Koyna Dam Patan Satara esakal
सातारा

कोयना धरणातून आज दुपारी 40 हजार क्युसेक विसर्ग करण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.

हेमंत पवार

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील दोन आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. मागील आठवड्यात दररोज सरासरी चार ते पाच टीएमसी पाण्याची आवक होत होती.

कऱ्हाड : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा आज मंगळवारी सकाळी आठ वाजता ८५.३७ टीएमसी झाला आहे. सद्यस्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या ३० हजार क्यूसेक विसर्गात वाढ करून तो आज दुपारी बारा वाजता 40 हजार क्यूसेक करण्यात येणार आहे, त्यामुळे कृष्णा कोयना नदीकाठी (Krishna Koyna River) पुन्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शनिवारी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातून करणाऱ्यात येणारा ३० हजार क्यूसेक विसर्ग स्थिर ठेवण्यत आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने पुराचा धोका टळळ्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील दोन आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. मागील आठवड्यात दररोज सरासरी चार ते पाच टीएमसी पाण्याची आवक होत होती. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून कोयना नदी पात्रात धरणाच्या सांडव्यावरून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, पाण्याची आवक जलाशयात प्रति सेकंद ८५ हजार क्युसेक्स पेक्षा जास्त होत होती. त्यामुळे दोन तासातच धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत उचलून २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता.

धरणात होणारी पाण्याची आवक आणि धरणाचा एकूण पाणीसाठा याचा ताळमेळ बसत नव्हता, त्यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणाचे दरवाजे सहा फुटांवर नेऊन कोयना नदीत ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला. सांडव्यावरुन ३० आणि पायथा वीज गृहातून दोन हजार १०० क्युसेक असा ३२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येत होता तो विसर्ग गेले तीन दिवस कायम ठेवण्यात आला होता.

काल सोमवारी रात्रीपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडासा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी बारा वाजता कोयना धरणातून 40 हजार वीस क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. आज सकाळी आठ वाजता धरणात 85.37 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात 35 हजार 401 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगरला 107, नवजा 99 तर महाबळेश्वरला 158 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

40 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार

कोयना धरणातून आज मंगळवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात येणारे 40 हजार क्यूसेक व पायथा वीज गृहातून सोडण्यात आलेले दोन हजार 100 क्यूसेक असा 42 हजार 100 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT