Dhom Dam meeting sakal
सातारा

Satara : धोम कालवा दुरुस्तीस ३५ कोटींची गरज

अशोक पवार : धरण व्यवस्थापन व संघर्ष समितीची शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत बैठक

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : धोम धरण भिंत ते आर्वी-नागझरीपर्यंत जाणाऱ्या ११५ किलोमीटर अंतराच्या डावा कालवा अस्तरीकरणासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले असून, अजून सुमारे ३५ कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती धोम धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी दिली. त्यावर धरण व्यवस्थापन व धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने निधी मागणीचे प्रस्ताव द्यावा, त्यास मंजुरी आणण्याची ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

धोम धरण डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी ५० कोटी मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचे नियोजन करण्यासाठी आमदार शिंदे यांनी धोम धरण व्यवस्थापन आणि धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची संयुक्त बैठक आज सातारा येथे विश्रामगृहामध्ये बोलविली होती.

त्यात आमदार शिंदे बोलत होते. समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी बहुतांश वेळी कालव्यात पाणी बसत नसल्याने कालवा फुटी टाळण्यासाठी कालव्याच्या भरावाची उंची वाढवावी, अस्तरीकरण करताना प्रथम जाळी टाकावी, मग त्यावर सिमेंट टाकावे म्हणजे काम मजबूत होईल, असे सांगितले.

समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे यांनी डाव्या कालव्यावर असलेले काही उड्डाणपूल आज कमकुवत झालेले आहेत. त्यांची तपासणी करून त्यांचे नूतनीकरण करावे म्हणजे अधे मधे अचानकपणे पूल कोसळून पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, असे मत व्यक्त केले.

डाव्या कालव्याचे अस्तरीकरण हाती घेतले आहे; परंतु पाणीपुरवठा सुरू असताना अचानक कोठे कालवा फुटला तर धोम पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागानेसुद्धा तातडीने दुरुस्तीत सहकार्य करण्याची सूचना आमदार शिंदे यांनी बैठकीस उपस्थित यांत्रिकी विभागाच्या अधिकारी एस. डी. खंदारे यांना दिल्या.

या वेळी संघर्ष समितीचे जगदीश पवार, अविनाश माने, पृथ्वीराज माने, माणिकराव भोसले, कॅप्टन महादेव भोसले, उपकार्यकारी अभियंता श्रीमती मोहिते, शाखा अभियंता पिसाळ, कुलकर्णी, ठोंबरे आदी उपस्थित होते.

धोम धरण डाव्या कालव्यातील पाण्याची प्रचंड गळती होत आहे. दर वर्षी निव्वळ गळतीमुळे तीन टीएमसी पाणी वाया जात असेल. हे पाणी कालवा अस्तरीकरणामुळे वाचेल आणि किमान दोन रोटेशन वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांना आठऐवजी दहा रोटेशन मिळू शकतील.

— नंदकुमार पाटील, सचिव, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT