Accident on pune Bangalore highway near malkapur satara  
सातारा

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; तीन जण जागीच ठार तर ६ जण जखमी 

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : महामार्गावरील पाचवड फाटा ते आटके टप्पा परिसरात झालेल्या भिषण अपघातात तीन ठार तर सहा जण जखमी झाले. 

पुणे-बंगळुरू महामार्गावर येथून सहा किलोमीटरवर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास दोन कार एकमेकांना ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात असताना अपघात झाला. एका कारने ठोकर दिल्याने दुसरी कार झाडावर आदळून मोरीत कोसळली. त्या पाठोपाठ धडक देणारी कार त्यावर आदळली. त्यात तीन जण जागीच ठार झाले. दोन्ही वाहनांतील पाचजण जखमी आहेत. त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही कार पुण्याच्या कात्रज भागातील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

अपघातातील राहूल प्रल्हाद दोरगे (वय 28), स्वप्नील चंद्रकांत शिंदे (21) रवि साळुंखे (वय समजू शकले नाही, तिघे रा. कात्रज, पुणे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत तुषार गावडे (वय 23, रा. कात्रज, पुणे) आदित्य ओंबासे (16), चंद्रकांत कावरे (76), पूजा ओंबासे (40) भरत ओंबासे (45), सेजल ओंबासे (18, सर्व रा. कलास, ता. इंदापूर, जि. पुणे) जखमी आहेत, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना कृष्णा व सह्याद्री रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः कोल्हापूर बाजूने पुण्याकडे निघालेल्या कार एकमेकांना ओव्हरटेक करून भरधाव वेगाने निघाल्या होत्या. पाचवड फाटा ते आटके टप्पा दरम्यानच्या एका शॉपीसमोर आल्यावर एका कारची दुसऱ्याला कारला धडक बसली. त्यात भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांची धडक बसल्याने एक कार झाडावर आदळून मोरीत कोसळली. त्यापाठोपाठ पहिली कारही त्यावर आदळल्याने दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला होता. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी आहेत. 

अपघात इतक्या जोरात झाला की, त्याच्या आवाजाने परिसर हादरला होता. जोराचा आवाज झाल्याने त्या भागातील नागरिक मदतीला धावून आले. त्या परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनीही मदत कार्य राबविले. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिसही तेथे पोचले. त्यापाठोपाठ तालुका पोलिसही दाखल झाला होते. महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महामार्ग पोलिस, वाहतुक पोलिस, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, उदय यादव, मधुकर साळुंखे कर्मचाऱ्यांनी जखमींना नागरिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत करण्याचा प्रय़त्न करत होते. अपघातात पोलिसांकडून जखमींना मदत करण्यासाठी धावपळ सुरू होती. 

महामार्गावरील वाहतूक ठप्प 

आटके टप्पा ते पाचवड फाट्या दरम्यान झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT