Snakebite esakal
सातारा

सर्पदंश मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा; आरोग्य विभागाने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना, काय आहेत जाणून घ्या..

दरवर्षी ग्रामीण भागात सर्पदंशामुळे (Snakebite) अनेकांचे मृत्यू होतात.

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य सेवा व पाथ संस्थेच्या संयुक्त प्रयत्नाने सर्पदंश प्रतिबंधासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

सातारा : दरवर्षी ग्रामीण भागात सर्पदंशामुळे (Snakebite) अनेकांचे मृत्यू होतात. हे मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Health Department) दिल्या आहेत. २०३० पर्यंत सर्पदंशाच्या मृत्यूचे प्रमाण जागतिक उद्दिष्‍टापर्यंत कमी करण्यात येणार आहे, असे विभागाकडून सांगण्यात आले. सर्पदंश प्रतिबंध, सर्पदंशाचे परिणाम आणि त्याच्या गंभीर धोक्यांच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर सर्पदंश कृती आराखडा राबवण्यात येणार आहे.

सर्पदंश ही एक जीवघेणी वैद्यकीय समस्या असून, या समस्येच्या निराकरणासाठी केंद्रीय आरोग्य (Central Health) आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रण (SBPC) उपक्रम राबविण्यात येत आहे. २०३० पर्यंत सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. सर्पदंशाच्या घटना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घडतात, तसेच पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते.

सर्पदंशांमुळे मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी जिल्हास्तरावर तज्ज्ञ डॉक्टरची (Doctor) जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने या राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे सर्पदंशविषयक प्रशिक्षण राबविण्यासाठी सूचित केलेले आहे. एनसीडीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जिल्हास्तरावर सर्पदंश प्रतिबंध व उपचार पद्धतीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, प्रशिक्षण याबाबत विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.

आरोग्य, वन व पशुसंवर्धन विभागाची समिती

आरोग्य सेवा व पाथ संस्थेच्या संयुक्त प्रयत्नाने सर्पदंश प्रतिबंधासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्पदंशावर करावयाच्या उपाययोजनांसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत आरोग्य विभाग, वन विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय विभाग यांच्या समन्वयाने करायच्या उपाययोजनांचे नियोजन तयार करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी आयुक्तालयाला सादर करा, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT