sayali kshirsagar 
सप्तरंग

गेम्सच्या जादुई दुनियेत! (सायली क्षीरसागर)

सायली क्षीरसागर

वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सनी सगळ्यांना वेड लावलं आहे. कॉंप्युटर, स्मार्ट फोन, टॅब अशा उपकरणांचा वापर करून या गेम्स खेळता येतात. या गेमिंगमधल्या काही महत्त्वाच्या घटकांची ओळख...

लहानपणापासूनच सगळ्यांच्या, विशेषकरून मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं होतं ते व्हिडिओ गेम्सनी! थोडंफार कळायला लागल्यावर आई-वडिलांकडं गेम्ससाठी हट्ट करणं, मागं लागून ते विकत घ्यायला लावणं, गेम्सच्या कॅसेटची अदलाबदल करणं हा एके काळी उन्हाळ्याच्या सुट्टीतला कार्यक्रम असायचा! मात्र, तंत्रज्ञानात बदल होत गेले, तसतसं या व्हिडिओ गेम्सचं स्वरूपही काळानुसार आणि गरजेनुसार बदलत गेलं. तंत्रज्ञानाच्या जादूमुळं आता हे गेम्स अगदी सहजरित्या आपल्या हातातल्या स्मार्ट फोनवरही उपलब्ध होतात.

भारतात साधारण 1990च्या दशकात व्हिडिओ गेम्सना सुरवात झाली. मधल्या काही काळात लहान मुलं असलेल्या घरांत व्हिडिओ गेम्स हमखास दिसायचेच. व्हिडिओ गेमचा सेट टीव्हीला जोडून गेम्स खेळता यायचे. एका वेळी दोघांना दोन वेगवेगळ्या रिमोटनं गेम खेळता येईल अशी सुविधा यात उपलब्ध होती. त्याचबरोबर गेमिंग झोनमध्ये जाऊनही कमी पैशांत हे गेम्स खेळता यायचे. त्यावेळी "मारिओ', "कॉन्ट्रा', "डेव्ह' हे काही प्रसिद्ध गेम्स होते.

कालांतरानं या व्हिडिओ गेम्सची जागा घेतली कॉंप्युटरनं! हवे ते गेम आपल्या कॉंप्युटरमध्ये इन्स्टॉल करायचे आणि हवे तेव्हा खेळायचे. "रोडरॅश', "डेव्ह', "नीड फॉर स्पीड', "मारिओ', "काऊंटर स्ट्राईक', "जीटीए व्हाईस सीटी', "फिफा', "क्रिकेट' आदी गेम्सची त्या काळात चलती होती. त्यानंतर या गेम्सची अनेक नवनवीन व्हर्जन्सही उपलब्ध झाली. याच वेळी कॉंप्युटरवर खेळला जाणारा सर्वांत लोकप्रिय गेम म्हणजे सोलिटेअर. पत्त्यांचा हा गेम अगदी लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता होता. या सर्व गेम्स तयार करण्यासाठी व्हिज्युअल स्टुडिओ, फोटोशॉप, थ्री-डी मॅक्‍स, ब्लेंडर अशा काही सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. तसंच कॉंप्युटरमध्ये या गेम्सचा सेटअप इन्स्टॉल केला, की ते गेम्स खेळण्यासाठी उपलब्ध होतात. तसंच या गेम्स व्यवस्थित चालण्यासाठी चांगल्या कॉन्फिगरेशनची गरज असते.

याच काळात मोबाईलच्या तंत्रज्ञानातही क्रांती झाली. मोबाईलच्या बेसिक मॉडेलमधले गेम्स खेळायलाही अनेकांना आवडायचे. आता त्याचं रूपांतर स्मार्ट फोनमध्ये झालं आहे. मोबाईलमधील गेम्स लोकप्रिय व्हायला 2008 मध्ये सुरवात झाली. स्मार्ट फोन, टॅब, ई-पॅडवर प्ले-स्टोअरवरून हवा तो गेम डाऊनलोड करता येऊ लागला. स्मार्ट फोनवरच्या गेम्सचं समांतर जग तयार झालं असून, आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्‍या मोठ्या प्रमाणात गेम्सच्या तंत्रज्ञानात क्रांती झालेली दिसते. गेमिंग तंत्रज्ञानातल्या काही घटकांची माहिती आपण घेऊ.

ग्राफिक्‍स : सर्वच गेम्समध्ये त्या गेमचं ग्राफिक्‍स हा अतिशय प्रमुख घटक असतो. ज्या कंपन्या गेम्सच्या व्यवसायात अग्रगण्य आहेत, त्यांनी आपल्या ग्राफिक्‍सवर सर्वांत जास्त खर्च केलेला आहे. ग्राफिक ही त्या गेमची ओळख असते. त्यात कोणत्याही गेमला लोकप्रिय बनवण्याची ताकद असते. गेम खेळणाऱ्याला केवळ ग्राफिक्‍सनं आकर्षित केलं, तरी त्या गेमला यश मिळतं.

फेशिअल रेकग्निशन : काही गेम्समधली पात्रं काही वेळा तुम्हाला हुबेहूब तुमच्यासारखी दिसतात. ही फेशिअल रेकग्निशनची किमया. त्यामुळं तुमचा त्या गेममधला रस वाढतो. काही 3-डी टेक्‍नॉलॉजीमध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे हावभावही स्कॅन होऊन टिपले जातात. हे तंत्रज्ञान ग्राहकांना आपल्या गेमकडं आकर्षित करण्यासाठी वापरलं जातं.

व्हॉईस रेक्‍गनिशन : काही वेळा केवळ तुमच्या आवाजानं तुम्ही गेमवर नियंत्रण मिळवू शकता. खेळताना काही आदेश, आज्ञा द्यायच्या असतील, तर त्यासाठी कोणत्याही बटनांऐवजी फक्त तुमच्या आवाजाचा वापर करू शकता. कॉंप्युटर आणि स्मार्ट फोनमध्ये व्हॉईस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो, जेणेकरून तुमच्या आवाजानंही तुम्ही गेम खेळू शकता.

व्हर्चुअल रिऍलिटी : व्हर्चुअल रिऍलिटी ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं झालेली सर्वांत मोठी प्रगती. याचा गेमिंगमध्ये योग्य वापर करून अनेक कंपन्यांनी आपल्या गेमला लोकप्रिय बनवलं आहे. व्हर्चुअल रिऍलिटीचा हेडसेट वापरून तो गॉगलप्रमाणं लावून गेम्स खेळता येतात. या सेटमुळं आभासी दुनियेची निर्मिती होते आणि आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष असल्याचा भास होतो.

ऑगमेंटेड रिऍलिटी : ऑगमेंटेड रिऍलिटीमध्ये गेम्समधली ठिकाणं ही आपल्या आजूबाजूची आणि खरी राहतात. त्यामुळं या गेममध्ये ग्राफिक्‍स न दिसता प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूची ठिकाणं दिसतात. प्रत्यक्ष परिस्थितीशी मिळतीजुळती अशी ठिकाणं या गेममध्ये तयार होतात आणि खेळणाऱ्याचा गेममधला रस वाढतो. यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

क्‍लाऊड गेमिंग : क्‍लाऊड गेमिंगमध्ये कोणताही गेम हा एकट्यापुरता मर्यादित न राहता क्‍लाऊड तंत्रज्ञानाशी जोडून त्याला अनेक सर्व्हर जोडता येतात. त्यामुळं एकापेक्षा जास्त लोक यावर गेम खेळू शकतात. एका वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सर्व्हरवरून क्‍लाऊड गेमिंगद्वारे अनेक जण गेम खेळू शकतात. हा पर्याय सातत्याने गेम खेळणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर गेमचं लाइव्ह स्ट्रीमिंगही करता येतं.

काही लोकप्रिय गेम्स : "पबजी', "फिफा 19', "एनएफएस मोस्ट वॉंटेड', "मार्व्हलस स्पायडरमॅन', "ड्रॅगन बॉल फायटर झेड', "द वॉकिंग डेड', "शॅडो ऑफ द टॉम्ब रायडर', "इम्मोर्टल अनचेन्ड', "आयर्न ब्लेड', "किंग ऑर्थर लिजेंड ऑफ स्वॉर्ड.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT