prajakta gaikwad 
सप्तरंग

‘व्यायामात खंड नाहीच’ (प्राजक्ता गायकवाड)

प्राजक्ता गायकवाड

मी व्यायाम कधीच चुकवत नाही. चित्रीकरण करून रात्री दहा वाजता घरी आले, तरी जिममध्ये जाते. तसंच रात्री वेळ मिळाला नाही, तर पहाटे पाच वाजताही व्यायाम करते. खरंतर फिटनेससाठी मी हाएस्ट वर्कआऊट करत असते. दोन्ही वेळच्या व्यायामामध्ये मी १२ तासांचे अंतर ठेवते. त्यामुळं मसल्स रिलॅक्‍सेशनही होतं.

अभिनयाच्या क्षेत्रात असल्यामुळं आमचं वेळेचं गणित खूपच व्यग्र असतं. अनेकदा दिवसभर अन् रात्रीही चित्रीकरण असतं. त्यातच मी कॉलेजही करत आहे. त्यामुळं अभ्यासाचा ताणही असतो. कधीकधी सकाळीच पुण्याहून मुंबईला चित्रीकरणासाठी जावं लागतं आणि पुन्हा चित्रीकरण संपल्यानंतर रात्रभर प्रवास करून पुण्यात यावं लागतं. त्यामुळं जेवणासह झोपण्याच्या वेळा पाळणं खूपच अवघड जातं. या सर्व गोष्टी ‘कट टू कट’ करताना खूपच कसरत करावी लागते; पण मी व्यायाम कधीच चुकवत नाही. चित्रीकरण करून रात्री दहा वाजता घरी आले, तरी जिममध्ये जाते. तसंच रात्री वेळ मिळाला नाही, तर पहाटे पाच वाजताही व्यायाम करते. खरंतर फिटनेससाठी मी हाएस्ट वर्कआऊट करत असते. दोन्ही वेळच्या व्यायामामध्ये मी १२ तासांचे अंतर ठेवते. त्यामुळं मसल्स रिलॅक्‍सेशनही होतं.

चित्रीकरणामुळं जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात. अनेकदा जेवणाचं गणित बिघडतं; पण मी बाहेर पडताना घरातलं जेवणच घेऊन जाते. मला साउथ इंडियन आणि चायनीज पदार्थ खूप आवडतात; पण तेही आवाक्‍यातच खाते. मी तेलकट पदार्थ जास्त खात नाही. दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी पित असते. वेगवेगळे ज्यूसही पिते. पाण्याइतकंच महत्त्व फळांनाही आहे. त्यामुळं दोन्ही गोष्टी सर्वांसाठी खूपच गरजेच्या आहेत. पाणी आणि फळांमुळं आपली त्वचा आणि केस चांगले राहतात.
शरीरसंपदेसाठी अनेक गोष्टी करण्याची गरज असते. पाणी आणि फळांचंही त्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी बाह्यरूपाला महत्त्व देत नाही. अंतर्मन खूपच महत्त्वाचं असतं. ते स्वच्छ अन् निर्मळ ठेवणं खूप गरजेचं आहे. व्यायामासाठी खरंतर वेळापत्रक ठरलं पाहिजे. दिवसातून आपण व्यायामासाठी वेळ दिलाच पाहिजे. त्यासाठी कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्यानुसार आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकदा अपघात होतात. त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी होतात. काही जणांचा त्यात मृत्यू होतो. त्यामुळं आपण वेळच्या वेळी फिटनेसकडं लक्ष दिलं, तर जखमा वा आजार लवकर बरा होतो. त्रासही जास्त होत नाही. त्यामुळं दिवसातल्या २४ तासांमध्ये आपण आपल्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. आहाराची आणि आरोग्याची काळजीही घेतलीच पाहिजे.

मनःशांतीसाठी मेडिटेशन
धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला मनशांतीची गरज आहे. त्यासाठी मी मेडिटेशन करते. प्रत्येकानंच दिवसभरातून दहा मिनिटं मेडिटेशनसाठी दिलीच पाहिजेत. कारण ते स्वतःसाठी असतं, दुसऱ्यासाठी नसतं हेही लक्षात ठेवावं. प्रत्येकानं फिट म्हणजे फक्त शरीरापुरतंच राहायला नको. शारीरिक अन् मानसिकदृष्ट्या फिट राहणं गरजेचं असतं. त्यामुळं व्यायामाबरोबरच मेडिटेशनही प्रत्येकासाठी गरजेचं आहे अन् ते सर्वांनीच न चुकता करावं.

व्यायाम करताना मी मोहित सरांचं मार्गदर्शन घेते. ते मला नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळं मला माझ्या फिटनेसकडे लक्ष देता येतं. त्याचप्रमाणं मी माझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यावेळी माझे चाहतेही मला प्रोत्साहन देतात. त्याचाही फायदा मला होतो. व्यायामाबरोबरच मी योगासन आणि प्राणायामही करते. कारण तेही आपल्या आयुष्यात खूपच महत्त्वाचं आहे. अनेकदा माझे चाहते व्यायामासाठी वेळेचं गणित कशी जुळवतेस, असं विचारतात अन् मी कधीही व्यायामात खंड पडू देत नाही हे ऐकून आश्‍चर्यचकित होतात.

मी सध्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये महाराणी येसूबाई यांची ऐतिहासिक भूमिका साकारत आहे. या मालिकेत सुरवातीच्या काळामध्ये मी खूप सडपातळ दिसत होते; पण त्यानंतर पुढच्या भागांमध्ये मला खंबीर, भारदस्त व्यक्तिमत्त्व दिसण्यासाठी शरीरयष्टीमध्ये बदल करणं गरजेचं होतं. त्यासाठी मला वजन वाढवावं लागलं. त्यासाठी मला सेटवर सर्वजण खूपच खाऊ घालत होते. त्यातच इतकी चॉकलेट्‌स देत होते, की माझी हौसच झाली. चॉकलेटमधून मला प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स मिळाली. त्याचा फायदा वजन वाढण्यासाठी झाला. त्याचप्रमाणं एनर्जीही मिळत होती. सकाळी उठल्यानंतर अंडीही उकडून खात होते. हे करत असतानाच मला लाठीकाठी, घोडेस्वारी, ढाल-तलवार या गोष्टींबाबतही काम करावं लागत होतं. त्यामुळं माझी खूप धावपळ होत होती. त्यातून खूपच एनर्जी निघून जात होती. त्यामुळं भरपूर भूक लागून मी खूप खात होते. जोडीला चॉकलेट्‌सही होती. खरंतर येसूबाईंच्या भूमिकेसाठी मी जीव ओतून काम केलं. माझ्या फिटनेसकडंही लक्ष दिलं. त्यामुळं मला ही ऐतिहासिक भूमिका साकारताना चांगला अनुभव आला. विशेष म्हणजे या मालिकेला रसिक प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतलं. त्यामुळं आपण घेतलेल्या कष्टाचं चीज झालं.

माझ्या आहारावर आईच खूपच बारकाईनं लक्ष असतं. ती माझ्यासाठी खूपच तत्पर असते. चित्रीकरणामुळं माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा अनेकदा बिघडतात. मात्र, घरातून बाहेर पडताना आई मला डबा दिल्याशिवाय सोडत नाही. माझ्या आहारात प्रोटिन्स, उकडलेली कडधान्यं, गूळ-तुपाचा समावेश कसा होईल, याचा विचार ती करते. या गोष्टी थंडीमध्ये खूपच गरजेच्या आहेत. त्या गोष्टींवर आईचं खूपच बारकाईनं लक्ष असतं. माझे मित्र-मैत्रिणीही माझ्या व्यायामाकडं लक्ष देतात. मला सल्लेही देतात. मी सोशल मीडियावर फोटो अपलोड करते, त्यावेळी कॉमेंटच्या माध्यमातून मला सल्लेही देतात. येसूबाईंच्या भूमिकेसाठी मी खूप कष्ट घेतले; पण त्याला यश आलं. एवढी मोठी भूमिका साकारण्याची संधी मला मिळाल्याचं शेवटी चीज झालं. प्रेक्षकांनी ही मालिका अक्षरशः डोक्‍यावरच घेतली. त्यामुळं मी घराघरांत पोचले, याचा आनंद आहे. खरंतर यासाठी मी रसिकमायबापांचे अन् माझ्या चाहत्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. हे सगळं त्यांच्यामुळंच घडतंय.

रनिंग, सायकलिंगचीही आवड
मी रनिंगही करते. सायकलिंगही आवडतं. मला पोहण्याचा छंद आहे. विशेष म्हणजे मी शाळेत असताना खूप मैदानी खेळ खेळले आहे. तेव्हापासूनच माझ्यात खिलाडूवृत्ती आहे. कराटेही मला आवडतं. त्यामुळं माझ्यासाठी फिटनेस हे टार्गेट होऊच शकत नाही. कारण पहिल्यापासूनच माझं शरीर खेळाडूसारखं बनलेलं आहे. मला खेळ खेळायला आवडतात. बॅडमिंटनही मी खेळते. क्रिकेट हा माझा आवडता खेळ असून विराट कोहली हा आवडता खेळाडू आहे.

खरंतर मी फिटनेसबाबत कुणालाही आदर्श मानत नाही. तुम्हीच तुमचे आदर्श असता. आपलं शरीरच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगतं. आपण काय करावं अन् काय करू नये, याचा सल्ला आपलं मन देत असतं. कुणासारखी बॉडी बनवायचीय किंवा झिरो फिगर करायचीय, याकडं लक्ष देऊ नका. आपल्याला अन् आपल्या शरीराला ज्या गोष्टी आवश्‍यक आहेत, त्याकडं लक्ष द्या. त्यानुसार प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घ्या. दिवसभरात स्वतःसाठी वेळ काढा अन् व्यायाम करा. तुम्हाला त्याचे फायदे आयुष्यभर होत राहतील, यात तिळमात्रही शंका नाही. फिट राहावं हा विचार माझ्या मनात पहिल्यापासून आहे. ही गोष्ट मी सोशल मीडियावरही कायम शेअर करत असते. त्याचप्रमाणं फिटनेस आणि एक्‍सरसाईजचे फोटो अपलोड करून माझ्या चाहत्यांना व्यायामासाठी प्रोत्साहन देण्याचं कामही करत असते. त्यामुळं प्रत्येकानं आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी व्यायाम, योगा आणि प्राणायामासाठी वेळ दिलाच पाहिजे.
(शब्दांकन ः अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT