दुधेबावी (जि. सातारा) : कळसूबाई (जि. नगर) येथील महाराष्ट्रात सर्वात उंच असणारे कळसूबाई शिखर व्यसनमुक्त युवक संघाच्या शिलेदारांनी भल्या पहाटे सर करून एक आगळीवेगळी मोहीम यशस्वी केली.
व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक युवकमित्र हभप बंडातात्या कऱ्हाडकर हे नेहमी अशा पद्धतीच्या धाडसी मोहिमा राबवित यशस्वी करत असतात. दिवाळीत त्यांनी कळसूबाई शिखर सर करण्याची मोहीम आखली. भल्या पहाटे संघाच्या शिलेदारांसमवेत त्यांनी ते सरही केले. महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, अकोला या जिल्ह्यांतील युवकांनी चितळवेढे (ता. अकोले) या गावातून शिखर चढायला सुरुवात केली. सुरुवातीचा शिलेदार एक तास 22 मिनिटांनी शिखरावर पोचला. त्यापाठोपाठ इतरही पोचले.
एप्रिल 2021 मध्ये किल्ले शिवनेरी ते रायगड अशी 14 दिवसांची मोहीम राबविण्यात येणार असून, युवकांनी प्रेरणा घ्यावी असे, आवाहन संघाचे राज्याध्यक्ष शहाजी काळे यांनी केले. या मोहिमेत उपाध्यक्ष प्रा. मारुती शेळके, इतिहास तज्ज्ञ के. एन. देसाई, मार्गदर्शक प्रमोद भापकर, नितीन माने-देशमुख, बाळासाहेब शेरेकर, संतोष भांड, संजय सुतार, दिगंबर गोरे, सत्यवानमहाराज जाधव, चंद्रकांत भोसले, सौरभ बिचुकले, दीपकमहाराज भोईटे, वैष्णव भोसले, आदित्य शिंदे, ओम घाडगे आदींसह व्यसनमुक्त युवक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.