Job sakal
सप्तरंग

स्वप्नांना वास्तवाची झळ!

‘स्टॅटिस्टिक्स कॅनडा’च्या माहितीनुसार अलीकडे स्थलांतरित झालेल्यांमधील बेरोजगारीत जूनपर्यंत १२.६ टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांपासून स्थलांतरितांचा त्यात समावेश आहे.

अवतरण टीम

- डॉ. मालिनी नायर, nairmalini2013@gmail.com

‘स्टॅटिस्टिक्स कॅनडा’च्या माहितीनुसार अलीकडे स्थलांतरित झालेल्यांमधील बेरोजगारीत जूनपर्यंत १२.६ टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांपासून स्थलांतरितांचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी बेरोजगारीचा हा दर ८.६ टक्के होता. त्यामुळे ही वाढ निश्‍चितच दखलपात्र आणि चिंताजनक आहे. ज्यांचा जन्म कॅनडामध्ये झाला आहे, त्यांच्यातील या कालावधीतील बेरोजगारीचे प्रमाण केवळ ५.५ टक्के आहे. हा खूप मोठा विरोधाभास आहे. सध्याची धोकादायक स्थिती पाहता कॅनडामधील प्रख्यात भारतीय रेस्टॉरंटबाहेरील घटना खरे तर सर्वसामान्य आहे.

उज्ज्वल भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून विविध देशांतून येणारे विद्यार्थी आणि स्थलांतरितांसाठी कॅनडा सरकारचे नवे धोरण अडचणीचे ठरत आहे. येथील सरकारने देशातील चांगल्या नोकऱ्या जन्माने कॅनेडियन नागरिकांसाठी राखीव ठेवल्याने स्थलांतरितांसाठी तिथे जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेक देशांमध्ये स्थलांतराचे नियम कडक केल्यामुळे तिथे कायदेशीर आणि बेकायदा स्थलांतरितांचे स्थैर्य अन् प्रगती धोक्यात आली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला एक व्‍हिडिओ प्रचंड व्‍हायरल झाला आहे. कॅनडामधील ऑन्टॅरिओ येथील ब्रॅम्प्टन जिल्ह्यातील एका रेस्टॉरंटबाहेर भलीमोठी रांग लागल्याचे त्यात दिसत आहे. या रांगेत जवळपास तीन हजार विद्यार्थी असून त्यात बहुतांश भारतीय आहेत.

हे सर्व रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आल्याचा दावा करण्यात आला आहे. कॅनडामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारी मुले तिथे काम करून आपल्या दैनंदिन गरजांच्या खर्चाची तरतूद करत असतात. कॅनडाच्या नव्‍या धोरणामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्याने हे विद्यार्थी धास्तावले आहेत.

व्‍हिडिओत दिसत असलेली ‘तंदुरी फ्लेम’ रेस्टॉरंटबाहेर लागलेली ही रांग वेटर आणि सर्व्हर (वाढपी) या पदांसाठीच्या नोंदणीसाठी आहे. विविध संधी, उच्च शिक्षण आणि आर्थिक स्थैर्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध देशांतून विद्यार्थी कॅनडाची वाट धरतात. त्यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या उलट, या चित्रफितीतून येथील स्थलांतरितांना भेडसावणाऱ्या समस्यांचे जळजळीत वास्तव समोर आले आहे.

ऑन्टॅरिओच्या ब्रॅम्प्टन जिल्ह्यातील रेस्टॉरंटच्या बाहेर लागलेल्या रांगेतील विद्यार्थी कथितरीत्या भारतीय आहेत. ते सर्व वेटर आणि सर्व्हर या पदांसाठी आपला रेझ्युमे जमा करण्यासाठी तिथे आल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरील हा व्‍हिडिओ कमालीचा लक्षवेधी ठरला आहे, कारण त्या मागे आहे विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न.

कॅनडामध्ये स्वप्न घेऊन येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी कमी होणाऱ्या संधी आणि बेरोजगारीची समस्या यावर या व्‍हिडिओमुळे चर्चा सुरू झाली आहे. कॅनडातील कामगार बाजारातील वास्तव आणि स्थलांतरितांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांबाबत व्‍यापक चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: आदरातिथ्य उद्योगात ही समस्या गडद झाली आहे.

स्थलांतराच्या सुरुवातीच्या टप्प्यात या उद्योगातील नोकऱ्या त्यांच्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधार ठरतात. कॅनडामधील स्थलांतरितांतील वाढती बेरोजगारी भविष्यातील धोक्याची जाणीव करून देणारी आहे. जगभरातील गुणवत्तेला सामावून घेणारा देश म्हणून आतापर्यंतची कॅनडाची ओळख राहिली आहे; मात्र व्‍यवस्थानिर्मित अडथळ्यांमुळे दुसरे घर म्हणून हक्काचे स्थान असलेल्या या देशात स्थलांतरिताची प्रगती खुंटत आहे.

‘स्टॅटिस्टिक्स कॅनडा’च्या माहितीनुसार अलीकडे स्थलांतरित झालेल्यांमधील बेरोजगारीत जूनपर्यंत १२.६ टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांपासून स्थलांतरितांचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी बेरोजगारीचा हा दर ८.६ टक्के होता. त्यामुळे ही वाढ निश्‍चितच दखलपात्र आणि चिंताजनक आहे. ज्यांचा जन्म कॅनडामध्ये झाला आहे, त्यांच्यातील या कालावधीतील बेरोजगारीचे प्रमाण केवळ ५.५ टक्के आहे. हा खूप मोठा विरोधाभास आहे.

स्थलांतरित, विशेषत: भारतीय नागरिक कॅनडामध्ये मोठ्या अपेक्षा घेऊन येतात. त्यांच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करताना दिसतात. येथील पदवी मिळाल्यानंतर आपण संबंधित क्षेत्रात चांगले करिअर घडवण्यासाठी मदत होईल, अशी त्यांची धारणा असते.

प्रत्यक्षात येथील पदवीला अनेकदा मान्यताच नसल्याच्या वास्तवाला सामोरे जावे लागते, तसेच संबंधित क्षेत्रात एंट्री लेव्‍हल पदांची उपलब्धता खूपच कमी असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांना अनेकदा संबंध नसलेल्या भलत्याच क्षेत्रात काम करावे लागते आणि त्याच क्षेत्रात एक एक पायरी चढून कायमचे स्थिरावण्यास भाग पडते.

सप्टेंबर २०२४ मध्ये कॅनडा सरकारने आपल्या ‘टेम्पररी फॉरेन वर्कर प्रोग्राम’ (टीएफडब्ल्यू) मध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणेद्वारे कंपनीमालकांना स्थलांतरितांऐवजी कॅनडामध्ये जन्म झालेल्या नागरिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.

नव्‍या सुधारणेच्या घोषणेनुसार कमी वेतनाच्या हंगामी परदेशी कामगारांची सध्याची मर्यादा ही १० टक्के आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात कमी वेतनाच्या पदांची संख्या २०१८ मधील २१,३९४ वरून २०२३ मध्ये ८३,६५४ पर्यंत वाढली. ‘टीएफडब्ल्यू’ प्रोग्रॅममध्ये संतुलनासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे विशिष्ट पदांमध्ये ही वाढ झाली आहे.

एके काळी संधींची भूमी असलेला हा देश आता येथील रहिवाशांसाठी अनिश्‍चिततेची भूमी ठरत आहे. आकुंचन पावणारा कॅनडाचा श्रम बाजार आणि वाढते व्‍याजदर यामुळे व्यावसायिकांकडून नोकरभरतीबाबत हात आखडता घेतला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून रोजगारनिर्मिती मंदावली आहे. त्याचबरोबर स्थलांतरातील विक्रमी वाढ आणि गृहनिर्माण क्षेत्रातील वाढत्या संकटामुळे नव्‍याने येणाऱ्यांना स्थिर रोजगार मिळवणे आव्हानात्मक झाले आहे.

सध्या कॅनडाला एका व्‍यापक आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम हा या देशात अलीकडे स्थलांतरित झालेल्या नागरिकांवर होत आहे. केवळ नवीन स्थलांतरितांमध्येच बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे असे नाही; तर लोकसंख्येच्या विविध घटकांना त्या समस्येने कवेत घेतले आहे.

उदाहरणार्थ, जूनमध्ये एकूण तरुण बेरोजगारीचा दर १३.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. २०१६ नंतरचा हा सर्वोच्च स्तर आहे. साथीच्या आजाराने प्रभावित झालेली वर्षे त्यातून वगळण्यात आली आहेत. त्याच वेळी २५ ते ५४ वयोगटातील कृष्णवर्णीय कॅनेडियन लोकांमधील बेरोजगारीचा दर ११.९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तो ४.४ टक्के अंशांनी वाढला आहे.

कॅनडाची अर्थव्‍यवस्था ही पूर्वी स्थैर्य आणि समृद्धीचे चमचमते प्रतीक मानली जात होती. सध्या ही अर्थव्‍यवस्था स्थलांतरातील वाढ आणि रोजगाराच्या संधीत झालेली घट यामुळे निर्माण झालेल्या आव्‍हानांच्या दबावामुळे अडचणीत सापडली आहे. दरवर्षी २५ लाख लोक आपला देश सोडून स्थलांतरित होतात. जगभरात स्थलांतरित होणाऱ्यांच्या संख्येत भारतीय नागरिकांची सर्वाधिक संख्या आहे.

‘इंटरनॅशनल मायग्रेशन आऊटलुक २०२३’मध्ये, २०२१ आणि २०२२ या वर्षांत ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन ॲण्ड डेव्हलपमेंट’चे (ओईसीडी) सदस्य असलेल्या देशांमध्ये स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक वाटा हा भारताचा असल्याचे म्हटले आहे.

भारत सोडताना प्रत्येक विद्यार्थ्याचे प्राथमिक ध्येय हे उच्च शिक्षण घेऊन आपल्या मूळ देशात स्थिर रोजगार मिळवणे हे असते. आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यासाठी पालक मोठी आर्थिक जोखीम घेत असतात. हा संबंधित देशाच्या सरकारसाठी तसेच परदेशी संस्थांसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत ठरत आहे. विद्यार्थी वर्क व्हिसाबद्दलच्या सौम्य धोरणामुळे कॅनडा हा अनेक वर्षांपासून लोकप्रिय पर्याय ठरत आहे.

अनेक प्रकरणांत पालक त्यांच्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यास सक्षम असतात; मात्र तेथील दैनंदिन गरजांसाठी विद्यार्थ्यांना तेथे काम करणे अत्यंत गरजेचे असते. सध्याची धोकादायक स्थिती पाहता कॅनडामधील प्रख्यात भारतीय रेस्टॉरंटबाहेरील घटना खरे तर सर्वसामान्य आहे. प्रत्येक देश स्वतःच्या रहिवाशांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कायदेशीर आणि बेकायदा अशा दोन्ही प्रकारच्या स्थलांतरितांसाठी आपले दरवाजे बंद करत आहे.

या वस्तुस्थितीचा परिणाम म्हणून यापुढेही परदेशी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांची संधी कमी होत जाणार आहे. कॅनडा हे केवळ एक उदाहरण आहे. इतर अनेक देशांमध्ये स्थलांतराचे नियम कडक करण्यात आल्यामुळे तिथे कायदेशीर आणि बेकायदा स्थलांतरितांचे स्थैर्य अन् प्रगती धोक्यात आली आहे.

कमी वेतनाच्या नोकऱ्यांसाठी वाढती स्पर्धा, पद्धतशीर अडथळे आणि वाढती बेरोजगारी यामुळे कॅनडा आणि इतर देशांमध्ये उज्ज्वल भविष्याची आकांक्षा अधिक धूसर होत चालली आहे. या दोन्ही घटकांचा परिस्थितीवर प्रभाव पडत आहे. नवागतांसाठी संधी वाढवण्यासाठी संरचनात्मक बदलांची अंमलबजावणी न करताच वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यास असमर्थ ठरत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या गंभीर वास्तवातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे.

त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि स्थलांतरितांना जगण्याची पद्धत स्वीकारण्यास भाग पाडले जाऊ शकते, असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त भारत सरकारने नागरिकांसाठी रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण होतील यासाठी खात्रीपूर्वक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

ज्यामुळे चांगले उत्पन्न आणि राहणीमानात सुधारणा होईल. परदेशात चांगल्या भविष्याच्या आशेने आणि शोधात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी याची खूप मदत होऊ शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT