Ganesh Jhambare Sakal
सप्तरंग

गरज मदतीच्या हजारो हातांची....

सकाळ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशनअंतर्गत ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सकाळ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशनअंतर्गत ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.

सकाळ माध्यम समूहातील सकाळ सोशल फाउंडेशनअंतर्गत ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय कारणासाठी व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक मदतीसाठी क्राउड फंडिंगचे प्रयत्न करण्यात येत आहेत. गणेश झांबरे या अपघातग्रस्त तरुणाला मदतीची गरज आहे.

पुणे जिल्ह्यातील गांजवेवाडी वळती (ता. आंबेगाव) या गावात बत्तीसवर्षीय गणेश झांबरे हा तरुण आपल्या आईसोबत सुखा-समाधानाने व आनंदाने राहत होता. चांगलं शिक्षण घेऊन, मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न पाहण्याच्या कोवळ्या वयात घराची व आईची जबाबदारी गणेशच्या खांद्यावर पडली. मुळातच घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने गणेश व त्याच्या आईला रोजच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे मिळेल ते काम स्वीकारून व शेतमजुरी करून गणेश आपलं घर चालवत होता. अशा परिस्थितीतच गणेशने आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. घरच्या परिस्थितीमुळे त्याला उच्चशिक्षण घेता आलं नाही.

गणेश मागील दहा वर्षांपासून नारायणगाव येथील एका शेतीविषयक खतांच्या दुकानात नोकरी करत होता. शेतमजुरीपेक्षा दुकानातील कामामुळे त्याला किमान महिना जेमतेम घर चालविण्यापुरता पगार मिळू लागला. त्याच्या आईची थोडी का होईना चिंता मिटली होती. त्यामुळे गणेशच्या आईने त्याच्या लग्नाची स्वप्नं पाहण्यास सुरुवात केली होती. गणेशचं लग्न करून, त्याचा सुखी संसार पाहणं हीच गणेशच्या आईची इच्छा होती. सर्व काही व्यवस्थित असताना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. २० ऑगस्ट रोजी, नेहमीप्रमाणे गणेश नारायणगाव येथे दुचाकीवरून कामावर जात असताना रांजणी येथील वीज उपकेंद्राजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गणेशच्या डोक्याला गंभीर जखम होऊन, मेंदूला मार लागला आहे. पुण्यातील कासारवाडी येथील खासगी रुग्णालयात गणेशच्या डोक्यावर (कवटी) शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. उपचारांचा व शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे दहा लाख रुपये आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढा खर्च गणेशच्या आईला पेलवणार नाही. गणेशच्या नातेवाइकांनी मित्रपरिवाराच्या मदतीने दोन लाख रुपये जमा केले असून, अजून उर्वरित किमान आठ लाख रुपयांची गरज आहे. तसंच, सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेशच्या आईने व मित्रपरिवाराने समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांना सामूहिक मदतीसाठी आवाहन केलं आहे.

कशी कराल मदत...

गणेश झांबरे या तरुणाच्या उपचारांसाठी सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर इंडिव्हिज्वल सेक्शनमध्ये गणेश झांबरे या तरुणाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन गणेश झांबरे या तरुणाची माहिती घेऊन, ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप क्रमांक - ८६०५०१७३६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT