Koyna Dam esakal
सातारा

'चार दिवसात कोयनेतून 13 TMC पाणीसाठा नदीपात्रात सोडणार'

विजय लाड

कोयनानगर (सातारा) : कोयना धरणाची (Koyna Dam) पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता धरणाची वक्र दरवाजे एकूण 9 फूट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 49,344 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी 2152 फूट 0 इंच झाली असून धरणात 90.46 TMC पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणातून 33045 क्युसेस विसर्ग चालू असून 13 टीएमसी पाणीसाठा चार दिवसात सोडण्यात येणार असल्याचे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार यांनी सांगितले. (13 TMC Of Water From Koyna Dam Will Be Released Into The River bam92)

सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने नुकताच रेड अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसासाठी प्रती चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात केवळ 9 दिवसात कोयनानगर येथे 29 % नवजा येथे 34 % तर महाबळेश्वर येथे 35 % पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात केवळ 25 % पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरण परिचलन सूचीप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटावर उघडण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून 49,344 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने नुकताच रेड अलर्ट जारी केला असून या पार्श्‍वभूमीवर कोयना धरणातून सकाळी अकरा वाजल्यापासून १७ हजार क्युसेसने विसर्ग वाढवून तो ४९ हजार ३४४ क्युसेस करण्यात आला आहे. गेली पाच दिवस धरणातून ३३ हजार क्युसेसने पाणी सुरु होता. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाल्याने पाटबंधारे विभागाकडून नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

13 TMC Of Water From Koyna Dam Will Be Released Into The River bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT