world photography day was started in 19 August 1839 
सप्तरंग

World Photography Day : असा सुरू झाला 'वर्ल्ड फोटोग्राफी डे!'

वृत्तसंस्था

आज 19 ऑगस्ट म्हणजेच 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'! जगातील सर्व फोटोग्राफर्सला उत्तम फोटोग्राफीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाची सुरवात केली. जागितक फोटोग्रफी डे सुरू करण्यामागे एकच उद्देश होता, तो म्हणजे प्रत्येक फोटोग्राफर्सनी काढलेला एक सुंदर फोटो त्यांनी शेअर करावा. फोटोग्राफरने त्यांचं जग हे इतर जागासोबत शेअर करावं!

सर्वांत पहिल्यांदा फ्रान्सने हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली. त्यानंतर जगभरात त्याला मान्यता मिळून आज सर्व जग फोटोग्राफर्स डे साजरा करत आहे. 1837 मध्ये फ्रेंचमन लुईस डॅगेरे आणि जोसेफ नाईसफोर यांनी विकसित केलेले 'डेगेरिओटाईप' हे फोटोग्राफी टेक्निक जगाला कळावेत यासाठी हा दिवस सुरू करण्यात आला. फ्रेंच सरकारने 9 जानेवारी 1839 मध्ये या टेक्निकसाठी पेटंट नोंदवले व फोटोग्राफर्स डे दिवस सुरू करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे 19 ऑगस्ट 1839 मध्ये जागतिक फोटोग्राफी डे सुरू झाला.

हेलिओग्राफी ही पद्धत वापरून निप्स या फोटोग्राफरने प्रथम पर्मनंट फोटोग्राफ काढला. त्यानंतर 'डेगेरिओटाईप' ही पद्धत वापरून पर्मनंट फोटोग्राफ काढण्यात आला. 

सर्वात पहिला कलर फोटो
सर्वात पहिला कलर फोटो काढणारा फोटोग्राफर म्हणजे थॉमस सुटॉन. त्याने 1861 मध्ये सर्वाधिक काळ टीकणारा कल फोटो काढला होता. 3 कृष्णधवल फोटोंचा सेट असलेल्या फोटोला लाल, हिरव्या व निळ्या रंगाचे फिल्टर देण्यात आले होते. 

सर्वात पहिला डिजिटल फोटो
जगातील सर्वात पहिला डिजिटल फोटो हा 1957 मध्ये काढण्यात आला. 176*176 इतके या फोटोचे रिझोल्युशन होते.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT