Hemant Godse, Adv. Rahul Dhikle, Vijay Karanjkar, Adv. Nitin Thackeray, Ajay Boraste, Rajaram Pangavane, Dinkar Patil esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : जिंकेल त्याची जागा हीच भाजप, मविआची रणनिती

डॉ. राहुल रनाळकर

आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. लोकसभेसाठी सर्वच पक्षांची लगबग सुरु झाली आहे. गोपनीय अहवाल मागविले जात आहे. सर्वेक्षण सुरु झालेले आहेत. नाशिक लोकसभेसाठी प्रत्येक पक्ष दावेदारी सांगू लागला आहे.

दुसरीकडे उमेदवारांची चाचपणीही सुरु झालेली दिसते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेसने प्रथम जाहीरपणे नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला, त्यामुळे साहजिकच शिवसेना ठाकेर गटाने नाराजी व्यक्त करीत थेट उमेदवारही जाहीर करून टाकला.

आता महाविकासआघाडीतर्फे खासदार संजय राऊत यांनी जिकेल त्याची जागा असे जागावाटपाचे सूत्र असेल. मतभेद उघड करायचे नाही असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे ठरले असल्याचे सांगून उमेदवारीचे निकष स्पष्ट केले आहेत.

भाजपही साधारणतः याच वाटेने जाणार आहे, त्यामुळे भाजपही सावध पावले टाकत आहे. शिवसेना शिंदे गटाने अजूनही भूमिका मांडलेली नाही.

त्यामुळे सध्या केवळ लोकसभा निवडणूक हेच सूत्र ठेवून प्रत्येक पक्षांतील हालचाली सुरू आहेत, नजिकच्या काळात त्या अधिक टोकदार होतील यात संका नाही. (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar on loksabha election bjp strategy nashik)

विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र होण्याच्या सर्व शक्यता आत संपुष्टात आल्या आहेत. दुसरी म्हणजे गेल्या पावणेदोन वर्षांपासून लटकलेल्या अवस्थेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्त लागण्याची शक्यता अत्यंत धूसर बनली आहे.

अर्थात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका मार्गी लागल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगूल वाजू शकतो, तथापि, या संदर्भात कोणतीही तयारी नसल्याचे सर्वच पक्षातील वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या केवळ लोकसभा एके लोकसभा हीच घंचा सर्व पक्षांच्या पातळीवर ऐकू येते आहे.

सध्या जागा आणि उमेदवारांबाबत जी काही चर्चा आणि सर्व्हे सुरू झालेले आहेत, ते सगळे लोकसभेच्या अनुषंगाने जाणारेच आहेत. नाशिक लोकसभेचा विचार करता भाजपने सर्व्हेक्षणात आघाडी घेतल्याचं दिसते.

यामुळे सदैव निवडणुकीसाठी सज्ज असलेला पक्ष हे बिरुद भाजपानं सार्थ ठरविलं आहे, असेच म्हणायला हवं. भाजपाकडून साधारण चार ते पाच सर्व्हेक्षण केली जातात. प्राथमिक सर्व्हेक्षणात आमदार अॅड. राहुल ढिकले यांचे नाव पुढे असल्याचे संकेत मिळत आहे.

अॅड. ढिकले यांच्याकडे कानोसा घेतला असता ते लोकसभेसाठी फारसे इच्छूक नसल्याचे त्यांच्या गोटातील कार्यकर्ते खासगीत चर्चेत सांगतात. मुळात नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेचा असल्याने शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती वजन वापरतात, हा देखील महत्त्वाचा विषय आहे.

आत्तापर्यंत हेमंत गोडसे यांच्या संदर्भात फारशी सकारात्मकता दिसून येत नाही. गोडसे यांनी या संदर्भात कोणतेही भाष्य आजवर केलेले नाही. गोडसे यांना पर्याय म्हणून शिंदे गटातून अजय बोरस्ते यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता सूत्र वर्तवतात.

बोरस्ते हे लोकसभेसाठी उत्सुक असल्याचे त्यांचे निकटवर्तीय आवर्जून सांगतात. अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास अजय बोरस्ते त्याला कसा प्रतिसाद देतील, हे पाहणेही महत्त्वाचं ठरेल. भाजपाला दिनकर पाटील यांच्या नावावर विचार करायचा झाल्यास सर्व्हेक्षणातील निष्कर्ष बाजूला ठेवावे लागतील.

निवडून येण्याची क्षमता हा निकष दिनकर पाटील यांच्यासाठी लावणे योग्य ठरेल. अॅड. नितीन ठाकरे हे नाव राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून चर्चेत येण्याची शक्यता आहे. प्रसंगी भाजप देखील या निःस्पृह आणि निष्कलंक नावाचा विचार करु शकेल, अशी चर्चा आतील गोटात झडते.

महायुतीमत तिन्ही पक्षांची दावेदारी नाशिक लोकसभेसाठी असणे स्वाभाविक आहे. भुजबळ कुटुंबातील सदस्य सध्या लोकसभेच्या अनुषंगाने चर्चेत नाही. मात्र छगन भुजबळ यांच्या रणनितीच्या दृष्टीने विचार करता, शेवटच्या टप्प्यात ते चर्चेत निश्चितपणाने येतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिवसेना ठाकरे गटामध्ये मात्र उमेदवारीबाबत कोणतेही दोन प्रवाह नाहीत. भाजपामध्ये जसे दोन-तीन प्रमुख लोकांना तयारीला लागा, अशा सूचना येतात. उद्धव ठाकरेंनी नाशिकबाबत असे अजिबात केलं नाही.

विजय करंजकर यांची थेट उमेदवारी नाशिकसाठी त्यांनी घोषित केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस निश्चितपणे वाढू शकते. नाशिक शिवसेनेचं आहे, असे म्हणून उद्धव ठाकरेंनी हे पाऊल उचललं असावं, हे म्हणण्यास वाव आहे.

कमी ताकद असली तरी नाशिक लोकसभेवर काँग्रेसने देखील दावेदारी सांगितली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ नेत्यांच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे यांनी निवडणूक लढवावी, यावर एकमत देखील झाले. तसा ठराव वरिष्ठांकडे पाठवला गेला.

काँग्रेसमधील दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले पानगव्हाणे हे नंदुरबार लोकसभेचे समन्वयक आहेत. काँग्रेसनं निर्णय वरुन होणार असले तरी एकत्र काम हे तळागाळातील कार्यकर्त्यांना करायचं असतं, हे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष जाणून आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी या संदर्भात अजून भूमिका मांडलेली नाही. नाशिक लोकसभेचा विषय पुढे नेल्यास ठाकरे गटाची डोकेदुखी वाढू शकते.

महाविकास आघाडीसाठी सर्वांत जमेची बाजू अल्पसंख्यांक मते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे आणि काँग्रेसला पुढच्या काळात पावलं जपून टाकावी लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT