आजपर्यंत दोन दशकांत त्यांनी तब्बल १२७ महिलांना जटामुक्त केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल ऑक्सफर्ड विद्यापीठानेही (Oxford University) घेतली आहे.
कोळे : जटा म्हणजे अंधश्रद्धाच. जटांच्या ओझ्याने अनेक व्याधीही जडतात. त्याची पूर्व कल्पना नसल्यामुळे जटा ठेवण्याची पद्धत समाजात रूढ आहे. त्या पद्धतीवर घाला घालून जटा निर्मूलन करण्याचा ध्यास कऱ्हाडच्या विज्ञानधिष्ठित प्रा. डॉ. सुधीर कुंभार यांनी ठेवला आहे.
आजपर्यंत दोन दशकांत त्यांनी तब्बल १२७ महिलांना जटामुक्त केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल ऑक्सफर्ड विद्यापीठानेही (Oxford University) घेतली आहे. त्यांच्या कार्याची माहितीचा त्यांनी अभ्यासक्रमात समावेश केला आहे. त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित केले आहे.
घारेवाडी परिसरात त्यांनी पनुकतीच युवतीला जटामुक्त केले. तिच्या डोक्यातील जटांचा गुंता जसा जसा सुटत होता, तस तसा तिच्या मनातील अंधश्रद्धेचाही गुंता सुटत असावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. जटा निर्मूलन मोहिमेच्या अंतर्गत २१ वर्षीय युवतीच्या तीन वर्षांपासून असणाऱ्या जटा घारेवाडीच्या शिवम प्रतिष्ठानमध्ये सोडविण्यात आल्या.
जटा निर्मूलनाचे कार्य करणारे रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. कुंभार, त्यांचे सहकारी अलकेश ओहळ, सुहास पाटील यांनी केले. त्यांनी अत्यंत गुंतागुंत झालेल्या जटा सोडविण्यासाठी सलग दोन अडीच तास काम केले. जटा सोडविल्यामुळे त्या युवतीलाही बरे वाटले. मूळ कर्नाटकातून येथे स्थायिक झालेले ते कुटुंब होते.
जटा सोडविण्यासाठी मानसिक तयारी झाल्यावर समुपदेशन केल्यानंतर या जटेचा गुंता सोडविण्यात आला. आतापर्यंत १२६ जटा सोडविण्यात आल्या असून, त्यापैकी कोणत्याही व्यक्तींना पुन्हा कोणताही त्रास झाला नाही. या वेळी आनंदा खबाले, अरविंद इंगोले यांचेही सहकार्य मिळाले. जटा निर्मूलनात एम. एन. रॉय संस्था व शिवम प्रतिष्ठानचे सदस्यांनाही त्यात सहभाग घेतला.
युवतीच्या मनावरील तणाव कमी झाल्याने आणि सर्व केस मोकळे झाल्याने तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले पाहावयास मिळाले. जटा ही एक अंधश्रद्धा आहे. ती समूळ नाश करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
-डॉ. सुधीर कुंभार, विज्ञान अभ्यासक, कऱ्हाड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.