Women Sakal
सप्तरंग

स्त्री, आयुष्य आणि स्वातंत्र्य...

‘नाही’ म्हणणं हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. स्वतःच्या आयुष्यावर मनुष्य म्हणूनही केवळ तिचाच अधिकार आहे. ही बाब एखादी स्त्री विसरत असेल किंवा तिला उमजलंच नसेल तर त्याची जाणीव करून देणं हे दुसऱ्या स्त्रीचंही कर्तव्य आहे.

अवतरण टीम

‘नाही’ म्हणणं हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. स्वतःच्या आयुष्यावर मनुष्य म्हणूनही केवळ तिचाच अधिकार आहे. ही बाब एखादी स्त्री विसरत असेल किंवा तिला उमजलंच नसेल तर त्याची जाणीव करून देणं हे दुसऱ्या स्त्रीचंही कर्तव्य आहे.

- सोनाली लोहार sonali.lohar@gmail.com

‘नाही’ म्हणणं हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. स्वतःच्या आयुष्यावर मनुष्य म्हणूनही केवळ तिचाच अधिकार आहे. ही बाब एखादी स्त्री विसरत असेल किंवा तिला उमजलंच नसेल तर त्याची जाणीव करून देणं हे दुसऱ्या स्त्रीचंही कर्तव्य आहे. कायदे, धोरणं, योजना या बनवल्या जातात; पण त्याच्या अंमलबजावणीस्तव स्त्रीने जागं राहणं महत्त्वाचं.

‘डोक्यावरच्या हिजाबमधून केस दिसत होते’ या कारणास्तव इराणच्या ‘माहसा आमिनी’ या २२ वर्षीय तरुणीला तेथील पोलिसांनी ‘अनैतिक वर्तना’च्या आरोपाखाली ताब्यात घेतले. पोलिस कस्टडीत असतानाच माहसाचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या शारीरिक बळाच्या वापरामुळेच माहसाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पंधरा-वीस दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेने केवळ इराणमध्येच नव्हे, तर जगभर खळबळ उडाली. जागोजागी महिला संघटनांनी निदर्शने सुरू केली. कित्येक महिलांनी या घटनेचा निषेध म्हणून आपले केस कापले. समाज माध्यमांवर जगभरातल्या महिला रोष व्यक्त करीत आहेत. हिजाबच्या विरोधात सुरू झालेल्या या आंदोलनांनी आता अधिक व्यापक स्वरूप घ्यायला सुरुवात केलीय. ही एक प्रकारची चळवळ किंवा एका क्रांतीची सुरुवातही ठरू शकेल अशी सध्याची स्थिती आहे. एका दाबलेल्या ज्वालामुखीचा स्फोट झालाय. आता स्त्री हक्काच्या या जागतिक चळवळीचं ब्रीदवाक्य झालंय, ‘स्त्री, आयुष्य आणि स्वातंत्र्य!’

इराणमध्ये ही घटना घडली आणि त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात आपल्याकडे नवरात्रीचा प्रारंभ झाला. दशभूजांमध्ये शस्त्र धारण केलेल्या दुर्गेचे सिंहावर बसून आगमन झाले. स्त्री शक्तीची किती रूपं! शुभनिशुंभाचा वध करणारी ती दुर्गा! दहा दिवस या शक्तींचा जागर होतो, त्यांच्या आरत्या होतात, पूजा होते...

मग अकराव्या दिवसापासून नक्की काय होतं? ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या २०२१ च्या अहवालाची आकडेवारी फारच बोलकी आहे. २०२१ ला देशात स्त्रियांवर झालेल्या गुन्ह्यांचा आकडा होता चार लाख २८ हजार २७८! २०२० च्या तुलनेत यात १३.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या गुन्ह्यांचं प्रामुख्याने स्वरूप म्हणजे बलात्कार, विनयभंग, ॲसिड अटॅक, पती अथवा त्याच्या नातेवाईकांकडून क्रूर वर्तन, घरगुती हिंसा इत्यादी. यात बलात्काराच्याच ३१ हजार ६७७ केसेस नोंदवल्या गेल्या. म्हणजेच दिवसाला साधारण ८७ बलात्कार आणि ४९ इतर गुन्हे.

हे आकडे फक्त त्या केसेसबाबत आहेत, ज्या पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचल्या आणि नोंदवल्या गेल्या. ज्या तिथपर्यंत पोहोचल्याच नाहीत, त्या दुर्गा कुठे आहेत, त्यांचं काय झालं? बलात्कारांच्या गुन्ह्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त असलेलं राज्य म्हणजे राजस्थान (६३३७). जिथे आजही काही भागांत पडदा, घुंगट यांसारख्या प्रथा सांभाळल्या जातात. तिथे स्त्रीची ही अवस्था का, याचा विचार नाही करायचा?

भरनवरात्रात एका स्त्री समूहात एक पोस्ट वाचली. एका उच्च विद्याविभूषित, नृत्यप्रवीण, तरुण स्त्रीची कहाणी. सदर महिलेला सासरी इतर कर्तव्यांबरोबरच दिवसाचे सहा तास धार्मिक कर्मकांडात गुंतवून ठेवण्यात येते. परपुरुषांबरोबर बोलते का, हे पाहण्यासाठी तिच्या मोबाईलची वारंवार तपासणी करण्यात येते. तिला नृत्य करण्यास परवानगी नाही, लपून नृत्याचा सराव करू नये म्हणून घरात व्हिडीओ कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि अर्थात रात्री शयनकक्षात रती-मेनका बनून पतीला सर्वतोपरी रिझवणेही अपेक्षित आहेच.

हे असे जगणे म्हणजे जगणे का? पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला शरीरसंबंधही बलात्कारच नव्हे का? राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकास त्याच्या इच्छेनुसार जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. मग नैतिकता, प्रथा आणि नियमांच्या लक्ष्मणरेखा स्त्रियांसाठीच का? सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात कायद्यासंदर्भात नुकताच दिलेला एक निर्णय हे अशा चौकटी तोडण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक स्वागतार्ह पाऊल आहे. या निकालानुसार गर्भपात कायद्याअंतर्गत प्रकरणांमधे ‘पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला संभोग हा बलात्कार मानला जावा’ असे म्हटले आहे; मात्र भारतीय दंडसंहिता कलम ३७५ मध्येच बलात्काराच्या व्याख्येतच याचा अंतर्भाव कायदेकारांकडून केला जावा, हीसुद्धा प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असणार!

‘नाही’ म्हणणं हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. स्वतःच्या आयुष्यावर मनुष्य म्हणूनही केवळ तिचाच अधिकार आहे. ही बाब एखादी स्त्री विसरत असेल किंवा तिला उमजलंच नसेल तर त्याची जाणीव करून देणं हे दुसऱ्या स्त्रीचंही कर्तव्य आहे. कायदे, धोरणं, योजना या बनवल्या जातात; पण त्याच्या अंमलबजावणीस्तव स्त्रीने जागं राहणं महत्त्वाचं. माहसा आमिनीने परत एकदा जागं केलंय, आता तरी खऱ्या दुर्गा बनूया!

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT