केळघर (सातारा) : बंधारा नको तर धरण पाहिजे, अशी कृती समितीची भूमिका असून त्याला मेढा-केळघर विभागातील (Medha-Kelghar Section) ५४ गावांचा पाठिंबा असून जनभावनेचा विचार शासनाने न केल्यास कृती समिती ५४ गावांतील नागरिकांसाठी लोकसहभागातून आंदोलन उभे करेल, असा इशारा बोंडारवाडी धरण कृती समितीचे (Bondarwadi Dam Action Committee) निमंत्रक विजयराव मोकाशी (Vijayrao Mokashi) यांनी दिला आहे. (Action Committee Warns Government Over Bondarwadi Dam Case Satara Marathi News)
या धरणासाठी श्रेयवादाची लढाई न करता लोकांची भावना समजून घेऊन काम करणे आवश्यक आहे. कृती समितीच्या मागे ५४ गावांची अभेद्य ताकद आहे.
धरणाच्या प्रश्नाबाबत पुढील कार्यवाही काय करावी, यासाठी ५४ गावांतील नागरिकांची बैठक नांदगणे येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलासबाबा जवळ, जावली सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, आनंदराव सपकाळ, विजयराव सावले, विनोद शिंगटे, शांताराम पार्टे, विश्वनाथ धनावडे, आदिनाथ ओंबळे, केळघरचे सरपंच रवींद्र सल्लक, बजरंग चौधरी, चोरांबेचे सरपंच विजय सपकाळ, रिटकवलीचे सरपंच सचिन दळवी, वरोशीचे सरपंच विलास शिर्के, अनिल सुर्वे, जगन्नाथ जाधव, दिलीप जाधव, शिवाजी जाधव, नारायण सुर्वे, राघव बिरामणे, सुरेश कासुर्डे, संतोष कदम, आतिष कदम, उषा उंबरकर, विद्या सुर्वे, धनश्री शेलार आदींची उपस्थिती होती.
यावेळी एकनाथ ओंबळे म्हणाले, ‘‘या धरणासाठी श्रेयवादाची लढाई न करता लोकांची भावना समजून घेऊन काम करणे आवश्यक आहे. कृती समितीच्या मागे ५४ गावांची अभेद्य ताकद आहे. कृती समिती प्रामाणिकपणे काम करत असताना कृती समितीला नाउमेद करण्यासाठी कुणीही प्रयत्न करू नये.’’ विलासबाबा जवळ म्हणाले, ‘‘विधायक विकासकामे करताना संघर्ष नसावा. ५४ गावांतील ग्रामस्थ, नागरिकांनी मतभेद बाजूला ठेऊन धरणासाठी एकत्र यावे. श्रेयवाद व व्यक्तिवाद बाजूला ठेवावा.’’ यावेळी विश्वनाथ धनावडे, उषा उंबरकर, विद्या सुर्वे, विजयराव सावले, मोहन भणगे, संतोष चव्हाण आदींची भाषणे झाली. प्रारंभी वैभव ओंबळे व सचिन सावले यांनी धरणाविषयी माहिती दिली. विनोद शिंगटे यांनी आभार मानले.
Action Committee Warns Government Over Bondarwadi Dam Case Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.