K S Azad esakal
सप्तरंग

एज्यु कॉर्नर : अचूक माहिती घेऊन निवडावे बोर्ड

सकाळ वृत्तसेवा

के. एस. आझाद

वेगाने बदलणाऱ्या शिक्षणाच्या क्षेत्रात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही मुलभूत बदल आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत. आपल्या पाल्यासाठी कोणते बोर्ड निवडणे अधिक संयुक्तिक ठरेल, याचा विचार पालक मंडळी करत असतात. कुठल्या बोर्डाचे कुठले फायदे आहेत, हे विशद करणारा हा लेख खास सकाळच्या वाचकांसाठी....

(saptarang marathi article by KS Azad on Edu Corner Board should be selected with accurate information nashik news)

सध्याच्या मितीस जग झपाट्याने बदलत आहे. यात सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे तंत्रज्ञानात होणारे वेगवान बदल होय. या बदलांपासून शिक्षण क्षेत्र देखील वेगळे नाही. समाजातील जवळपास सर्व घटकांना शिक्षणाचे महत्त्व देखील कळले आहे.

शिक्षण क्षेत्रात देखील अत्यंत वेगाने बदल घडत आहेत. जगाबरोबर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संशोधनात्मक शिक्षण प्रणाली ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काळात इंटरनॅशनल स्कूल ही संकल्पना उदयास आली आहे.

पण नेमकं इंटरनॅशनल स्कूल म्हणजे काय? हे समजून घ्यायला हवं. दोन-चार खोल्यांच्या शाळेलाही इंटरनॅशनल स्कूल नाव दिले जाते. इंटरनॅशनल स्कूलमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर होय.

यात प्रामुख्याने ग्राऊंड, डायनिंग, उच्चशिक्षित स्टाफ, रिसर्च बेस एज्युकेशन ऍक्टिव्हिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्सशी संबंधित विविध उपक्रमांचा समावेश होतो. इव्हेंट देखील जागतिक दर्जाच्या संस्थेची जोडलेले असावेत.

पेपरलेस संकल्पनेचा प्रचार करणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या शिक्षणाची आता गरज आहे. परदेशातील किंवा प्रगत देशातील शिक्षण तज्ज्ञांनी जरी भेट दिली, तरी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा असल्याचे त्यांना जाणवले पाहिजे.

थोडक्यात इंटरनॅशनल स्कूलमध्ये पायाभूत सुविधांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. इंटरनॅशनल स्कूलच्या पायाभूत सुविधा कशा असायला हव्या, याचा प्रयत्न आम्ही क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूल उभारताना केला आहे. आमचा ट्रेन स्टाफ आणि मोठ्या संख्येने असलेल्या पालकांची पसंती हे आम्ही यश मानतो. 

आपल्याकडे प्रामुख्याने एसएससी व सीबीएससी हे दोन बोर्ड आहे. देशपातळीवर आणि राज्याच्या पातळीवरील हे दोन बोर्ड आहेत. सध्याच्या युगात सीबीएससी शिक्षण पद्धतीला पालक प्राधान्य देताना दिसून येतात.

सीबीएसईमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकासाकडे विशेष असे लक्ष पुरविलेले आहे. जगाच्या स्पर्धेत ही मुले सक्षमपणे कसे उभे राहतील, हे सीबीएससीच्या माध्यमातून प्रकर्षाने पाहिले जाते.

त्यामुळे संशोधन करुन केंद्र शासनाने सीबीएसईचा अभ्यासक्रम देशभर लागू केला आहे. वास्तविक दोन्ही बोर्डांचे शिक्षण हे चांगलेच आहे. शिक्षणाची काठिण्य पातळी सीबीएसईमध्ये अधिक आहे. राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय असा फरक ठोबळमानाने मानता येऊ शकतो. 

पालक शाळा निवडतांना,“बोर्ड कुठले आहे”? हा हमखास प्रश्न विचारतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीमध्ये प्रवेश घेतांना तुमची अमुक अमुक बोर्डची शाळा आहे का? नर्सरी पासुनच बोर्डचा अभ्यासक्रम शिकवतात ना..? टिचर्ससुध्दा अमुक अमुक बोर्ड मधुनच पास झाले ना?.. या आणि या संदर्भात असंख्य प्रश्न पालक विचारत असतात.

खरं तर पालकांचा यात काहीही दोष नाही. बोर्ड निवडीवरुन समाजात बऱ्यापैकी गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे पालक देखील संभ्रमावस्थेत नसले तरच नवल. बोर्ड आणि त्याचा संबंध शैक्षणिक प्रगतीशी लावून त्यातूनही अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. 

 भारत सरकारच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत सीबीएसई शैक्षणिक बोर्ड आहे. एसएससी किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा ही राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतात. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सीबीएसईसाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. तर एसएससीसाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सध्या असे म्हटले जाते की, सीबीएसई अभ्यासक्रम एसएससीपेक्षा चांगला आहे. सीबीएसईत एकाग्र अभ्यासक्रमाचा भर असतो. याचा अर्थ एका वर्षात शिकविलेले विषय मागील वर्षाच्या निरंतर असतात.

किंवा असेही म्हणता येईल की, प्रत्येक विषय मागील वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुढे एक पाऊल असते. उदाहरणार्थ सहाय्यभूत शक्ती, दबाव आणि हालचाल आदी विषयांचा समावेश होतो. स्टेट बोर्ड हे ठराविक राज्यांपुरते मर्यादित असते.

जसे की महाराष्ट्रात महाराष्ट्र बोर्ड आणि उत्तर प्रदेश बोर्ड वैगरे. सीबीएसई ठराविक राज्यापुरती मर्यादित नसून ते संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना एकसमान अभ्यासक्रम उपलब्ध करुन देतात. 

विविध राज्यांचे विविध स्टेट बोर्ड असल्यामुळे प्रत्येक राज्यातील ठराविक इयत्तेच्या अभ्यासक्रमात विविधता आढळून येते. या उलट संपूर्ण भारतात जेथे-जेथे सीबीएसई केंद्र आहे, तेथे समान अभ्यासक्रम असतो. 

सीबीएसई आणि स्टेट बोर्ड हे विविध नीती नियमांनी स्वतःची कार्य चोखपणे पार पाडत असतात. सीबीएसई बोर्ड संपूर्ण देशात कार्यरत असले तरी, सीबीएसईला स्टेट बोर्ड आणि स्टेट बोर्डला सीबीएसईमध्ये हस्तक्षेप करता येत नाही.

स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत अगदी कमी प्रमाणात बदलला जातो. सीबीएससी अभ्यासक्रमाचा सर्वसाधारणपणे उद्देश विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा त्याग न करता तणावमुक्त आणि व्यापक असे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, हा आहे. राष्ट्रीय लक्ष्य साधण्यासाठी शालेय शिक्षणाला चालना देणे आणि विविध उपाययोजना सुचवणे.

शिक्षकांमधील कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबवणे. देशात जास्तीत-जास्त शैक्षणिक संस्था संलग्न करणे. बहुतेक पालक सीबीएसईला प्राधान्य देतात कारण स्पर्धात्मक आणि प्रवेश परीक्षांसाठी सीबीएसई अभ्यासक्रम अधिक उपयुक्त ठरतो. 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रीसर्च अॅण्ड ट्रेनिंगने अभ्यासक्रमाची स्थापना सीबीएसईसाठी केली आहे. तर राज्य शिक्षण मंडळ एसएससीसाठीही अभ्याक्रम तयार केला आहे. या मंडळाच्या अंतर्गत शिक्षण अभ्यासक्रम अत्यंत कठीण आणि राज्य मंडळापेक्षा उच्च दर्जाचा आहे.

हे मंडळ भारत सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे संपूर्ण भारतभर या मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे. या मंडळांतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमाशी खूप चांगले जोडू शकतात आणि त्यांना अनुकूल वातावरणात अभ्यास करणे सोपे जाते.

या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचे प्रश्न विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सोडविण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे मिळू शकतात. ही दोन्ही मंडळे जरी वेगळी असली तरी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण पद्धतीत स्वतंत्रपणे शिक्षणाचा प्रसार करत आहेत. सीबीएसई अंतर्गत शिकणारे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा जसे की जेईई, नीट, यूपीएससी इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवू शकतात.

या शिक्षण पद्धतीचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असल्याने मुले भारतातील कोणत्याही शाळेत सहज शिकू शकतात. या शिक्षण पद्धतीचा दर्जा अतिशय उच्च आणि दर्जेदार असल्याने विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप मदत मिळते. 

या दोन्ही बोर्डांबाबत विविध पैलू समोर येतात. समंजस आणि जागरूक पालक या नात्याने योग्य बोर्ड निवडण्याची जबाबदारी ही पालकांची आहे. बोर्डांच्या कार्यपद्धती आणि भविष्यातील संधींच्या अनुषंगाने ही माहिती उपयुक्त ठरली असेल. आपल्या पाल्याच्या सुयोग्य भवितव्यासाठी योग्य निवड निश्चितच फायदेशीर ठरु शकते. 

(लेखक क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

Ratan Tata Passed Away: टाटांच्या जाण्याने अदानी, अंबानी, महिंद्रा भावुक; भावनांना वाट मोकळी करुन देत वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना

SCROLL FOR NEXT