Heena Gavit, Raksha Khadse, Dr. Subhash Bhamre, Girish Mahajan, Anil Patil, Ketki Patil, Unmesh Patil esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : जिंकेल त्याची जागा हेच असेल लोकसभेचे सूत्र

डॉ. राहुल रनाळकर

खानदेशातील लोकसभेच्या चारही जागा कायम राखणे हा भारतीय जनता पक्षापुढील सध्याचा अजेंडा आहे. त्यादृष्टीने भाजप वेगवेगळ्या माध्यमांतून सर्व्हेद्वारे जाणून घेत आहे.

यात भाजपला काही जागांबाबत थोडा दिलासा, तर काहींबाबत सतर्कता राखण्याचा संदेश मिळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने पर्याय शोधण्याची व्यवस्था सुरू केली आहे.

दुसरीकडे शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’तील फुटीनंतर या पक्षांपुढे निर्माण झालेली आव्हाने पाहता महाविकास आघाडी एकसंधपणे लढेल, तडजोड करेल यात शंका नाही, असे सध्याचे चित्र आहे.

खानदेशात भाजप काही ठिकाणी नवीन उमेदवारही देऊ शकतो, अशी चर्चा आताच सुरू झाली आहे. त्यामुळे खानदेशात भाजपला वेगळी रणनीती आखावी लागेल. (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar khandesh Lok Sabha)

लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आता मावळल्यात जमा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होतील किंवा नाही, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे.

त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून नियोजन करीत आहेत. किंबहुना, भाजपने यात नेहमीप्रमाणे आघाडी घेतली. गेल्या वर्षभरात राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षात फाटाफूट झाल्याने मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.

राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली, तर शिवसेनेतील शिंदे गटाकडे अनेक मंत्री व आमदार गेले. यात सर्वांत खानदेशाचा सहभाग मोठा राहिला आहे. शिंदे यांच्याकडे जळगावातील चार, तर धुळ्यातील एक आमदार गेले.

राष्ट्रावादीतील एकमेव आमदारही अजित पवार गटाबरोबर जात मंत्रीही झाले. या साऱ्या घडामोडींत अभेद्य राहिलेल्या भाजपची ताकद मजबूत झाली आहे, हे खरेच.

मात्र, भाजपला त्याचा निवडणुकीत कितपत फायदा होईल, यापेक्षा भाजपला ज्यांच्याबद्दल धास्ती वाटते, तेथे या बदललेल्या समीकरणांचा उपयोग करून जागा कायम कशा राखता येतील, याचीच चिंता जास्त आहे, आणि त्यासाठी नजीकच्या काळात मोठ्या घडामोडी या भाजपमध्येच घडणार असल्याचे संकेत आहेत.

त्याला कारणही भाजपने केलेले विद्यमान खासदारांच्या कामगिरीचे गुप्त पद्धतीने केलेले मूल्यमापन हे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाजपच्या सर्वेक्षणात नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावित यांची उमेदवारी तूर्तास कायम ठेवली जाणार आहे, मात्र तरीही भाजप येथेही पर्यायाचा शोध घेऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

धुळे लोकसभेची जागा आपल्याकडे राहावी, यासाठी भाजपला कठोर प्रयत्न करावे लागतील, असे समजते. त्याची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.

रावेरची जागा रक्षा खडसे यांच्यासाठी कदाचित भाजप की राष्ट्रवादी असा वैयक्तिक चॉईस ठरू शकते, अशीच स्थिती असण्याची दाट शक्यता आहे. जळगावची जागा राखण्यासाठीही भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागेल.

तेथे खासदार आणि आमदार यांच्यातील शीतयुद्ध भाजप जाणून आहे. शिवाय, खासदारांची मागच्या वेळेला असलेली अट भाजपने विधानसभा निवडणुकीत विचारात घेतली नाही, हेही जगजाहीर आहे.

या सर्व स्थितीमुळे केवळ मोदींचा करिष्मा हे सूत्र भाजपला येथे राबविता येणार नाही. जातीय समीकरणे आणि पुन्हा निवडून येण्याची खात्री या निकषांवरच उमेदवारी निश्चित होईल, हेच सध्याच्या हालचालींवरून दिसते आहे. यात जळगावसाठी कदाचित शिंदे गटाची मदत घेत भाजप उमेदवार देऊ शकतो.

महाविकास आघाडीची सध्याची स्थिती पाहता त्यांना या चारही जागांसाठी उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. नंदुरबारमध्ये कॉंग्रेसची स्थिती तशी जेमतेमच राहिली, तरीही कॉंग्रेसचे गतवेळचे उमेदवार के. सी. पाडवी यांना भाजप चुचकारू शकते.

धुळ्यातून कॉंग्रेसतर्फे आजमितीस निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार म्हणून दहिते कुटुंबीयांकडे पाहिले जाते. जळगावसाठी डॉ. उल्हास पाटील किंवा त्यांची कन्या केतकी पाटील यांचा ऐनवेळी विचार होऊ शकतो.

डॉ. पाटील रावेरसाठी इच्छुक आहेत, हेही लपून राहिलेले नाही. रावेरसाठी महाविकास आघाडीकडे रक्षा खडसे किंवा खुद्द माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावांचाही विचार राष्ट्रवादी करू शकते, तसे काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेही आहे.

या सर्व घडामोडींत भाजपही केवळ निवडून येण्याचा निकष उमेदवारीबाबत लावणार असल्याचे संकेत आहेत. महाविकास आघाडीतर्फे खासदार संजय राऊत यांनीही ‘जिंकेल त्याची जागा, उमेदवारीबाबत तडजोड केली जाईल, मतभेद जाहीर करायचे नाहीत’ असे कालच म्हटले आहे.

त्यामुळे दोन्ही पक्ष केवळ निवडून येण्याचे निकष या वेळी पाळणार आहे, हेच स्पष्ट होते. त्यामुळे जागा आणि उमेदवारांची अदलाबदल होणे हे अटळ आहे. त्यामुळेच लोकसभेची खानदेशातील निवडणूक अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT