Recipes for life book sakal
सप्तरंग

आईबद्दलची कृतज्ञता वेगळ्या माध्यमातून...

स्वयंपाकघर आणि आई हे समीकरण प्रत्येक घरात गृहीतच धरलं जातं. आईच्या हातचं जेवण म्हणजे काही खाद्यपदार्थांचं एकत्रीकरण नसतं, तर तिच्या आपल्याबद्दलच्या व्यक्त-अव्यक्त भावनांचा तो परिपाक असतो.

शीतल पवार

स्वयंपाकघर आणि आई हे समीकरण प्रत्येक घरात गृहीतच धरलं जातं. आईच्या हातचं जेवण म्हणजे काही खाद्यपदार्थांचं एकत्रीकरण नसतं, तर तिच्या आपल्याबद्दलच्या व्यक्त-अव्यक्त भावनांचा तो परिपाक असतो.

स्वयंपाकघर आणि आई हे समीकरण प्रत्येक घरात गृहीतच धरलं जातं. आईच्या हातचं जेवण म्हणजे काही खाद्यपदार्थांचं एकत्रीकरण नसतं, तर तिच्या आपल्याबद्दलच्या व्यक्त-अव्यक्त भावनांचा तो परिपाक असतो. त्यामुळेच आईच्या हातच्या स्वयंपाकाभोवती आपल्या प्रत्येकाच्या अनेक आठवणी असतात. खरंतर आठवणींचा हा कप्पा अनेकांसाठी इतका गृहीत धरला जातो की, या आठवणींचं एक पुस्तक असावं ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ''Recipes for Life'' अर्थात ‘रेसिपीज फॉर लाईफ’ या पुस्तकाचं लिखाण करणाऱ्या लेखिका सुधा मेनन यांचं अभिनंदनच करायला हवं.

‘रेसिपीज फॉर लाईफ’ या आपल्या पुस्तकात सुधा मेनन स्वतःची आई आणि सासूच्या पाककलेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतातच, शिवाय वाचकांसाठी अभिनेत्री विद्या बालन, सुप्रसिद्ध लेखक अमीश त्रिपाठी, उत्तम समालोचक हर्षा भोगले, मिशलीन स्टार शेफ अतुल कोचर; राजकीय धुरीण शशी थरूर यांसारख्या अनेकांच्या आईच्या खास रेसिपींसह त्या त्या व्यक्तींच्या आपल्या आईसोबतच्या आठवणींनाही उजाळा देतात. पुस्तकात वेगवेगळ्या क्षेत्रातील तब्बल तीस मान्यवरांच्या आठवणींचा समावेश आहे.

आई, ती आपल्यासाठी न दमता, न कंटाळता रोज नवनवीन खाद्यपदार्थ बनवत असते. ती स्वतः हे सगळं कुठंतरी शिकते. कधी ती हे सगळं आपल्या आईकडून किंवा सासूकडून शिकते, कधीतरी बाहेरून शिकते, निगुतीनं ते आपल्यासाठी बनवते. या सगळ्या प्रयत्नाबद्दल कुठंतरी कृतज्ञता या पुस्तकातून व्यक्त झालीय, असं नक्कीच म्हणता येईल.

स्वयंपाक ही फक्त एक कला नाही, तर तो एक वारसा आहे, अशी मांडणी लेखिका सुधा मेनन आपल्या या पुस्तकातून करतात. ‘डाळिंब्याचं बिरडं’, ‘कद्दू कि सब्जी’, ‘सरसो का साग’पासून ते साध्याशा खिचडीपर्यंतच्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसोबत गुंफलेल्या या आठवणी म्हणजे फक्त पाककृतींचं सादरीकरण नाही, तर प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघराभोवतीच्या गप्पा, किस्से, आठवणींचा वारसा आहे. माणूस कोणत्याही स्तरातील असो, क्षेत्रातील असो; प्रत्येकाला हा वारसा समृद्ध करत असतो, हे पुस्तक वाचताना हे पदोपदी जाणवत राहतं.

लेखिकेने वेगवेगळ्या क्षेत्रांतीलच नाही, तर अगदी ईशान्य भारतापासून केरळपर्यंत देशाच्या वेगवेगळ्या भागांतल्या लोकांना सहभागी करून घेतलंय. त्यामुळे पुस्तकातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या पाककृतींची पर्वणीच अनुभवायला मिळते. शिवाय, त्या त्या भागातील बदलत्या सांस्कृतिक परिघाचा अवकाशही यानिमित्ताने अनुभवायला मिळतो. भारताच्या वैविध्यपूर्ण अन्नपरंपरेचा समृद्ध वारसा प्रत्येकाने नक्कीच अनुभवायला (वाचायला) हवा.

पुस्तकात या मान्यवरांचे अनुभव आणि त्यांच्या आईची खास रेसिपीही वाचायला मिळतील.

अजित आगरकर, अमीश त्रिपाठी, अनविला मिश्रा, अनुपम बॅनर्जी, अनुराग भटनागर, अश्विनी अय्यर तिवारी, अतुल दोडिया, अतुल कोचर, गीतू वर्मा, हरित नागपाल, हर्षा भोगले, हृषीकेश कन्नन, इरफान पठाण, किरण मनरल, कुब्रा सैठ, मनीषा गिरोत्रा, मनु पिल्लई, मेरी कोम, मीरा बोरवणकर, मिताली राज, निखत खान हेगडे, संबित बाल, संदीप सोपरकर, सत्येन कोठारी, शांता गोखले, शशी थरूर, शोनाली रोहन रानडे, सुधा मेनन, सुहासिनी मणिरत्नम, तिस्का चोप्रा, उदय कोटक, विद्या बालन, व्ही. आर. फिरोझ ( पुस्तकात वर्णानुक्रमे दिलेली यादी).

पुस्तकाचं नाव : रेसिपीज फॉर लाईफ

लेखिका : सुधा मेनन

प्रकाशक : पेंग्विन

पृष्ठं : २५६, मूल्य : ३९९ रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT