90 percentage sowing in Chafal division satara 
सातारा

चाफळ विभागात ९० टक्के पेरण्या

शेतकऱ्यांत समाधान; डोंगरी भागात नाचणी, भात पिकांची चांगली उगवण

सकाळ वृत्तसेवा

चाफळ - विभागात गत आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ९० टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डोंगरी भागात पिकांची उगवण चांगली झाल्याने विभागातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

बळीराजा कोळपणीच्या कामात व्यस्त आहे. यावर्षी विभागात वळीव पाऊस चांगला झाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली. तरीही तळभागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता. त्यामुळे तळभागातील पेरण्याही रखडल्या होत्या. मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाने पेरणी करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत विभागात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

डोंगरी भागात हायब्रीड, पसऱ्या भूईमुग, निमपसऱ्या, वेस्टर्न, ट्रॉंबे आदी भुईमुगाच्या जाती, भात या मुख्य पिकाबरोबरच विविध प्रकारची कडधान्याची पेरणी करण्यात आली आहे. या सर्वच पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाल्याने येथील शेतकरी समाधानी आहेत. चाफळसह इतर तळभागात सोयाबीन पेरण्याचे प्रमाण जास्त आहे.

विभागात गणेवाडी, कोळेकरवाडी, भैरेवाडी, महाबळवाडी, गुजरवाडी, सर्व सडे, कोचरेवाडी, विरेवाडी, चव्हाणवाडी, मस्करवाडी व जंगलवाडीतील काही शेतकरी दुर्मिळ होत चाललेली नाचणी व वरीचे पिकही घेत आहेत. नाचणीच्या तरव्याचींही उगवण चांगली झाली आहे. पाडळोशी, धायटी व दाढोली परिसरात लागणीचे भात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथेही भाताचे तरवे चांगल्या प्रकारे उगवून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT