sri sri ravi shankar Sakal
सप्तरंग

चेतना तरंग : शब्दाचे महत्त्व

आपल्याला शब्द निरर्थक वाटू लागतात तेव्हा जीवनात अधिक खोल जात आहोत असे समजावे. आपण खऱ्या अर्थाने जगू लागलेलो असतो. रात्रंदिवस आपण शब्दांमध्ये जगतो.

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

आपल्याला शब्द निरर्थक वाटू लागतात तेव्हा जीवनात अधिक खोल जात आहोत असे समजावे. आपण खऱ्या अर्थाने जगू लागलेलो असतो. रात्रंदिवस आपण शब्दांमध्ये जगतो.

आपल्याला शब्द निरर्थक वाटू लागतात तेव्हा जीवनात अधिक खोल जात आहोत असे समजावे. आपण खऱ्या अर्थाने जगू लागलेलो असतो. रात्रंदिवस आपण शब्दांमध्ये जगतो. आपल्याला सगळ्याचा अर्थ लागलाच पाहिजे. सगळे काही अर्थपूर्ण असले पाहिजे. अर्थ आणि अर्थपूर्णता शोधण्याच्या गडबडीत आपण सर्वकाही उद्दिष्टहीन करून टाकतो. हे गाजर आणि सशाप्रमाणे झाले. ते इथेच आहे, आणि तरीसुद्धा ते इथे नाही.

ही स्थिती अशी पातळी गाठते की त्यामुळे आपण आपली झोप गमावून बसतो. अनेक लोक झोपेत बोलतात. शब्दांपासून बिलकूल सुटका नाही असे दिसते. शब्दच सर्व काळजीचे मूळ आहेत. शब्दविरहित चिंता तुम्हाला होऊच शकत नाही, हो ना? आता दहा मिनिटे चिंतित व्हा. एकसुद्धा शब्द वापरू नका. हे जमणे शक्यच नाही! आपण शब्दांमध्ये अडकून पडतो. आपली मैत्री शब्दांवर आधारित असते. कोणी म्हणते, ‘‘अरे वा, तुम्ही किती चांगले आहात, किती सुंदर आहात, किती दयाळू आहात; तुमच्यासारखी व्यक्ती मी आयुष्यात कधीच नाही पाहिली.’’ अचानक तुम्ही प्रेमात पडता. कोणी आपल्याला शिव्या घालते तेव्हा आपण हिरमुसले होऊन जातो.

परंतु ते तर नुसते शब्दच आहेत. शब्दांवर आधारित जीवन खूप उथळ असते. जीवनात अतिशय गहन, सखोल किंवा अर्थपूर्ण सत्य शब्दात व्यक्त करता येत नाहीत. प्रेमाचा अनुभव किंवा खरी कृतज्ञता शब्दात व्यक्त केल्या जाऊ शकत नाहीत. खरे सौंदर्य, इमानदार मैत्री यांना शब्द नसतात. आपण प्रेम करीत असलेल्या कुणा व्यक्तीबरोबर कधी नुसते शांतपणे बसलो आहोत का? तुम्हाला आठवते का? आपण गप्पा मारायला लागतो आणि त्यात असलेले सगळे सौंदर्य घालवून बसतो. आपण सहलीला जातो, एक सुंदर स्थळ पाहतो आणि बोलत राहतो. कार चार जण प्रवास करत असतील तर दोन प्रकारचे संवाद सुरू असतात. कित्येकदा एकाच वेळी चारही लोक बोलत असतात!

कोणालाही एकमेकांचा एक शब्दही कळत नसतो. प्रत्येक जण नुसते बोलण्याची वाट पाहतो असतो. ऐकायचे काम कोणीही करीत नसते. एक बोलायचा थांबला तर दुसरा सुरू होतो; ते आधीच्याचे बोलणे संपायलासुद्धा थांबत नाहीत. तुम्हाला असा कोणता कारचा प्रवास आठवतो, जो तुम्ही कुणाबरोबर नुसते सृष्टीसौंदर्य, सूर्यास्त, टेकड्या, समुद्र यांना पाहत मूकपणे केला? नाही. आपण आपली मने आवाजाने भरून टाकतो.

आतील चलबिचल जितकी अधिक तितके बाहेरील संगीत मोठ्या आवाजात हवे असते कारण ते किंचित सुखकारक वाटते. मग तुम्ही सर्व आंतरिक आवाज, ती आत सुरू असलेली सततची वायफळ वटवट, विसरू शकता. संगीतामध्ये हरवून जाणे हे सर्वांत सोपे आहे. चेतनेचा स्तर जितका अधिक सूक्ष्मतर असतो, चेतना जितकी अधिक तणावमुक्त असते तितके अधिक तुम्ही आवाजाच्या प्रति संवेदनक्षम असता. कोलाहल, आवाज, शब्द या सर्वांच्या प्रति आपण असंवेदनशील झालेलो आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT