Rajaram Pangavane esakal
सप्तरंग

दृष्टीकोन : आर्थिक साक्षरतेचे बदलते स्वरुप अंगीकारणे गरजेचे

सकाळ डिजिटल टीम

लेखक : राजाराम पानगव्हाणे- पाटील

फायनान्शिअल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता ही एक अत्यंत महत्वाची अशी संकल्पना आपल्यात रुजण्याची फार आवश्यकता आहे. या मतावर कदाचित काहींचा ‘इगो’ दुखावला जाऊ शकतो. ‘आता आम्हाला काय व्यवहारज्ञान पण येत नाही का’ ? असा शेराही येऊ शकतो किंवा तरुण पिढीतील अनेक जण म्हणतील की, ज्ञानाचा महासागर आज एका ‘क्लिक’वर आम्हाला उपलब्ध आहे.

आम्हाला पाहिजे ते आम्ही सहज जाणून घेऊ शकतो. त्यांचे म्हणणे बरोबर असू शकते. पण आज बदलत्या काळाबरोबर आर्थिक साक्षरता म्हणजेच फायनान्शिअल लिटरसी याचे स्वरूपही बदलत आहे. काही काळापूर्वी आर्थिक साक्षरता म्हणजे आपल्या पैशाची नियोजन, जमाखर्च ताळमेळ, येणारे उत्पन्न व त्यातून होणारा खर्च व भविष्यातील नियोजन.

थोडक्यात आपला पैसा आपण काळजीपूर्वक वापरणे यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आपल्याजवळ असणे, त्याचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता असे म्हटले जायचे. पण आता डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आर्थिक साक्षरता म्हणजे आर्थिक व्यवहार करताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी.

त्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत. तसेच त्याचे काही दुष्परिणामही आहेत. यामधून फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. तर यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याला सुद्धा फायनान्शियल लिटरसी असे म्हणता येईल. आर्थिक साक्षरता ही आज सध्या काळाची गरज आहे. याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. (saptarang latest marathi article by rajaram pangavane patil on Perspective Need to adopt changing form of financial literacy nashik news)

Financial Literacy

आर्थिक साक्षरतेचे बदलते स्वरुप अंगीकारणे गरजेचे

एक काळ असा होता, की लोकांना शिक्षणाचे महत्त्व म्हणावे तितके कळले नव्हते. याचाच फायदा काही सुशिक्षित लोकांनी उचलला व अनेक निरक्षर लोकांची फसवणूक केली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ५ मे १९८८ रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशन कार्यक्रमाला सुरुवात केली.

हेतू हाच की १५ ते ३५ वयोगटातील साक्षर करणे, त्यांना लिहिता वाचता येणे, आकडेमोड करता येणे. या योजनेचा फायदा असा झाला, की लोक जेवढे साक्षर तेवढे राष्ट्र उन्नतीला योगदान देतील. शिवाय त्यांची कोणी फसवणूक करणार नाही, असा दुहेरी फायदा होणार होता.

जसजसा काळ उलटत गेला तसतसे तंत्रज्ञान अद्ययावत होत गेले व बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार साक्षरतेचे स्वरूपही बदलले. साक्षरता तर आता डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन, टच स्क्रीनमुळे एका क्लिकवर आली आहे. त्यासाठी स्वतः हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी कायम अपडेट राहण्याची गरज आहे.

आर्थिक साक्षरता म्हणजे बजेट, इन्व्हेस्टिंग, क्रेडिट मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट यासारख्या फायनान्शियल कॉन्सेप्ट समजून घेण्याची आणि अप्लाय करण्याची क्षमता. आर्थिक साक्षरता ही पैसे हाताळण्याची क्षमता आहे.

आर्थिक साक्षरतेसाठी पैशांचे मूल्य, कम्पाउंड इंटरेस्ट, वार्षिक रिटर्न, संधी आणि खर्च यासारख्या मूलभूत आर्थिक संकल्पना समजून घेणे हा सुद्धा आर्थिक साक्षरतेचा भाग आहे. आर्थिक साक्षरता नसलेल्या व्यक्तींना मोठे आर्थिक निर्णय घेणे कठीण वाटते.

पैशांचे महत्त्व समजावून घ्या

प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच. तसेच प्रत्येक गोष्टींमधून पैसा कमवला जाऊ शकतो. जोपर्यंत पैशांचे महत्व समजत नाही. तोवर पैसे कमावण्यापेक्षा गमावण्याकडे अधिक कल असतो.

आई-वडील महिनाभराच्या खर्चासाठी जे पैसे देतात ते २–३ दिवसांत संपून जातात. कारण प्रत्येक गोष्टीची आपण पैशांमध्ये किंमत करत असतो. पण पैश्याची किंमत कशात मोजायची? हे कोणी समजावून सांगितलेले नसते! त्यामुळे पैसे कसे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे आणि का खर्च करायचे असे प्रश्न कधीच मनाला शिवत नाहीत.

सर्वांचे पैशांबद्दलचे मत असेच आहे. बऱ्याच मुलांना हे समजत नाही, की त्यांच्या पालकांनी पैसे कमावण्यासाठी किती कठोर परिश्रम केलेले आहेत. जोवर आई-वडिलांकडून खर्चासाठी पैसे मिळत असतात, तोपर्यंत आपल्याला त्याचे महत्त्व कळत नाही.

पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते, हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही. कोणत्याही गोष्टीचे महत्व समजण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रात धक्के खावे लागतात.

धक्के खाल्ल्याशिवाय आपल्या मेंदूला जाग येत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते. म्हणजेच आपला मेंदू सारासार विचार करू शकत नाही.

पैसे काय आहेत आणि पैशांच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो, पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे ही गोष्ट सुद्धा आर्थिक साक्षरतेमध्येच मोडते.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

आर्थिक परिस्थितीनुसार आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे का? आपण खर्च कमी करून पैसे कसे वाचवू शकतो याची जाणीव करून देणे गरजेचे आहे का? पैशांची बचत कशी करावी? ह्या सर्व गोष्टी आर्थिक साक्षरतेचे ज्ञान प्राप्त केल्यावरच समजतात.

आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हे जाणून घेणे आवश्यक आहे. पैशांची गुंतवणूक कोठे करावी, विविध वित्तीय साधने, विविध मालमत्ता इत्यादी बद्दलचे ज्ञान असल्यास आपण योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतो.

...हे तर समस्यांसाठी निमंत्रण

आर्थिक साक्षरतेचे ज्ञान आपल्याजवळ नसणे म्हणजे आर्थिक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे.जे उच्चशिक्षित श्रीमंत लोक असतात, ते सहसा आर्थिक साक्षरता ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. असे लोक सहसा आर्थिक समस्यांना टाळत असतात.

पैसा आणि शिक्षण हे माणसाच्या आयुष्यातील २ मोठे पैलू आहेत. परंतु ह्या दोन्ही पैलूंचा विचार केला तरी गरीब, श्रीमंत, तरुण किंवा वृद्ध, सर्वांनाच आर्थिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. बँक यातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे.

बँकेमध्ये व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. सध्या ऑनलाईनचे युग आहे. स्वतः बँकेत जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे जमा करणे अथवा बँकेतून विड्रॉल करणे एटीएमच्या माध्यमातून सोपे झाले आहे.

ही सर्व संसाधने वापरण्यासाठी फायनान्शिअल लिटरेसी अत्यंत आवश्यक आहे. पिन नंबर, पासवर्ड, एटीएम कार्ड, यूपीआय, स्कॅन, व्हर्च्युअल ऍड्रेस, आयएमपीएसएस, एनएफटी, आरटीजीएस असे अनेक प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत. त्याद्वारे आपण एका क्लिकवर पैसे पाठवू शकतो. पण हे व्यवहार करताना अत्यंत काळजी घ्यायला हवी.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अनोळखी व्यक्तीकडून आलेली फोनवरील लिंक ही ओपन करू नये. सर्वांनी कायम लक्षात ठेवायला हवे, घरातील मंडळींना सांगायला हवे की, कोणतीही बँक फोनवर कधीही माहिती मागत नाही.

आधार कार्ड, पॅन कार्ड, ओटीपी हे तर कधीच मागत नाही. क्षणिक प्रलोभन दाखवून तुमच्याकडून ही माहिती मागितली जाते व काही क्षणातच आपल्या खात्यातील रक्कम रिकामी होते, असे गुन्हे सध्या घडत आहेत. म्हणूनच ऑनलाईन व्यवहार करताना अत्यंत काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

सगळी प्रणाली असावी अपडेटेड

सध्या बहुतांश काम आपण आज ऑनलाईन करतो. पण यात फसवणून होण्याची शक्यता असते. यासाठी आपण स्वतः सर्वाधिक जबाबदार असतो. आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर सतत इंटरनेट वापरत असतो.

त्यामुळे नेहमी अद्ययावत अँटीव्हायरस प्रोग्रॅम आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्या ऑपरेटिंग सिस्टिम्स देखील अद्ययावत ठेवायला हव्या. पासवर्डचा वापर करताना बँक, सोशल अकाउंट्स, गुंतवणुकीच्या वेबसाइट्स इत्यादींचे पासवर्ड जतन अर्थात कायमस्वरुपी आपल्या सिस्टिमवर सेव्ह करू नये.

पब्लिक वायफायचा वापर करताना शक्यतो बँक, सोशल अकाउंट्स, गुंतवणुकीच्या वेबसाइट्स वापरू नयेत. अगदी खाजगी संगणक किंवा लॅपटॉप असला तरी ई-मेल्स लिंक खात्री असल्याशिवाय ओपन करू नये.

कॉम्प्युटरवरील काम झाल्यानंतर हिस्टरी क्लीन करून ठेवावी. या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज समाजातील सगळ्या स्तरातील लोकांसाठी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

(लेखक हे ब्रम्हा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT