- सचिन शिंदे
कऱ्हाड - शहरातील भुयारी गटार योजना व वाढीव भागाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अद्यावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६० कोटींसह अन्य कांमासाठी ४९ कोटी असा तब्बल २०९ कोटींचा निधी मंजुर झाला आहे. यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते, माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री शिंदे यांनी निधी मंजूर केला आहे.
त्यात १६० कोटींचा निधी नगरोत्थान महाभियानातून तर जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांतून ४९ कोटींची निधी मंजुर आहे. कऱ्हाड शहराची २०५६ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून दोन्ही योजनांचे अद्ययवतीकरण होणार आहे.
माजी उपाध्यक्ष यादव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आश्वासन दोन्ही महत्त्वाच्या योजनांच्या अद्यवतीकरणासाठी १६० कोटींचा निधी मुख्यमत्र्यांनी मंजुर केला आहे. त्यासाठी श्री. यादव यांनी यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांसह व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे व संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा योजनेच्या अद्ययावतीकरणाबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते. शहराची हद्दवाढ झाली आहे. त्या हद्दवाढ भागात दोन्ही योजनांचे अद्यावतीकरण होणार आहे. त्यामुळे येथे नागरीकरणास वेग येणार आहे.
शहराची भुयारी गटार योजना सुमारे ५० वर्षांपूर्वींची आहे. त्यावेळपासून पालिकेचा राज्यात लौकिक आहे. त्या योजनेला बराच मोठा कालावधी लोटल्याने योजनेच्या पाईप झिजत आहेत. त्यामुळे योजनेचे अद्यावतीकरण व्हावे, अशी मागणी होती. पालिकाही त्यासाठी प्रयत्नशील होती. त्या पार्श्वभूमीवर नगररोत्थानमधून मूळ शहरातील अस्तित्वात असलेल्या भुयारी गटार योजनेचे अद्यावतीकरण होणार आहे.
शहराच्या तिप्पट आकाराने असलेल्या हद्दवाढ भागात नव्या नलिका टाकल्या जाणार आहेत. ड्रेनेज पंपिंग स्टेशनही अद्यावतीकरण होणार आहे. त्यासाठी सुमारे ९६ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर आहे. शहरातील जुन्या पाण्याच्या टाक्यांसह नवीन टाक्या बांधून पाणी पुरवठा सुरू आहे. २०५६ सालापर्यंत शहराची लोकसंख्या तीन लाखापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
त्या लोकसंख्येला मुबलक पुरेल इतका पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणी योजना सक्षम असावी, या दृष्टीने पाणीपुरवठा योजनेचे अद्ययावतीकरण होणार आहे. त्यासाठी सुमारे ६३ कोटी ४८ लाख रुपये इतका निधी मंजूर आहे. जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांतून सुमारे ४९ कोटींचा निधीही मंजुर आहे.
या दोन्ही योजनांचे शासन आदेश प्रसिध्द झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात यादव यांना योजनांचे अध्यादेश प्रदान केले. यादव यांनी मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री देसाई, खासदार शिंदे व शिवसेनेचे संपर्कप्रमुख कणसे यांचा सत्कार केला.
पालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठी तरतूद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजेंद्र यादव यांनी शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचा संकल्प केला होता. यासाठी वर्षभर ते प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात एकाच वेळी २०९ कोटी रुपयांचा निधी मंजुर होण्याची पालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे, त्यासाठी यादव यांना पालकमंत्री देसाई यांचे यादव यांना विशेष सहकार्य मिळाले आहे. पाणी प्रश्न निर्माण झाल्यानंतर यादव यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. पाण्याचा प्रस्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून ७३ लाखांचा निधी पाईप लाईनसाठी मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.