Devdendra Fadanvis with Rajumama esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : जळगावातील रस्ते अन् राजूमामांचा मास्टरस्ट्रोक !!

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची होणारी कमालीची गैरसोय नजिकच्या भविष्यात दूर होणार आहे. वृत्तीने चिवट पण मनानं साधा असलेला आमदार जळगावकरांना लाभला. आमदार राजूमामा भोळे यांच्यामुळे अखेर रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे.

जळगावचे रस्ते पुन्हा व्यवस्थित होऊ शकतात, ही आशा जवळपास संपुष्टात आलेली असताना राजूमामा भोळे यांच्या चिवट पाठपुराव्यामुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नेतृत्त्वामुळे जळगावकरांना ही भेट मिळाली आहे.

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर भर उन्हाळ्यात शीतल लहरींचा अनुभव जळगावकर नक्कीच घेत आहेत. राजूमामांचा हा मास्टरस्ट्रोक भल्याभल्यांना धोबीपछाड देणारा आहे.

एरवी रस्त्यांच्या विषयावरुन टीकेची संधी आम्हीही सोडली नाही, आता मात्र राजूमामांचे कौतुक व्हायलाच हवं. (saptarang marathi article by sahyadricha matha by dr rahul ranalkar on Roads in Jalgaon and Rajumama Masterstroke)

जळगावच्या रस्त्यांबाबत इथल्या लोकांनी सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. शहरातील प्रमुख रस्त्यांचे नियोजन सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करुन एक अंतर्गत लढाई राजूमामांनी आधीच जिंकलेली होती. त्याचा फायदा आता नक्कीच होणार आहे. मागे

महाविकास आघाडीचे सरकार पहिले अडीच वर्षे राज्यात होते. शिवाय कोविडमुळेही परिस्थिती नाजूक होती. इकडे संपूर्ण जळगाव अमृतमयी खोदकामाचे चटके सोसत होते. आमदार भोळे हे तेव्हा विरोधी पक्षात असल्यानं दादपुकारा घ्यायला कोणी तयार नव्हते.

शिंदे-फडणवीस सरकार आले आणि आमदार पुन्हा दुप्पट वेगाने सक्रिय झाले. सर्व आवश्यक रस्त्यांच्या मोजणीपासून ते खर्चाचे अंदाज काढण्यात आले. प्रत्येक एरियासाठी स्वतंत्र टीम तयार करुन त्या माध्यमातून दुरावस्था किती आहे, याचा लेखाजोखा हाती घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांची मदत या सगळ्या कामात घेण्यात आली. 

मधल्या काळात संपूर्ण टीका सोसणारे राजूमामा भोळे हे एकमेव लोकप्रतिनिधी होते. बाकी सगळेच या प्रकरणातून अंग काढून घेत होते. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अगदी स्वपक्षातील लोकही त्यांच्याकडे बोट दाखवायला मागे पुढे पाहत नव्हते.

मामा हे मुळचे कुस्तीगीर असल्यानं त्यांच्यातील संयमीवृत्ती इथं कामी आली असावी. टीकेला फारसे उत्तर देण्यापेक्षा कामावर त्यांनी भर दिला. नवे सरकार स्थानापन्न होताच, पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला.

राजूमामांशी पक्षीय, वैचारिक वाद काही नेत्यांचे असले तरीदेखील त्यांच्या काम करण्याच्या प्रवृत्तीला सगळेच दाद देतात, ही बाब त्यांनी शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी मिळवून दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे टीकेला सामोरं जाण्यासाठी एकमेव आमदार भोळे आणि आता श्रेय घेण्यासाठी होणारी धावपळ, तारांबळ पाहून राजकीय मंडळींची कीव आल्याशिवाय राहत नाही.

टीका करताना थेट आणि कौतुक करताना मनमोकळं राहण्याचा काळ आता संपुष्टात आला आहे. मात्र जनतेची नाळ अचूक ओळखलेल्या राजूमामांचं जनसामान्यांमधील नेटवर्क उत्तम आहे, त्यामुळे मामा, काळजी करु नका ! रस्तेप्रश्नी नागरिक तुम्हालाच धन्यवाद देतील.   

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जळगावची रस्त्यांची परिस्थिती किती भीषण आहे, ही वस्तुस्थिती राजूमामा भोळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजावून सांगितली. उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यातील नेमकी गरज हेरली, ही बाब देखील कौतुकास्पद आहे.

जळगावकरांच्या मनातील सुखद भावना नक्कीच फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचतील. आता गरज आहे, ती रस्त्यांची वेगवान कामं होण्याची. पुढच्या सहा महिन्यांत जळगाव शहरातील प्रत्येक भागाचा चेहरामोहरा बदलेला असेल. मात्र, हे करत असताना अचूक नियोजन होणं गरजेचं आहे.

आधी ४४ कोटींचा निधी कोणत्या विशिष्ट प्रभागांमध्ये गेला आणि गेला तरी तिथल्या रस्त्यांचं नेमकं काय झालं, हा संशोधनाचा विषय आहे. थोडक्यात सांगायचं तर आता जिथं गरज आहे, तिथं योग्य रितीनं निधी पोहोचावा, त्यात पक्षीय भेदभाव असता कामा नये.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कामांचा दर्जा उत्तम राखला जाईल, याची खबरदारी गुणनियंत्रण समिती आणि संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी घ्यायला हवी. जळगावकर आणि रस्ते हे दोन्ही घटक आता मोकळा श्वास घेतील, त्याबद्दल राजूमामांचे, भाजपाचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन सगळ्यांनीच करायला हवं... 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT