Weekly Horoscope Sakal
सप्तरंग

साप्ताहिक राशिभविष्य (२४ ऑक्टोबर २०२१ ते ३० ऑक्टोबर २०२१)

सत्ता गाजवणारा माणूस हा एक अजब प्राणी आहे. सत्तेचा एक नैसर्गिक स्वभाव असतो हे आम्ही अगदी मान्य करतो.

श्रीराम भट saptrang@esakal.com

माणुसकीच्या सत्तेचा ओलावा जपू या !

सत्ता गाजवणारा माणूस हा एक अजब प्राणी आहे. सत्तेचा एक नैसर्गिक स्वभाव असतो हे आम्ही अगदी मान्य करतो. उदा. पाण्याची सत्ता ही वाहून नेण्याची आहे किंवा विरघळवणं हा पाण्याचा सत्ताधर्म आहे म्हणा हवं तर ! अशा प्रकारे या पंचमहाभूतांच्या सत्ताही या निसर्गात कार्यरत आहेत; पण तथाकथित माणूस ही एक अशी सत्ता आहे, की ती एक सत्ता नसून ते एक सत्तेचं ढोंगही असू शकतं! पंचमहाभूतं ढोंग करत नाहीत! माणूस मात्र नाटकं किंवा ढोंग करतो आणि इथंच सगळी मानवी जीवनाची मेख आहे. सत्तेचं ढोंग करणारा किंवा सत्तेचा दुरुपयोग करणारा माणूस हा पशुपेक्षाही भयानक आहे ! पशूंच्या नैसर्गिक सत्तेला किंवा त्यांच्या स्वभावाला आपण पाशवी म्हणत त्याची अत्याचारात गणना करतो ! परंतु माणसाच्या ढोंगी सत्तेला किंवा तथाकथित सत्तेच्या भयंकर दुरुपयोगाला पाशवी अत्याचार म्हणणं म्हणजे पशूंच्या प्रतिष्ठेला खरोखरच धक्का लावण्यासारखं आहे! अशी ही भयंकर अशी मानवी सत्ता मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक पातळीवरून सध्या अतिशय विचित्र पातळीवरून कार्यान्वित किंवा आविष्कृत होताना दिसत आहे!

माणसाची तथाकथित सत्ता किंवा या सत्तेचं ढोंग माणसाचं जीवन सध्या कोठे भरकटत नेत आहे याचा पत्तासुद्धा लागत नाहीये! असे हे सत्तेच्या मोहानं ग्रासलेलं माणसाचं जीवन सज्जनांना दूर लोटतं, शत्रूचा पाहुणचार करतं, दुर्जनाच्या पाया पडतं, परस्त्रीच्या गळ्यात पडतं आणि पतिव्रतेचा गळा घोटतं !

मित्रहो, माणूस आणि माणसाच्या कर्मसिद्धांताला पूर्ण पुसून टाकणारी सध्याची माणसाची सत्तास्पर्धा घरी आणि दारी आपले हातपाय पसरत आहे किंवा झाडत आहे. सध्या मेषेत अर्थातच डोक्‍यावर बसलेला हर्षल आणि त्यासमोर आलेला मंगळ, मकरेतील गुरू आणि शनी यांच्या कर्मसिद्धांतावर पूर्णपणे बोळा फिरवेल अशी लक्षणं आहेत. तरी गुरूचे चरण घट्ट पकडून ठेवा !

व्यावसायिकांची ऊर्जा वाढेल

मेष : सप्तमस्थ मंगळाची एकप्रकारची लष्करी राजवट राहू शकते. घरातील स्त्रीवर्गाशी जपून. बाकी सप्ताह गुरूभ्रमणाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यावसायिकांची ऊर्जा वाढवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात उत्तमच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा शेवट अपघातजन्य. विचित्र गाठीभेटींतून मनःस्ताप.

मानसन्मान लाभेल, बहारीचा काळ

वृषभ : सप्ताह मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय बहारीची फळे देईल. आजची संकष्टी भाग्यसंकेत घेऊन येणारी. ता. २८ चे गुरूपुष्यामृत रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या आदरसत्काराचे. नोकरीत प्रशंसा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार व्यावसायिक कामगारपीडेचा. प्रवासात विचित्र घटना घडू शकतात.

उधार उसनवारी टाळावी

मिथुन : उगाचच अस्वस्थ ठेवणारा सप्ताह. भविष्याचा जास्त विचार नकोच. सप्ताहात मित्रमंडळींशी वाद वा गैरसमज. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी उधार- उसनवारी सांभाळावी. बाकी ता. २५ व २६ हे दिवस गतिमान राहतील. तरुणांच्या मुलाखती. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक वसुली. मात्र शनिवारी तिन्हीसांजेच्यावेळी वाद टाळा.

तरुणांचा भाग्योदय होईल

कर्क : सप्ताहात मंगळाची लष्करी राजवट अंमल करू लागेल. सप्ताहात कोणताही अतिरेक नको. बाकी गुरूभ्रमणातून आणि शुक्रभ्रमणाच्या झुळकांतून मंद-मंद सुगंध येत राहीलच. सप्ताहात तरुणांचे निश्‍चितच भाग्योदय होतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती बाजी मारतील. पुष्य नक्षत्राच्या वृद्ध व्यक्तींनी शनिवार सांभाळावा.

सरकारी अनुदानामधून लाभ

सिंह : शुक्रभ्रमणाच्या विशिष्ट स्थितीचा उत्तम लाभ उठवाल. वास्तुविषयक व्यवहार होतील. आजची संकष्टी भाग्य घेऊन येणारी. व्यावसायिक उत्सवप्रदर्शनांतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस मोठ्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या ओळखी. सरकारी अनुदानातून लाभ. नोकरीत पगारवाढ.

प्रेमिकांना सुसंधी, चिंता मिटतील

कन्या : सप्ताहातील प्रत्येक वन डे गाजवाल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती दीपावलीच्या रोषणाईस लागतील. आजचा रविवार प्रेमिकांचाच. "करा होले होले.'' हस्त नक्षत्रास ता. २८ च्या गुरूपुष्यामृताचा मोठा महाप्रसाद मिळेल. घरातील तरुणांच्या चिंता मिटतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवार संध्याकाळ जपावी. धावपळीचा प्रवास नको.

व्यावासायिक पातळीवर मोठे लाभ

तूळ : राशीचे मंगळभ्रमण ग्रहांचा पट ताब्यात घेऊ लागेल. अर्थातच नैसर्गिक सहकार्य लाभणार नाही. अपवादात्मक परिस्थितीचे भान ठेवून असा. बाकी सप्ताहातील गुरू-शुक्राची स्थिती विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सुरक्षित कोषात ठेवेलच. ता. २५ व २६ हे दिवस छानच. व्यावसायिक मोठे लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी स्त्रीचं मन जपावं. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार अशांत.

विजयी घोडदौड सुरू राहील

वृश्‍चिक : ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची विजयी घोडदौड चालूच राहील. आजचा रविवार सप्ताहाचे छान पॅकेजच घोषित करेल. कलाकार किंवा बुद्धिजिवी मंडळींचे मोठे भाग्योदय अपेक्षित आहेत. टेक ऑफ घेण्याच्या तयारीत राहा. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ च्या गुरूपुष्यामृताचा मोठा लाभ. मात्र शनिवारी प्रवास सांभाळा.

नोकरीत छान पर्व सुरू होईल

धनू : सप्ताहात नोकरीतील एक छान पर्व सुरू होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या बाबतीत चमत्कार घडतील. नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ. ता. २५ व २७ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परिचयोत्तर विवाहयोग. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार जागरणाचा.

सप्ताह सुंदर पॅकेजचा असेल

मकर : श्रद्धावंत आणि प्रामाणिक व्यक्तींना गुरू-शनीची मंत्रालय साथ देतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार सप्ताहाचे सुंदर पॅकेज घोषित करणारा. मात्र घरात लष्करशाही करू नका. ता. २८ चा गुरूपुष्यामृत आपल्या राशीस एक शुभमुहूर्तच ! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा भाग्योदय. मात्र शनिवारी वाहनं सांभाळा.

न्यायालयीन कामकाजात यश

कुंभ : सप्ताह बुद्धिजिवी मंडळींना छानच राहील. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींचे नोकरीत भाग्योदय. धनिष्ठा नक्षत्रास विशिष्ट स्पर्धात्मक यश. उद्याचा सोमवार भाग्य घेऊन येणारा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ चा गुरूपुष्यामृत योग दैवी चमत्काराचा. कोर्टप्रकरणात यश. भूखंड सोडवाल. पुत्रचिंता जाईल. व्हिसा मिळेल.

प्रतिष्ठेचा काळ, विवाहयोगाची शक्यता

मीन : राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये मानांकन घेणारी रास. अर्थातच आपला शेअर चांगलाच वधारणार आहे. सप्ताहात गुरू - शनीच्या मंत्रालयातून मोठे लाभ होतील. मोठे नवस फेडाल. ता. २५ ते २७ हे दिवस मोठे गतिमान राहतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बलवत्तर विवाहयोग. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी रोख पैसे सांभाळावेत. दंतव्यथा सतावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT