकेजही मिळू शकते. जसजसा अनुभव प्राप्त होतो, तशी आर्थिक प्रगती तर होतेच; पण पद व प्रतिष्ठाही मिळते.

सर्वसाधारणपणे सुमारे एकतृतीयांश ते निम्मे लोक करिअरच्या प्रगतीसाठी एमबीए करतात. करिअर प्रगती म्हणजे व्यवस्थापकीय पदांवर बढती, सामाजिक प्रतिष्ठा वाढवणे आणि (ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता) वाढीनुसार तशा संधीही उपलब्ध होतात.

अनेक व्यावसायिक करिअर बदलासाठी व्यवस्थापनाचे शिक्षणही घेतात. ‘करिअर चेंज’ म्हणजे एका क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते.

मॅनेजमेंटची पदवी केवळ त्यांच्यासाठी हा मार्ग खुला करत नाही, तर व्यवस्थापनाचे शिक्षण घेतल्याने ते व्यक्तिमत्त्व आणि आवडीसाठी कोणता उद्योग अधिक अनुकूल आहे, हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते.


हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एमबीए पदवी जगभरात मोठ्या प्रमाणावर ओळखली जाते. त्यामुळे तिचा उपयोग जगाच्या कोणत्याही भागात करिअर करण्यासाठी होऊ शकतो. चांगल्या व्यवस्थापन महाविद्यालयातून पदवीधर झालेले विद्यार्थी प्रमुख क्षेत्रांसाठी आणि बहुराष्ट्रीय संस्थांमधील अग्रगण्य व्यवस्थापकीय पदांसाठी योग्य ठरतात.

नोकरीच्या संधी शासकीय, निमशासकीय, खासगी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, छोट्या, मध्यम, मोठ्या अशा सर्वच प्रकारांच्या संस्थांमध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी लागतोच. यामध्ये शासकीय कार्यालये, कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था, विश्वस्त संस्था, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्रे, अशा सर्वांचा समावेश होत असल्याने नोकरीच्या विस्तृत संधी उपलब्ध आहेत.

शिवाय मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार संस्था, नोकरभरती करणाऱ्या संस्था अशा ठिकाणी तर या क्षेत्रातील प्रशिक्षित व तज्ज्ञ व्यक्तींची फार गरज असते. एमबीए (एचआर) चा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांमध्येही अशा व्यक्तींना प्राध्यापक म्हणून संधी मिळते.

काही वर्षांत मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रात अजून दोन प्रकारच्या संधींची भर पडली आहे. संगणकप्रणाली विकसित करणाऱ्या देश-विदेशी संस्थांना या ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती सल्लागार म्हणून लागतात.

तसेच सध्या मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रात संगणकाचा वापर दैनंदिन कामासाठी व विश्लेषणासाठी अत्यावश्यक झाला आहे, म्हणूनच मनुष्यबळ व्यवस्थापन व संगणकशास्त्र या दोन्हीचं एकत्रित ज्ञान असणाऱ्यांना विशेष संधी आहे.

संधी अत्यंत व्यापक स्वरूपात उपलब्ध आहे; पण काही स्किल म्हणजेच कौशल्य आपल्या अंगी असणेसुद्धा आवश्यक आहे किंवा ते वृद्धिंगत करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत. आपण प्राप्त केलेले ज्ञान आपण कसे वापरतो, यावरही आपल्या करिअरची शिडी उभी असते.

या क्षेत्रात यायचे, तर पदव्युत्तर पदवीशिवाय तुमच्याकडे काही गुणकौशल्ये असणेही अपरिहार्य आहे. तुम्ही उत्तम श्रोते, उत्तम वक्ते, भाषांवर प्रभुत्व असणारे, माणसांची त्वरित पारख करणारे, नम्रपणा, गोड शब्दात, पण ठामपणे व्यक्त होण्याची क्षमता असणारे,

उत्तम आणि संयमाने घासाघीस करणारे आणि मुख्य म्हणजे माणसांची कदर व आदर करणारे असणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT