Weekly Horoscope Sakal
सप्तरंग

साप्ताहिक राशिभविष्य (३ ऑक्टोबर २०२१ ते ९ ऑक्टोबर २०२१)

जग हे सूर्याभोवती फिरतंय हे निर्विवाद! किंबहुना जग हे प्रकाशाभोवती फिरतंय हेसुद्धा पूर्णसत्य आहे! त्यामुळंच या जगात प्रकाश आणि गती याशिवाय काहीही नाही!

श्रीराम भट saptrang@esakal.com

नका होऊ धृतराष्ट्र !

जग हे सूर्याभोवती फिरतंय हे निर्विवाद! किंबहुना जग हे प्रकाशाभोवती फिरतंय हेसुद्धा पूर्णसत्य आहे! त्यामुळंच या जगात प्रकाश आणि गती याशिवाय काहीही नाही! अध्यात्मात ज्ञान आणि सूर्य यांचा अगदी जवळिकीतून उल्लेख केला जातो. सूर्य विज्ञानाच्या भाषेत प्रकाश आणि उष्णता दोन्ही देत असतो. ज्ञानप्रकाश किंवा ज्ञानसूर्य माणसाला भवतापाचा चटका देत नसतो. जडबुद्धीचा माणूस सूर्यप्रकाशाचा चटका अनुभवतो. म्हणूनच माणसं म्हणत असतात, उन्हात फिरू नको, याचा अर्थ सूर्याचं अस्तित्वच नाकारून घरात बैस असा होत नसतो. जडबुद्धीला ज्ञानप्रकाश सहन होत नाही. आपल्या संस्कृतीत गभस्ती सूर्याच्या चिंतनाला महत्त्व दिलं आहे. हा गभस्ती सूर्य म्हणजेच एकप्रकारचा ज्ञानप्रकाश होय! त्यामुळंच या गभस्ती सूर्याला सावली माहीत नाही. जडदेहाची सावली पडते आणि या सावलीलाच नामरूपात्मक वस्त्रं घालणारा जडबुद्धीचा माणूस ज्ञानप्रकाशाशी सोयरीक कधीच साधत नाही! त्यामुळंच त्याला ज्ञानसूर्याचीसुद्धा ॲलर्जी असते, याला काय म्हणावं! हाच तो कुरुक्षेत्रावरील धृतराष्ट्र होय! आणि हा धृतराष्ट्र आपला घरचा टीव्ही संजयाबरोबर न पाहता आपल्या पत्नीसमवेत पाहत असतो.

ज्योतिषतत्त्व हे ज्ञानप्रकाशातच नांदलं पाहिजे! माणसाची जडबुद्धी ग्रहांच्या माध्यमातून सूर्याभोवती फिरत असते आणि ग्रहांना कारकत्वाच्या संदर्भातून माता, पिता, बंधू, सखा किंवा पती वा पत्नी यांच्या सावल्या किंवा दृष्टी देऊन त्यांच्या छायेत भवतापाचे चटके अनुभवतो म्हणा, किंवा हे चटके ज्योतिषाकडून जाणवून घेतो असंही म्हणा हवं तर! माणसानं जीवनात उत्तरायणाकडं नेणाऱ्या ज्ञानप्रकाशाचं सतत अनुसंधान ठेवलं पाहिजे, तरच तो देहाच्या घराबाहेर पडल्यावर सूर्यलोकाशी संधान ठेवत ग्रहबंधनातून मुक्ती साधू शकतो! मित्र हो, ६ ऑक्‍टोबरच्या बुधवारी सर्वपित्री अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात चंद्र-बुध युतीयोग होत आहे. चंद्र हे मन आहे, बुध हे ज्ञान आहे. मन हे भिकारड्या इंद्रियांच्या मागं लागून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तिन्हीकाळी होरपळतच असतं! त्यामुळंच यंदाच्या सर्वपित्री अमावास्येच्या मुहूर्तावर आपण अखंड ज्ञानप्रकाशात राहण्याचा संकल्प करत, या भवतापातून सुटण्याचा मार्ग अनुसरत हनुमंतांसारखं सूर्यलोकाकडं झेपावूया आणि ज्ञानप्रकाशात गुरुवारी घटस्थापना करूया!

सुवार्ता मिळतील

मेष : राशीचा हर्षल आणि अमावास्येचं फिल्ड आपल्या राशीस खराबच. घरात शांत राहा, विशेषतः नवपरिणितांनी. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी घटस्थापनेचा दिवस वैयक्तिक सुवार्तांचा. नोकरीतील घडामोडी प्रसन्न करतील. बाकी ता. ८ व ९ हे दिवस शारीरिक दुखापतींचे. काहींना पित्तप्रकोप.

नोकरीत मोठा दिलासा

वृषभ : बुध-गुरू योगाचं ग्राउंड अमावस्येचा व्हायरस भासू देणार नाही. मात्र गर्भवतींनी काळजी घ्यावी. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घटनांतून मोठा दिलासा. ता. ७ चा घटस्थापनेचा दिवस गुरुकृपेचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार संकटनिवारणाचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी अग्निभय. श्‍वानदंशापासून सावध.

प्रिय व्यक्तींचा भाग्योदय

मिथुन : सप्ताहातील ग्रहयोग अमावास्येचं गांभीर्य वाढवतील.शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक अशा त्रिविध पातळीवरील आचारसंहिता पाळा. बाकी यंदाची ता. ७ ऑक्‍टोबरची घटस्थापना पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय करणारी. नोकरीत सन्मान. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येचं गांभीर्य लक्षात ठेवावं वा अवधान बाळगावं.

प्रवास टाळा, महत्त्वाच्या गाठीभेटी होतील

कर्क : गुरुभ्रमण घटस्थापनेच्या प्रभावात उत्तम बोलेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती याचा सुंदर लाभ उठवतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. कलाकारांचे भाग्योदय होतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अमावास्येचं फिल्ड प्रवासात घातक. शनिवारची संध्याकाळ विवाहविषयक निर्णयाची!

स्त्रियांनी सावधानता राखावी

सिंह : सप्ताह नैसर्गिक पाठबळ न देणारा. महत्त्वाच्या कामांतून विचित्र अडथळे येतील. अमावास्येजवळ घरात शांत राहा. स्त्रीवर्गानं भाजण्या, कापण्यापासून जपावं. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सुवार्तांचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ७ चा घटस्थापनेचा दिवस व्यावसायिक शुभारंभाचा.

नवरात्र उमेद देणार

कन्या : सप्ताह नोकरी-व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर उत्तम. नवरात्राचा आरंभ मोठी उमेद देणारा. मात्र ता. ६ ची अमावास्या ग्रहयोगांच्या पार्श्‍वभूमीवर दखलपात्र. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापती सांभाळाव्यात. बाकी ता. ७ ची घटस्थापना एकूणच आपल्या राशीस मोठी शुभसंबंधित. शनिवारी पाकीट सांभाळा.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

तूळ : सप्ताहातील अमावास्येचं प्रभावक्षेत्र अतिरेकी प्रवृत्तीच्या मंडळींना त्रासदायक. वाहनं सांभाळा. प्रवासात जपा. नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज नकोत. बाकी ता. ७ च्या घटस्थापनेनंतर विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी रवी, बुध आणि गुरू यांच्यातील शुभयोगांतून लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार व्यावसायिक भाग्यसंकेताचा. सप्ताह जुन्या गुंतवणुकी यशस्वी करणारा.

तरुणांना यश देणारा कालखंड

वृश्‍चिक : राशीचा शुक्र आणि सप्ताहातील गुरुभ्रमणाची स्थिती एकूणच आपणास तारक ठरणारी. अनुराधा व्यक्तींना नवरात्रारंभ मोठा शुभ. गुप्तचिंता जातील. तरुणांना भव्य यश देणारा नवरात्र. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार मोठ्या भाग्योदयाची चाहूल देईल. मात्र, शनिवार घात-अपघातापासून जपण्याचा.

ओळखी - मध्यस्थींतून नोकरीचा लाभ

धनू : सप्ताहात बुद्धिचातुर्य उपयोगी पडेल. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. तरुणांना ओळखी - मध्यस्थीतून नोकरीचा लाभ. नवरात्रात उत्तराषाढा व्यक्ती सेलिब्रिटी बनतील. ता. ७ चा घटस्थापनेचा गुरुवार एक शुभ दिवस राहील. शुभारंभ कराच. पूर्वाषाढास अमावास्या विचित्र दगदगीची. वृद्धांनी जपावं.

मुलाखतींमध्ये यश मिळेल

मकर : सप्ताहातील रवी, बुध आणि गुरू यांचे योग नवरात्रात धमाल उडवतील. तरुणांनो, संधींवर दबा धरून बसा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरूचा इम्युनिटी डोस मिळेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना मुलाखतींतून यश. मात्र, शनिवारी वाद टाळा. सार्वजनिक जीवनात जपा.

न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश

कुंभ : अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात होणारे ग्रहयोग अतिशय संमिश्र स्वरूपातून फलदायी होतील. सप्ताहात शारीरिक मस्ती नको. नका करू ट्रेकिंग! अमावास्येजवळ नवपरिणितांनी गैरसमज टाळावेत. बाकी घटस्थापनेचा गुरुवार धनिष्ठा नक्षत्रास व्यावसायिक लाभाचा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणातून यश. मंत्र्यांकडून कामं होतील.

गुरुभ्रमणाची साथ उत्तम

मीन : सप्ताहात गुरुभ्रमणाची साथ उत्तम राहील. आजचा रविवार त्याचीच प्रचिती देईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह अपवादात्मक परिस्थितीतून लाभ देणारा. नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या घरात रुसव्याफुगव्यांची. शनिवारी विचित्र खर्च होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT