सातारा : खरंतर मला त्याबाबत काहीही माहिती नाही, तुम्ही आत्ताच सांगताय त्यामुळे समजतंय परंतु कुणाच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendra Raje Bhosale) विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर माध्यमांशी बाेलताना दिली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येथे बुधवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात राजकीय कूरघाेड्या करणा-यांना चपराक दिली हाेती. तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरही जहरी टीका केली हाेती. त्यापार्श्वभुमीवर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना छेडले.
त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राजकारणात काेणीही काेणाला धमकी देण्यात काही अर्थ नसताे. कदाचित कार्यकर्त्यांना, समाेरच्यांना जरा बर वाटवे, आपले कार्यकर्ते आपल्याबराेबर राहावेत म्हणून काही काही गाेष्टी काेणी बाेलत असतं. परंतु मला त्याबाबत काहीही माहिती नाही. तुम्ही आत्ताच सांगताय त्यामुळे समजतंय कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी वक्तव्य केले असेल परंतु कुणाच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही असेही पवारांनी स्पष्ट केले.
मी उदयनराजेंना पाडलेला माणूस, तुम्हालाही संपवल्याशिवाय राहणार नाही
उदयनराजेंसमवेतच्या निर्णयावर शिवेंद्रसिंहराजे ठाम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.