Krishna Factory Karad esakal
सातारा

'कृष्णा'साठी माजी अध्यक्षांसह 23 जणांचे अर्ज दाखल, दोन विद्यमान संचालकही मैदानात!

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी (Krishna Sugar Factory Election) आज माजी अध्यक्ष अविनाश मोहिते (Former President Avinash Mohite) यांच्यासह 23 जणांनी अर्ज दाखल केले. त्यात दोन विद्यमान संचालकांचाही समावेश आहे. दिवसभरात तब्बल 120 अर्जांची विक्री झाली आहे. आजअखेर 247 अर्जांची विक्री झाली आहे. (23 Candidates Have Filed Nomination For Krishna Sugar Factory Election Satara Political News)

कृष्णा कारखान्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून पहिल्या दिवशी विद्यमान संचालकांसह सहा जणांनी अर्ज दाखल केले होते.

कृष्णा कारखान्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी विद्यमान संचालकांसह सहा जणांनी अर्ज दाखल केले होते. शासकीय सुट्टी दिवशी अर्ज भरले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आज अर्ज पुन्हा भरण्यास सुरवात झाली. आजच्या दिवशी 23 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता अर्ज भरण्यास मोजकेच तीन दिवस शिल्लक आहेत. त्यात उद्या (शुक्रवार), सोमवार व मंगळवार असे दिवस आहेत. आजचा दिवस गेला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर (Election Officer Prakash Ashtekar) यांनी सांगितले. आज दिवसभारत 23 अर्ज दाखल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या दिवशी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी रेठे बुद्रुक-शेणेली गटातून अर्ज भरला आहे. त्यांच्या आई नूतन मोहित यांनीही त्याच गटासह महिला राखीव मधून अर्ज भरला आहे. त्याशिवाय शिवाजी आवळे (शिरटे) या विद्यमान संचलकांनाही अर्ज भरला आहे. महिला राखीव डबल अर्ज भरले आहेत. 

गटनिहाय भरलेले अर्ज असे : वडगाव हवेली - दुशेरे गट : उत्तम विष्णू खबाले, उत्तम तुकाराम पाटील. काले-कार्वे गट : अमरसिंह बाळासाहेब थोरात, विजय निवृत्ती पाटील. रेठरे हरणाक्ष-बोरगाव गट : जयवंत दत्तात्रय मोरे, शिवाजी आप्पासाहेब पवार, संभाजी भगवान दमामे, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे, मानाजी प्रल्हाद पाटील, पोपट रंगराव थोरात. येडेमच्छिंद्र-वांगी गट : बाबासाहेब वसंतराव पाटील. रेठरेबुद्रुक शेणोली गट : अविनाश जगन्नाथ मोहिते, नूतन जगन्नाथ मोहिते. अनुसूचित जाती जमाती राखीव : शिवाजी उमाजी आवळे, बाजीराव आबा वाघमारे. महिला राखीव गट : नूतन जगन्नाथ मोहिते, अर्चना अविनाश मोहिते, क्रांती तानाजी पाटील, मिनाक्षीदेवी संभाजी दमामे. इतर मागासप्रवर्ग गट : वसंतराव बाबुराव शिंदे. वीजा, भज. राखीव गट : अमोल काकडे

23 Candidates Have Filed Nomination For Krishna Sugar Factory Election Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT