Mental Space Sakal
सप्तरंग

मेंटली फ्री कधी असशील?

पुण्यात असंख्य खाण्यापिण्याची ठिकाणं, मस्त मस्त कॅफेज असं खूप काही असलं तरी गेल्या पाचेक वर्षांत जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा जीवाला अजिबात शांती नसते.

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

बिझनेस मिटिंगच्या वेळा पाळण्याचा हा जमाना आहे. त्यात माणसाचे मनोव्यापार इतके वाढलेले असतात, की खासगी चर्चेसाठी मेंटल स्पेस शिल्लकच नसते.

पुण्यात असंख्य खाण्यापिण्याची ठिकाणं, मस्त मस्त कॅफेज असं खूप काही असलं तरी गेल्या पाचेक वर्षांत जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा जीवाला अजिबात शांती नसते. सकाळी १० ते संध्याकाळी पाचमध्ये मोजून तीन मीटिंग होतात.

तिसरी अर्धीच राहते असं मला नेहमी वाटतं. खूपदा तर परतीच्या प्रवासात काही तरी खायला वेळ मिळतो. त्यात मागे कधी तरी एका रविवारी पुण्यात असणार म्हणून, एका मीटिंगसाठी भेटायला विचारताना मला ओळखून असलेल्या व्यक्तीने अगदी नेमकं विचारलं, मेंटली फ्री कधी असशील?

सिलेक्टिव्हली सोशल आणि अत्यंत मूडी असणाऱ्या माणसांविषयी लोक खूप चटकन गैरसमज करून घेतात. त्यांच्या ईक्यू (इमोशनल इंटेलिजन्स)चं मोजमाप खूप लवकर केलं जातं. सिलेक्टिव्हली सोशल माणसांना खूपदा काही करायचं नसतं, काही काम नसतं, फक्त जीव रमत नाही म्हणून ते कुणातच मिक्स होत नाहीत.

अगदी स्वतःतही नाही. मेंटली फ्री नसणं, इमोशनली अव्हेलेबल नसणं, तुटक वागणं, कुणालाच भाव न देणं हे सगळे आत्मगम, सिलेक्टिव्हली सोशल माणसाचे फीचर्स असतात. तो तुम्हाला आता सापडला सापडला वाटताना हातून निसटून जातो. अशा माणसांना मेंटली फ्री कधी असशील असं कुणी विचारलं, की जजमेंटल जगातल्या रणरणत्या उन्हात थंडगार सावली वाट्याला यावी तसं वाटतं.

ही माणसं स्वतःच्या जन्मदात्यालाही पूर्ण कळत नाहीत. फक्त त्यांना आपल्या मुलाच्या मर्यादा आणि क्षमता यांची जाण असते. त्याच्या क्षमता, त्याचे स्वतःचे लिमिट्स स्ट्रेच करून स्वतःसोबत खेळत राहण्याची सवय ठाऊक असते.

माझा भाऊ तर कित्येकदा म्हणतो तुझ्या डोक्यात प्रोसेसिंग फास्ट होतं.

या गोष्टीचा तू फायदा करून घे. जेव्हा लोक आईला म्हणतात, की तुमची मुलगी एका वेळी एक गोष्ट का करत नाही. त्यावर माझी आई अत्यंत शांतपणे आजवर म्हणत आलीय तिला एका वेळी एक गोष्ट करायला दिली तर ती पूर्ण बिघडवेल. एकत्र तीन गोष्टी दिल्यात तर तिन्ही नीट होतील.

माझ्या मेंटल स्पेसमधला केओस ही माझी क्रिएटिव्ह स्पेस आहे, हे त्यांना खूप चांगलं समजलंय. माझ्यासारखी अजून किती तरी माणसं असतील. ही माणसं आपल्या कामाशी कमिटेड असतात, त्यांना एका वेळी चार गोष्टी करायच्या असल्याने सतत ते तुम्हाला कन्फ्यूज वाटू शकतात, पण तसं नसतं. कुठल्याही गोष्टीच्या परफेक्ट स्टार्टसाठी त्यांना मेंटली फ्री असावं लागतं.

हे समजून घेणारी जास्तीत जास्त माणसं अशा माणसांच्या वाट्याला आली तर त्यांचे किती तरी चॅलेंजेस कमी होतील. अशा माणसांना स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करतानाचे चॅलेंजेस अजिबात कमी नसतात. तेव्हा, मेंटली फ्री कधी असशील? असं विचारणारी, याची समज असणारी माणसं ढिगाने प्रत्येकाच्या अवतीभवती जमावीत असं मला नेहमी वाटतं.

बुद्धीची आणि मनाच्या भुकेची प्रखर जाणीव असणारी ही माणसं स्वतःच्या विचारांच्या जंजाळात गुरफटलेली असतात, ती तुमच्या माझ्या बाजूला असताना दोन रिकामे हात, चालते-फिरते पाय, दोन डोळे, कान असं सगळं असलेली आणि अगदीच समोर असणारी असतात खरी; पण त्यांचे डोळे उघडे म्हणजे ती पाहणारी, कान कानाच्या जागी म्हणजे तुमचं सगळंच ऐकणारी असतात असं मुळीच नाही.

कुणालाही कुठलीही गोष्ट सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी आणि आपल्या मनातला गुंता सोडवून घेण्यासाठी समोरची व्यक्ती इमोशनली अव्हेलेबल असणं आणि मेंटली फ्री असणं दोन्ही सारखचं महत्त्वाचं असतं. कित्येकदा आपण ज्याला कम्युनिकेशन वगैरे म्हणतो ते सगळं या दोन्ही बाबींचा विचार न करताच होतं. यात कौटुंबिक चर्चा या फार वरच्या क्रमांकावर येतात.

जेवणाच्या वेळी होणाऱ्या चर्चा, दोन सिच्युएशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींमधला संवाद हा साधारण या पद्धतीचा असतो. हलक्याफुलक्या चर्चा त्यात नसतातच. सतत खदखदणारे विषय या चर्चेत, आता नाही तर केव्हा असं म्हणून त्वेषाने मांडले जातात. ते आडवे-उभे पसरतात. कित्येकदा तर वादालाही तोंड या इथेच फुटतं. कारण खूप साधं असतं. चर्चा करून गुळगुळीत झालेले आणि उत्तरं न सापडलेले प्रश्न.

मग चर्चा करणाऱ्या मधल्या एकदुसऱ्याचं त्या विषयाचं डोक्यात जाणं आणि हळूहळू या प्रश्नाच्या जवळपास बोलणं येऊ लागलं की मेंटली या चर्चेतून स्वतःला ऑफ करून टाकणं हे अपोआप होऊन जातं किंवा समोरचा, समोर आहेच मग काढा विषय, टाका पाडून विषयाचा तुकडा, असं म्हणून त्याला गृहीत धरून चर्चेला सुरुवात करून टाकणं.

या मेंटली फ्री नसणाऱ्या माणसांना वयाचं बंधन नसतं कारण लहान मुलं, मोठी माणसं कित्येकदा याला मूड नसणं असंही एक मोघम कारण कित्येकदा देऊन टाकत असतात. मुद्दा इतकाच असतो अमुक-तमुक विषय बोलण्यासाठी, करण्यासाठी त्यांचा मेंदू तयार झालेला नसतो, मेंटली ते कुठल्या तरी वेगळ्या मुद्द्यावर, विषयावर आपल्या मतांची रांगोळी रेखत असतात, रेघोट्या मारत असतात.

लहान मुलांकडून अभ्यासाचं नाव काढल्यावर येणाऱ्या अनेक चित्रविचित्र प्रतिक्रिया मोठी माणसंसुद्धा त्यांचा अप्रिय विषय काढल्यावर देत असतात. लहान मुलांच्या बाबतीत आपण त्यांना समजून घेतो, कधी रट्टे देतो आणि मग अभ्यासाला बसवतो. मोठ्यांच्या बाबतीत मात्र ‘मेंटली फ्री कधी असशील?’ हे विचारण्याचा होमवर्क केला तर आणि किचकट विषय चालू करण्याआधी या प्रश्नाचं उत्तर मिळवलं तर चर्चा अपेक्षित परिणाम साधणाऱ्या होऊ शकतील.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT