Sugar factories esakal
सातारा

सातारा: ‘अजिंक्‍यतारा’कडून एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम

गिरीश चव्हाण

एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देणारा ‘अजिंक्यतारा’ जिल्ह्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.

सातारा: अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्‍याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एफआरपीनुसार होणाऱ्या उसाचे १०० टक्के बिल वेळेत शेतकऱ्यांना दिले आहे. एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देणारा ‘अजिंक्यतारा’ जिल्ह्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.

कारखाना व्यवस्थापनाच्या काटकसरीच्या, सुयोग्य आर्थिक नियोजनामुळे कारखान्याने गाळपास आलेल्या उसाची एफआरपीनुसार सर्व रक्कम अदा केली असून, एफआरपीनुसार सर्व रक्कम वेळेत देणारा कारखाना असा बहुमान अजिंक्यतारा कारखान्याने सलग दुसऱ्या वर्षीही मिळवला आहे. कारखान्याने हंगामातील उर्वरित तिसरा प्रतिटन २४३ रुपयांचा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

(कै.) भाऊसाहेब महाराजांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून ऊसउत्पादक शेतकरी आणि सभासद हिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याने या गळीत हंगामात शासन निर्धारित एफआरपी सूत्रानुसार गाळपासाठी आलेल्या उसाला ३०४३ रुपये प्रतिटन असा उच्चांकी ऊसदर दिला. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाइस चेअरमन विश्वास शेडगे आणि संचालक मंडळाने योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करून गाळपास आलेल्या उसाची एफआरपीतील उर्वरित रक्कम म्हणजेच २४३ रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण १७.७८ कोटी रक्कम (ता. २७) रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे.

शेतकऱ्यांना ३०४३ प्रतिटन एफआरपीनुसार एकूण २२२.६४ कोटी ही संपूर्ण रक्कम वेळेत अदा करणारा अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे. एफआरपीच्या तरतुदीप्रमाणे मुदतीत अदा करून कारखान्याने शेतकऱ्यांच्या प्रती असलेले उत्तरदायित्व कायदेशीररीत्या पूर्ण केले, याचे संचालक मंडळास मनस्वी समाधान असल्‍याची प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी व्‍यक्‍त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT