अनधिकृत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी 36 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई (सातारा) : केंजळ (ता. वाई) येथे अनधिकृत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) बसविल्याप्रकरणी ३६ तरुणांवर भुईंज पोलिस ठाण्यात (Bhuinj Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत २८ जणांना ताब्यात घेतले असून, त्यातील २२ जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केंजळ येथे विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) शुक्रवारी (ता. ११) बसवल्याने पोलिस व महसूल प्रशासन गावात दाखल झाले होते. शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने गावात तणावाचे वातावरण झाले होते. पुतळा ग्रामस्थ व युवकांनी काढून घ्यावा व प्रशासनाची परवानगी घेऊन बसवावा, यावर प्रशासन ठाम असताना पुतळा हटविण्यास गावातील ग्रामस्थ आणि युवकांचा विरोध केल्याने स्थानिक प्रशासनाने मोठा बंदोबस्त नेमून शनिवारी (ता. १२) रात्री पुतळा हटविला. या प्रकरणी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामधील सहा जणांना यापूर्वी, तर काल २२ जणांना अटक करण्यात आली.
यामध्ये वाई, खंडाळा, केंजळ येथील युवकांचा समावेश आहे. यामध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश आहे. त्या सर्वांना नोकरीच्या वेळी कायदेशीर प्रक्रियेमुळे त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी या सर्वांकडून पुतळा व चबुतरा उभारणी कामात आर्थिक मदत केलेल्यांची माहिती पोलिसांनी मिळवली असून, त्या सर्वांना पोलिस ताब्यात घेणार आहेत. त्यामुळे मदत कारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती वाईच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांनी दिली. अधिक तपास आशिष कांबळे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.