Heavy Rain in Khatav esakal
सातारा

वरुणराजाच्या रौद्र अवतारानं 40 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार

राजेंद्र शिंदे

जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी 'त्यांची' तारांबळ उडाली; पण..

खटाव (सातारा) : खटाव परिसरात (Khatav) बुधवारी रात्री अचानक हजेरी लावलेल्या पावसात (Heavy Rain) हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची गारठून ४० मेंढरं ठार झाल्याने संपूर्ण मेंढपाळांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी (ता. खटाव) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांचा मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस कराराने मेंढरं बसवली होती.

काल अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. मात्र, अंधार पडला असल्याने व चिखल झाल्याने त्यांना मर्यादा आल्या. परिणामी, ४० मेंढरं गारठून ठार झाली. याबाबत अधिक माहिती अशी, की लोणी (ता. खटाव) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांचा मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस कराराने मेंढरं बसवली होती. काल अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली.

मात्र, अंधार पडला असल्याने व चिखल झाल्याने त्यांना मर्यादा आल्या. परिणामी, ४० मेंढरं गारठून ठार झाली, तर काही अत्यावस्थ स्थितीत आहेत. एकदम ४० मेंढरं दगवल्याने चव्हाण कुटुंबीयांवर आकाश कोसळलं आहे. शासनानं या घटनेची माहिती घेऊन त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी विनंती चव्हाण दाम्पत्यांनी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT