मानसशास्त्रात ऍडजस्टमेंट ही एक अशी वर्तणूक प्रक्रिया आहे ज्याद्वारे मनुष्य आणि इतर प्राणी त्यांच्या विविध आवश्यकतांमध्ये किंवा त्यांच्या गरजा आणि वातावरणातील अडथळे यांच्यात संतुलन राखतात. काही वर्षांपूर्वी मला माझ्या एका डॉक्टर मित्राकडून AGORAPHOBIA ऍगोराफोबिया हा एक मानसिक आजार आहे हे कळले. ज्यावेळी मनुष्याला गर्दीमध्ये जाण्याची भीती वाटते किंवा नव्या व्यक्तीला भेटायची भीती वाटते तेव्हा हा आजार सहसा बळकावलेला आहे, असा निष्कर्ष डॉक्टर्स काढतात. तेव्हा वाटलं अर्जुनाला युद्ध सुरू होण्यादरम्यान हाच त्रास तर नसेल झाला? पण हा गमतीचा भाग. मग सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याची भीती वाटायचे कारण काय? सगळ्यांनाच वाटते असे नाही; पण कमीजास्त प्रमाणात आपण यात कुठेतरी अडकलेले नक्की असतो.
तुम्हाला माहितीये, बेडूक आणि मानवातील काही सामान्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला सहसा कोणीच सांगणार नाही. तसे आपणही प्राणीच आहोत म्हणा. फक्त फरक एवढाच की, आपण ऍडजस्टमेंट करणारे प्राणी आहोत, असे म्हटले जाते. पण, बेडूक आणि आपण याबतीत सारखे आहोत. असे म्हणतात, ह्यूमन बिइंग्ज म्हणजे आपण आणि बेडूक निसर्गातील दोन प्राणी आहोत ज्यात ऍडजस्टमेंट करण्याची प्रचंड शक्ती आहे. एकदा पाण्याच्या भांड्यात एका वैज्ञानिकाने बेडूक ठेवून पाणी गरम करण्यास ठेवले. पाण्याचे तापमान वाढत असताना बेडूक त्यानुसार आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास सक्षम आहे. तापमानात वाढ झाल्याने बेडूक ऍडजस्टमेंट करत होता. जेव्हा पाणी उकळायला लागले तेव्हा मात्र बेडूक ऍडजस्टमेंट करण्यास सक्षम नव्हता. त्या वेळी बेडूक उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला; पण तसे करण्यास तो मग अक्षम ठरला कारण पाण्याच्या तापमानाशी जुळवून घेण्यात त्याने आपली सर्व शक्ती गमावली होती. मग लवकरच बेडकाने आपले प्राण त्यागले. म्हणजे त्याने शेवटची हार पत्करली...
असे का झाले, याचा विचार केलाय का? बेडूक तर आधीच उडी मारू शकत होता. पण, मग तो इतका ऍड्जस्टमेंट का करत होता? त्या बेडकाला असे काय झाले? मग तो बाहेर का आला नाही? बेडूक कशाने मारला गेला? आपण उत्तर देऊ की, उकळत्या पाण्याने बेडूक मारला गेला. पण, सत्य हे आहे की, बेडकाचा जीव जाण्यामागे त्याची स्वतःची अक्षमता होती. सरळ आणि सोप्या शब्दात सांगायचे तर त्याने उडी मारण्याचा निर्णय उशिरा घेतला आणि सगळे ऍडजस्टमेंट त्या उकळत्या पाण्यात विरघळले. एखादी गोष्ट जर मॅनेज करायची म्हटलं, तर सगळ्यांत जास्त करायला लागते ते ऍडजस्टमेंट (समायोजन). ही ऍडजस्टमेंटची सवय मग अशी जडते ती आपण मग त्यात गुरफटत जातो. मग मात्र त्रास होतो तो मनाला रुतणाऱ्या विविध गोष्टींचा. मग होत नाही ते मॅनेजमेंट, व्यवस्थापन विविध पातळींवर.
आपले सहसा त्या बेडकासारखेच होते. आपण म्हणत असतो की, आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे. परंतु, आपण कधी ऍडजस्टमेंट केले पाहिजे आणि कधी आपल्याला सामना करावा लागेल याची शहनिशा आणि खात्री करून घेणे आवश्यक आहे जी आपण विसरतो. कितीतरी वेळा आपण विविध परिस्थितींचा सामना करत असतो. कधी कधी यामुळे आपल्याला खचल्याचाही अनुभव येतो. पण, खर सांगू का, जर सामना करण्याची आपली क्षमता नसेल, तर निश्चितपणे आपल्याला ऍगोराफोबियाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. समजण्यास अतिशय सोपी गोष्ट म्हणजे आपले शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक शोषण किती करू द्यायचे, हे आपल्यावर अवलंबून असले पाहिजे. खरेतर या धर्तीवर आपण बऱ्यांच गोष्टींबद्दल चर्चा करू शकतो. बरीच उदाहरणे आपल्याला सहजच दिसतील. मात्र, कधी उडी मारायची, हे ठरवायचे आहे ते आपणच. आपल्याकडे अजूनही सामर्थ्य आहे आणि आपण पूर्ण आत्मविश्वासाने जगाचा सामना करत असताना उडी मारू शकतो जेणेकरून नवे मार्ग आणि नव्या कल्पना नव्या जोमाने आपल्या सतत सहवासात असतील आणि मग अर्थ मिळेल तो मॅनेजमेंटला. चर्चा आपण करतोच आहे तुम्ही बघा विचार करून.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.