कऱ्हाड (सातारा) : जन्मतःच आलेले अंधत्वाचे दुःख बाजूला सारून कऱ्हाड व परिसरातील आठ अंध मित्रांनी एकत्रित येत तब्बल २५ हजार सीडबॉलची (Seedball) बँक तयार केली आहे. प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेने (Prerna Association for the Blind Institution) या आठही अंध मित्रांच्या उपक्रमाला चालना दिली आहे. प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेचे येथे प्रेरणा दिव्यांग केंद्र (Prerna Divyang Center) आहे. त्या केंद्रात कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील अनेक अंध मुलांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. त्यात संगणकाच्या ज्ञानापासून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीचे प्रयत्न होतात. (A Bank Of 25 Thousand Seedball Was Created By Blind Friends In Karhad Satara Marathi News)
प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेचे येथे प्रेरणा दिव्यांग केंद्र आहे. त्या केंद्रात कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील अनेक अंध मुलांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते.
येथील एका शाळेत त्या संस्थेचे कामकाज चालते. सतीश नवले, हनुमंत जोशी, सुजय कुलकर्णी, श्यामराव मदने, समीर रांजणे, दिलावर शेख आदी सहकारी त्यासाठी काम करतात. अंध युवकांनी आत्मनिर्भरतेसह चांगला उपक्रम हाती घेण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. त्यानुसार श्री. नवले यांनी वन विभागाचे कोल्हापूर क्लेमेंट बेन यांच्याशी संपर्क साधला. अंध विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, याची चर्चा झाली. त्यानुसार त्यांना सीडबॉल बँक करण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी क्लेमेंट बेन यांनी नर्सरीसह बियाणे व प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले. त्यासह त्या बियाणांची विक्रीची जबाबदारी श्री. बेन व वन विभागाने घेतली आहे. त्या सगळ्या उपक्रमात वन विभागाचे अत्यंत चांगले सहकार्य त्या युवकांना मिळाले आहे.
वन विभागाने घेतल्या निर्णयानुसार प्रेरणा दिव्यांग संस्थेतील शिवाजी पवार, अतीश शिंगारे, शंकर भोसले, शुभांगी निकम, प्राजक्ता यादव, अनिता देशमाने, सूरज कांबळे व फारूक मोमीन आदी युवकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सीडबॉल प्रशिक्षणासाठी (Seedball Training) युवकांना वन विभागाचे (Forest Department) योगेश कोंडे यांची अत्यंत चांगली मदत झाली. त्यानुसार एका नर्सरीत प्रत्यक्षात जानेवारीपासून काम सुरू झाले. बघता बघता तब्बल २५ हजार सीडबॉलची बँक कऱ्हाडच्या दिव्यांग संस्थेत तयार झाली. त्याच्या विक्रीची जबबादारी वन विभागाने घेतली आहे. त्यातही नगरसवेक सौरभ पाटील, सुधीर जाधव यांनाही सीडबॉल खरेदीसाठी सहकार्य करून हातभार लावला आहे.
अंधत्वाचे दुःख असतानाही आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा संस्था अनेकांना मदत करते आहे. कऱ्हाड शाखेत अनेक जणांना अद्ययावत प्रशिक्षणही देण्यात येत आहे. वेगळे काही करण्याची इच्छा बाळगणाऱ्या आठही अंध युवकांनी सीडबॉल तयार करण्याचे काम हाती घेतले. बघता बघता त्याची बँक तयार झाली आहे. त्या उपक्रमाला शासन, वन विभाग व समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
-सतीश नवले, सचिव, प्रेरणा दिव्यांग सस्था, कऱ्हाड
A Bank Of 25 Thousand Seedball Was Created By Blind Friends In Karhad Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.