sukrut deo 
सप्तरंग

आर्थिक 'कुंडली' (सुकृत देव)

सुकृत देव sukrut_deo29@yahoo.co.in

पॅन कार्ड हल्ली अनेक आर्थिक व्यवहारांसाठी आवश्‍यक असतं. पॅन क्रमांक ही तुमची एक प्रकारे आर्थिक ओळख असते आणि आर्थिक कुंडलीही त्याच्या आधारे मांडता येते. हा पॅन क्रमांक नक्की कशा प्रकारचा असतो, पॅनसाठी अर्ज कसा करायचा, तो का महत्त्वाचा असतो आदी माहिती.

'पॅन नंबर' हा दहा आकडी क्रमांक असतो, जो प्राप्तिकर विभागाकडून दिला जातो. जी व्यक्ती पॅन कार्डसाठी किंवा क्रमांकासाठी अर्ज करते, त्यांना प्राप्तिकर विभाग स्वतःहून हा पॅन नंबर देते.

पॅन कार्ड किंवा पॅन नंबर हा एक अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा नंबर आहे, जो सर्वसामान्य नागरिक, करदाते, व्यावसायिक, खातेदार अशा सर्वांसाठी उपयोगाचा असतो. ते एक ओळखपत्र किंवा महत्त्वाचं कागदपत्र मानलं जातं. पॅनमुळं प्राप्तिकर विभागाला कुठल्याही व्यक्तीची, व्यवहाराची (मुख्यत्वे आर्थिक) माहिती पॅनला जोडायला सोपी जाते. व्यवहारांमध्ये कराचं पेमेंट, टीडीएस, टीसीएस क्रेडिट, प्राप्तिकर विवरण, संपत्तीचा तपशील, बक्षीस, इत्यादीची सर्व माहिती मिळते आणि पॅनधारकाला ओळखणंही सोपं जातं. पॅनमुळं व्यक्तींच्या व्यवहारांबरोबरच त्यांचं कागदपत्र जोडण्यासदेखील मदत होते. त्यामध्ये करभरणा चलन, करमूल्यांकन करणं, कराची मागणी, कर-देय रक्कम इत्यादी सर्व माहिती लगेच मिळू शकते आणि माहिती जुळण्यातदेखील मदत होते. त्यामध्ये गुंतवणुकीची माहिती, कर्ज घेतल्याचा तपशील, समोरच्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायांची माहिती मिळते आणि त्याचबरोबर करचुकवेगिरीला आळा बसतो. त्यामुळं कर आणि करांचं विवरणपत्र भरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होते आणि देशाची उन्नती होते.

पॅनबद्दलचं उदाहरण सांगायचं झालं, तर समजा AFZPK7190K हा जर पॅन नंबर असेल, तर या नंबरची पहिली तीन अक्षरं किंवा कॅरेक्‍टर ही, प्राप्तिकर विभागानं ठरवलेल्या श्रेणीमधली असतात. त्यानंतरचं चौथं कॅरेक्‍टर हे यांपैकी एक असतं : P (पी) ः वैयक्तिक (Individual ) , F (फ) ः भागीदारी संस्था (Firm ) , C (सी) ः कंपनी (Company ), H (एच) ः हिंदू अविभाज्य संस्था ( HUF), A (ए) ः व्यक्तींचं असोसिएशन (AOP) , T (टी) ः ट्रस्ट (TRUST) . पाचवं कॅरेक्‍टर हे त्या व्यक्तीच्या आडनावाचं पहिलं अक्षर असतं, तर पुढची चार कॅरेक्‍टर्स म्हणजे विशिष्ट अंक असतात. दहावं कॅरेक्‍टर हे परत अक्षर असते, जे प्राप्तिकर विभागानं नमूद केलेलं असतं.

पॅन नंबर हा प्राप्तिकर विवरणपत्र भरताना, ऑनलाइन विवरण भरताना किंवा प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home ) लॉगिन करतानाही टाकावा लागतोच. प्राप्तिकराबरोबरच व्यवसायकर, वस्तू आणि सेवा करनोंदणीसाठीदेखील पॅन आवश्‍यक आहे. सर्व कर हे पॅन-बेस्ड आहेत. आपण बघतच आहोत, की बॅंकांमध्ये, आर्थिक व्यवहारांत, गुंतवणूक करताना इत्यादी अनेक ठिकाणी पॅन नंबर/कार्ड देणं अनिवार्य झालं आहे. प्रत्येक ग्राहकाची केवायसी (नो युअर कस्टमर) प्रक्रिया करताना सर्व बॅंका, कंपन्या पॅन कार्डची फोटोकॉपी, नंबर मागताना दिसतात. पॅन असणं आर्थिक व्यवहारांसाठी अनिवार्य झालं आहे. सर्वसाधारणपणे ज्या व्यवहारांमध्ये पॅन नंबर नमूद करणं बंधनकारक आहे, त्यामध्ये विशेषतः :
- जमीन, घर, मिळकतीची खरेदी-विक्री
- मोटर वगैरेची खरेदी- विक्री
- बॅंका, पोस्टामध्ये ठेवी ठेवणं
- बॅंकांमध्ये खातं काढणं
- मोठं पेमेंट करणं


पॅन ही अत्यावश्‍यक गोष्ट आहे. सर्वसामान्य नागरिकांना पॅन कार्ड काढावंच लागतं, कारण त्यांचं कुठं ना कुठं तरी पॅनवाचून अडताना दिसतं. हल्ली सर्व गोष्टी या आता पॅनआधारित झाल्या आहेत. पॅनसाठी अर्ज करण्यासाठी एनएसडीएलची (NSDL) वेबसाइट https://tin.tin.nsdl.com/pan/newpanforeign.html , किंवा यूटीआयटीएसएल (UTITSL) https://www.utiitsl.com/UTIITSL_SITE/ यांचा वापर करता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT