Newspaper Sakal
सप्तरंग

काय कमावले, काय गमावले?

१९७१ च्या युद्धात विपरीत परिस्थितीत केवळ ५४ वर्षांच्या इंदिरा गांधींनी भारताला मोठा विजय मिळवून दिला आणि जगाबरोबरच देशातील लोकही स्तंभित झाले!

सकाळ वृत्तसेवा

- कमोडोर उदय भास्कर

१९७१ च्या युद्धात (War) विपरीत परिस्थितीत केवळ ५४ वर्षांच्या इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) भारताला (India) मोठा विजय (Win) मिळवून दिला आणि जगाबरोबरच देशातील लोकही स्तंभित झाले! भारतीय लष्कराने (Indian Army) हेलिकॉप्टरच्या मदतीने नदी ओलांडत ढाका गाठणे व कराचीवर क्षेपणास्त्राच्या साह्याने हल्ला (Attack) करण्याची नावीन्यपूर्ण चाल खेळण्यातून भारतीय सैनिकांनी अत्यंत धाडसाचे व व्यावसायिकतेचे दर्शन घडविले. मात्र, ईशान्य भारताचे दळणवळण सुधारणे, युद्धाची अधिकृत माहिती प्रसारित करणे व काही सैनिक व नागरिकांना वाऱ्यावर सोडणे टाळणे, या गोष्टी करता आल्या असत्या.

भारताने लढलेल्या १९७१च्या युद्धाचा सुवर्णमहोत्सव आणि बांगलादेशची निर्मिती हा देशाच्या इतिहासातील सर्वोत्तम क्षण असून, ढाक्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने १६ डिसेंबर या दिवशी पत्करलेली शरणागती भारतासाठी अत्यंत महत्त्वाची घटना आहे. जगाच्या इतिहासात नजीकच्या भूतकाळात एवढ्या निर्णायक आणि वेगवान विजयाची नोंद नाही. आज पन्नास वर्षांनंतर या युद्धातील अनेक पैलूंची चर्चा होणे आवश्‍यक आहे. विशेषतः, १९४७च्या राजकीय नकाशावर भारतीय उपखंडात पूर्व पाकिस्तान नावाचा देश अस्तित्वात होता, याची माहिती नसणाऱ्या देशाच्या तरुण पिढीसाठी हे अत्यंत गरजेचे आहे.

पश्‍चिम पाकिस्तानच्या आपल्याच सत्ताधीशांकडून राजकीय व वांशिक दडपशाही सहन केलेल्या, नरसंहाराचा कडेलोट झालेल्या नागरिकांसाठी या नेत्रदीपक युद्धाच्या माध्यमातून झालेली नव्या देशाची निर्मिती खूप मोठी उपलब्धी होती. त्याचबरोबर त्याकाळात भारत ज्या राजकीय आणि संरक्षणविषयक थरांमध्ये अडकला होता, त्याचा विचार करता १९७१चा हा लष्करी विजय देशासाठी अलौकिक होता. १६ डिसेंबरपूर्वी आज बांगलादेश ही ओळख असलेला हा देश ऑगस्ट १९४७पासूनची पुढील २४ वर्षे ‘ईस्ट पाकिस्तान’ म्हणून ओळखला जात होता व पाकिस्तानची लष्करी नेते आपल्या देशाच्या या भागाला ‘गरीब शेजारी’ म्हणून वागवत होते. अनेक वर्षांच्या दुर्लक्ष आणि शोषणाचा कडेलोट १९७० शेख मुजिबूर रहमान यांचा पश्‍चिम पाकिस्तानच्या नेतृत्वाला सक्षम व विश्‍वासार्ह राजकीय पर्याय म्हणून उदयानंतर झाला. त्याचबरोबर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी बंगाली पाकिस्तानी व पश्‍चिम पाकिस्तानातील पंजाबीबहुल भागातीला लोकांत द्वेष निर्माण करीत फुटीरतेच्या या आगीत तेलच ओतले. सामान्य स्थितीमध्ये शेख मुजीब यांनी राष्ट्रीय निवडणुका जिंकलेल्या असल्याने त्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून बढती मिळाली असती, मात्र पश्‍चिम पाकिस्तानातील नेत्यांना आपल्या हातून सत्ता जाऊ द्यायची नव्हती. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांनी पूर्व पाकिस्तानमधील नागरिकांवर आपल्याच सैनदलांच्या मदतीने दडपशाही आणि हत्यांची रक्तरंजित मालिकाच सुरू केली. या राजकीय दडपशाहीला शेख मुजीब आणि मुक्ती वाहिनीच्या नेतृत्त्वाखाली स्थानिकांचा जोरदार विरोध सुरू झाला. हा विरोध शक्तिशाली होता, मात्र ती पुढे झालेला नरसंहार रोखू शकला नाही. ढाका डिसेंबर १९७१मध्ये मुक्त होईपर्यंत पूर्व पाकिस्तानचे ३० लाख नागरिक नरसंहार आणि बलात्काराचे बळी ठरले. दुर्दैवाने, अमेरिका नेतृत्व करीत असलेल्या जागतिक समुदायाने यावर शांत राहणेच पसंत केले. हा शीतयुद्धाच्या दशकांतील सर्वांत लाजिरवाणा कालखंड म्हणून ओळखला जाईल. भारताला या संघर्षात ओढला गेला आणि देशात आश्रय घेऊ पाहणाऱ्या १ कोटी स्थलांतरितांच्या आव्हानाचा सामना करावा लागला. हे कल्पनातीत व धडकी भरवणारे काम होते. जागतिक समुदाय कोणत्याही मदतीस तयार नसल्याच्या स्थितीत भारत पूर्व पाकिस्तानातील अत्याचारग्रस्त नागरिकांना मदत आणि नैतिक बळ देत राहिला. त्यातूनच पुढे भारताला युद्धामध्ये ओढला गेला.

विजयाने जग आणि देशही स्तंभित

१९७१च्या युद्धाचा शेवट ढाका येथे शरणागती समारंभामध्ये झाला, जेथे पाकिस्तानच्या सैनिकी नेतृत्वाने पराभव मान्य केला. परिणामी बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली. ऑगस्ट १९४७नंतर उपखंडाच्या राजकीय भूगोलाची पुनर्आखणी झाली. यातून धर्म ही राष्ट्रीय ओळख असू शकत नाही, हेही स्पष्ट झाले. बांगलादेशचा विचार करता, लोकांच्या वांशिकता, भाषा आणि सामाजिक व सांस्कृतिक या भावनांची दखल घेणे क्रमप्राप्त असते, हेही अधोरेखित झाले. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि त्यांच्या

लष्कराला अर्धा भूभाग गमवावा लागण्याच्या दुःखाबरोबर स्वतःच्याच हातून आपल्याच ३० लाख नागरिकांचे रक्त सांडल्याची टोचणीही लागली. भारतीय सैन्यदलांनी मिळवलेला विजयातून एका नव्या देशाची निर्मिती झाली, दुसरे जागतिक महायुद्ध ऑगस्ट १९४५मध्ये संपल्यानंतर असे उदाहरण पाहायला मिळाले नव्हते. चीनने ऑक्टोबर १९६२मध्ये भारताचा मानहानिकारक पराभव केला होता व त्यामुळे देशाकडे मोठी लष्करी ताकद म्हणून पाहिले जात नव्हते. त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षामुळे आशिया खंडात भारताचे संरक्षणाच्या दृष्टिने विचार करता प्रतिकूल परिस्थितीमध्येच होता. त्यात भर म्हणून, शीतयुद्ध सुरू असल्याने अमेरिकेला पाकिस्तानकडे व नंतर चीनकडे झुकणे अनिवार्य होते. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे पंतप्रधान इंदिरा गांधींबरोबर वैयक्तिक शत्रूत्व होते व त्याचा परिणाम भारताला अमेरिकेकडून अन्नधान्याची मदत स्वीकारण्यासारखी नामुष्कीचाही सामना करावा लागला.

अशा विपरीत परिस्थितीत केवळ ५४ वर्षांच्या इंदिरा गांधींनी भारताला मोठा विजय मिळवून दिला आणि जगाबरोबरच देशातील लोकही स्तंभित झाले! भारताने सैनिकांची जमवाजमव सुरू झाली, तेव्हा दोन्ही आघाड्यांवर युद्ध छेडणे हा भारताचा उद्देश नव्हता, तर मुक्ती वाहिनीला पाठिंबा देण्याला प्राधान्यक्रम होता. दिल्लीचा प्राथमिक उद्देश पूर्व पाकिस्तानमधील नरसंहार रोखणे होत व देशात येणारे निर्वासितांचे मोठे लोंढे वाढणार नाही, याची काळजी घेण्याचा होता. मात्र, तरीही युद्ध छेडले गेले व भारताने लष्कर प्रमुख सॅम माणेकशा यांच्या नेतृत्वाखाली व हवाई दल प्रमुख पी. सी. लाल व ॲडमिरल एस. एम. नंदा यांच्या तोलामोलाच्या साथीच्या जोरावर भारताने अभूतपूर्व सैनिकी विजय मिळवला. भारतीय लष्कराने हेलिकॉप्टरच्या मदतीने नदी ओलांडत ढाका गाठणे व कराचीवर क्षेपणास्त्राच्या साह्याने हल्ला करण्याची नावीन्यपूर्ण चाल खेळणे यांतून भारतीय सैनिकांनी अत्यंत धाडसाचे व व्यावसायिकतेचे दर्शन घडविले.

...तर सोनेपे सुहागा!

आज ५० वर्षांनंतर बांगलादेश ही एक यशोगाथा ठरले आहे, हे मान्यच करावे लागेल व त्यासाठी शाबासकीही द्यावी लागेल. संरक्षण विश्‍लेषक म्हणून या युद्धाचे सिंहावलोकन करताना तीन गोष्टींबद्दल मी असमाधानी आहे.

१) मोठे सैनिकी यश मिळवल्यानंतरही भारताला मोजता येणाऱ्या फायद्याच्या पारड्यात दाखविण्यासारखे फारसे काहीच नाही. भारताला किमान त्या भागातील संरक्षणविषयक परिस्थितीचे धूर्तपणाने आकलन करीत देशाच्या मुख्य भूमीचे ईशान्य भारताबरोबरचे दळणवळण सुस्थापित करण्यासाठी प्रयत्न करता आले असते. सध्याचा निमुळत्या कॉरिडोअरचे (चिकन नेक) परस्पर संमतीने विस्तारीकरण करता आले असते.

२) आज ५० वर्षांनंतरही भारताने १९७१च्या युद्धाचा अधिकृत माहिती व इतिहास जाहीर केलेला नाही. त्यामुळे अनधिकृत पुस्तके व तोंडी प्रसारित होणाऱ्या माहितीच्या आधारे व त्यातील पूर्वग्रहांसह युद्धात नक्की काय घडले, हे समजून द्यावे लागते.

३) भारताने युद्धात प्राण गमावलेल्या किंवा पकडल्या गेलेल्या आपल्याच सैनिक आणि नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले, दुसरीकडे आपण पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना मुक्त केले. याचे वर्णन उदारमतवादी असे करता येऊ शकते, मात्र हा बेजबाबदारपणाही आहे....

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आणि संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT