Satara Politics sakal
सातारा

Satara Politics: बाजार समिती सभापतिपदी प्रकाश पाटलांना संधी? विजयकुमार कदम यांचा राजीनामा मंजूर

हेमंत पवार

Satara: कऱ्हाड (जि.सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिला. बाजार समितीच्या सभापतिपदाची सर्वांना संधी मिळावी, या हेतूने ठराविक कालावधीनंतर सभापतिपद दुसऱ्याला देण्याचे ठरले असल्यामुळे सभापती कदम यांनी राजीनामा दिला आहे. सहकार उपनिबंधक यांनी तो राजीनामा नऊ जूनला मंजूर केला आहे.

त्यामुळे नवीन सभापती निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, दोन ऑगस्टला निवडीसाठी मुहूर्त काढण्यात आला आहे. दरम्यान, नवीन सभापतिपदासाठी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यावेळी संचालक प्रकाश पाटील-सुपनेकर यांनी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मोठी उत्पन्न असणारी येथील बाजार समिती आहे. या बाजार समितीत गूळ, सोयाबीन, शेंगासह व अन्य शेतमालांची मोठी आवक होऊन आर्थिक उलाढालही मोठी होते.

शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीतील सत्ताधारी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना शह देण्यासाठी माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात पॅनेल टाकले होते. बाजार समितीच्या निवडणुकीत अॅड. उंडाळकर यांना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी खंबीर साथ दिली. त्याचबरोबर कऱ्हाड उत्तरमधील आमदार पाटील यांचे विरोधक असलेले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते मनोज घोरपडे, युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनीही अॅड. पाटील उंडाळकर यांच्या पॅनेलला साथ दिली. त्यामुळे त्यांच्या पॅनेलचा विजय सुखकर झाला. बाजार समिती निवडणुकीत अॅड. उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले.

या निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतलेले अॅड. उंडाळकर गटाचे युवा कार्यकर्ते विजयकुमार कदम यांना पहिल्यांदा सभापतिपद देण्यात आले, तर उपसभापतिपदी संभाजी चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. सभापती कदम यांच्या काळात त्यांनी बाजार समितीचे उत्पन्न एक कोटी ७० लाखांहून अधिक वाढवून समितीला उंच शिखरावर नेण्याचे काम केले. त्याचबरोबर बाजार समितीच्या संरक्षक भिंतीच्या प्रश्नावेळीही त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. सभापतिपदाची सर्वांना संधी मिळावी, या हेतूने ठराविक कालावधीनंतर सभापतिपद दुसऱ्याला देण्याचे ठरले असल्यामुळे सभापती कदम यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा सहकार विभागाने नऊ जूनला मंजूर केला आहे. त्यामुळे आता नवीन सभापती निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

नवीन सभापती निवडीसाठी सहकार विभागाकडून दोन ऑगस्टला निवड निश्‍चित करण्यात आली आहे. सभापतिपद कोणाला मिळणार, याबाबत संचालकांपैकी अनेकांची नावे चर्चेत आली आहेत.

कऱ्हाड तालुक्याच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे चुरस वाढली आहे. रयत संघटनेचे प्रमुख अॅड. उंडाळकर व माजी मुख्यमंत्री, आमदार चव्हाण हे कोणाला संधी देणार? याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, यावेळी सभापती म्हणून संचालक प्रकाश पाटील-सुपनेकर यांनी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नवीन सभापती कोण होणार? हे आठच दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT