Social for Women Sakal
सप्तरंग

स्त्रीच्या उन्नतीसाठी ‘आदिशक्ती’

‘सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

‘सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका या आदिवासीबहुल परिसरात महिला सक्षमीकरण, रोजगाराभिमुख कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण आणि महिला व कुटुंबाचं राहणीमान उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेची माहिती यावेळी घेणार आहोत.

साक्री राज्यातील नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातलं एक गाव व तालुका आहे. साक्री तालुक्याचं प्रशासकीय मुख्यालय आहे. या तालुक्यात ८० टक्के आदिवासी लोक राहतात. या भागातील लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यानं, रोजगाराचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं रोजगाराच्या शोधात बहुसंख्य लोक कुटुंबासहित गुजरातमध्ये स्थलांतर करतात. गावात रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील आणि लोकांचं राहणीमान उंचावून स्थलांतर थांबेल या हेतूनं २००९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात (१७/११/२००९) किरण झिपरू पवार यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कुरूसवाडे या ग्रामीण भागात समविचारी व स्थानिक परिसरातील विकासासाठी वचनबद्ध असलेल्या लोकांच्या गटानं एकत्र येऊन ‘माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. एक सुखी, संपन्न आणि सशक्त समाज निर्माण करण्यासाठी देशातील ग्रामीण भागातील महिला व मुलं साक्षर व रोजगाराभिमुख होणं आवश्यक आहे, हे ओळखून ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' ही संस्था धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका व परिसरातील ग्रामीण भागात महिला सशक्तीकरणाचे व लोकांचं राहणीमान उंचाविण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे.

सुरुवातीच्या काळात साक्री तालुक्यामध्ये संस्थेकडून विविध उपक्रम करण्यात आले. त्यानंतर सर्व उपक्रमांचा जवळच्या इतर तालुक्यांमध्ये विस्तार करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील ग्रामीण भागातील लोकांची खरी समस्या जाणून घेण्यासाठी संस्थेकडून अनेक ग्रामपंचायतींचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर कौशल्यविकास, शिक्षण, आरोग्य, उपजीविकाविकास, पर्यावरणसंवर्धन, महिलांना रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देणं, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं, अल्पभूधारक शेतकऱ्यांना सेंद्रिय व आधुनिक शेतीविषयक माहिती देणं आणि विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्या योजनांचा लाभ मिळवून देणं अशा उपक्रमांची आखणी करून, उपक्रम आयोजित करण्यात आले. ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' ही संस्था सांगली जिल्ह्यातसुद्धा कार्यरत असून, कृषी आणि ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला आणि संस्कृती, महिला सशक्तीकरण, युवा विकास, ग्राहक जागरूकता, रस्ते सुरक्षा यांसारख्या विषयांत काम करत आहे.

संस्थेत संघटित सदस्यांची एक टीम आहे, ज्यात पुरुष आणि महिला कर्मचारी आणि स्वयंसेवक आहेत, जे प्रत्यक्ष गावात जाऊन उपक्रमांचं आयोजन करतात. तसंच, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध गट यांच्या सल्ल्यानुसार सर्व योजना राबविल्या जातात. संस्थेच्या सर्व उपक्रमांमध्ये गावपातळीवर ग्रामस्थांचा व महिलांचा पूर्ण पाठिंबा आणि सहभाग मिळतो. एक संस्था म्हणून, ग्रामीण भागातील महिलांना सशक्त व आर्थिक निर्भर करण्यासाठी कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख उषा शिलाई स्कूल केंद्र तसंच मुलांसाठी शाळा स्थापन करणं, एकात्मिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र विकसित करणं इत्यादी महिला व मुलांसाठी अनेक योजना आखल्या आहेत.

अफार्म संस्थेच्या सहकार्यानं उषा शिलाई स्कूल प्रकल्पात ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' संस्थेमार्फत गावातील दोन महिलांची टेलरिंग व शिलाई प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' संस्थेनं आजपर्यंत उषा शिलाई स्कूलच्या माध्यमातून दहा महिलांना टेलरिंग व शिलाई कौशल्याचं प्रशिक्षण देऊन, या दहा महिलांकडून तीस महिलांना प्रशिक्षित केलं असून, या तीस महिलांनी आजपर्यंत एक हजार महिलांना टेलरिंग व शिलाईचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यापैकी काही महिला शिलाईचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.

उषा शिलाई स्कूल प्रकल्प संपूर्ण भारत देशातील ग्रामीण भागात ६१ उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं सुरू आहे. महिला सशक्तीकरण आणि महिलांना रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देऊन महिलांचं व पर्यायानं कुटुंबाचं राहणीमान उंचावणं या उद्देशानं २०११ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. देशातील २८ घटक राज्यांत आणि आठ केंद्रशासित प्रदेशांत २३ हजार उषा शिलाई स्कूल आहेत. २०११ पासून अफार्म संस्थेच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये उषा शिलाई स्कूल प्रकल्प सुरू आहे. (स्रोत - अफार्म १९६९ - २०१९ सुवर्ण महोत्सवी वर्ष स्मरणिका, तसंच माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान)

साक्री परिसर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजू महिलांना टेलरिंग व शिलाईचं प्रशिक्षण देण्याकरिता व महिलांना स्वतःचा टेलरिंग व शिलाईचा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी शिलाई मशिन व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे; आणि हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी द्याल तुमची मदत...

'माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळं संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ''सोशल फॉर अॅक्शन'' या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ''डोनेट नाऊ'' या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी

व्हाट्सअॅप क्रमांक :- ८६०५०१७३६६

उषा शिलाई स्कूल प्रकल्पांतर्गत अनेक महिलांनी शिलाईचं प्रशिक्षण घेतलं आहे.

संस्थेचे अन्य सामाजिक उपक्रम

  • आरोग्यविषयक विविध मार्गदर्शनपर सेमिनार व कार्यशाळा, तसंच ज्ञान-प्रसार कार्यक्रम

  • शेतकर्‍यांसाठी परिसंवाद व कार्यशाळा

  • ग्रामीण भागातील मुली व महिलांकरिता फॅशन डिझायनिंगमधील व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम

  • प्रौढ साक्षरता वर्ग

  • समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याची मदत करणं

  • विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT